सागर भस्मे

मागील काही लेखांमधून आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येविषयीची माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यांमधून होणारे स्थलांतर, महाराष्ट्रातील अंतर्गत जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये होणारे स्थलांतर, तसेच ग्रामीण ते शहरी भागात होणाऱ्या स्थलांतरांविषयी जाणून घेऊ.

Solapur District, Unseasonal Rain, Winds, Damage, lightning, one girl and 2 animals died, Unseasonal Rain in Solapur, solapur unseasonal rain, damage crops, farmers, solapur news,
सोलापूर व ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे नुकसान
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी

स्थलांतर म्हणजे काय?

मानव, व्यक्ती किंवा गट वास्तव्याचे एक ठिकाण सोडून दीर्घकाल वास्तव्याच्या हेतूने दुसऱ्या ठिकाणी जातात, या हालचालींना ‘मानवाचे स्थलांतर’(ह्युमन मायग्रेशन) म्हणतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्राची लोकसंख्या भाग २ : लिंग-गुणोत्तर, साक्षरता अन् बाललिंग गुणोत्तर

स्थलांतराचा हेतू व कारणे

  • आर्थिक घटक, अन्नाचा तुटवडा, अधिक चांगले आर्थिक भवितव्य
  • सामाजिक व मानसिक घटक; जसे की धार्मिक विटंबना व छळ, राजकीय छळ, इ.

१) महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यामधील स्थलांतर

महाराष्ट्र राज्यात २००१ सालच्या जनगणनेनुसार एकूण स्थलांतर ३४२ लाख असून, त्यापैकी पुरुषांची संख्या १२४ लाख आणि स्त्रियांची संख्या २१७ लाख इतकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांमधील स्थलांतरात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे. स्त्रियांचे विवाह हे याचे एक प्रमुख कारण होय.

महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधील स्थलांतराचे उपप्रकार पुढीलप्रमाणे :

१) एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात होणारे स्थलांतर : एखाद्या जिल्ह्यातून इतरत्र होणाऱ्या स्थलांतराचा समावेश यामध्ये होतो. या प्रकाराची स्थलांतरीतांची एकूण संख्या २२१ लाख असून, त्यामध्ये पुरुषांची संख्या ७२ लाख आणि स्त्रियांची संख्या १४९ लाख इतकी आहे.

२) जिल्हांतर्गत स्थलांतर : यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे दुपटीने स्थलांतर होताना दिसते. कारण- मुलीचे पालक विवाहस्थळ पाहताना त्याच जिल्ह्यामधील स्थळास जास्त प्राधान्य देतात. या प्रकाराचे एकूण स्थलांतर १७०.४५ लाख असून, एकाच जिल्ह्यामधून आणि जिल्ह्या-जिल्ह्यामधील स्थलांतर सर्वांत जास्त आहे.

३) गणना जिल्ह्यात नागरी भागातून इतरत्र स्थलांतर : महाराष्ट्रात २००१ सालच्या जनगणनेनुसार, अशा प्रकारचे एकूण स्थलांतर ५० लाख आहे. त्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या चार लाखांनी जास्त आहे.

४) गणना जिल्ह्यातून ग्रामीण भागात झालेले स्थलांतर : या स्थलांतरामध्ये पुरुषांची संख्या ४८ लाख आणि स्त्रियांची संख्या १२१ लाख असून, त्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे स्थलांतर जवळजवळ अडीच पटींपेक्षा जास्त आहे.

एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा स्थलांतरीतांची एकूण संख्या ३४२.२५ लाख आहे. त्यापैकी ग्रामीण भागातील स्थलांतरीतांची संख्या २१२.८६ लाख आणि नागरी भागातील स्थलांतरीतांची संख्या १२९.५९ लाख इतकी आहे.

२) भारतामधील इतर राज्यांमधून महाराष्ट्रात स्थलांतर

महाराष्ट्रात २००१ सालच्या जनगणनेनुसार, भारतामधील इतर राज्यांमधून महाराष्ट्रात होणारे एकूण स्थलांतर ७३.१३ लाख आहे. त्यांपैकी पुरुषांची संख्या ४१ लाख आणि स्त्रियांची संख्या ३१ लाख आहे. अशा प्रकारच्या स्थलांतरामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे १० लाखांनी जास्त आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रोजगारासाठी भारताच्या इतर राज्यांमधून स्त्रियांपेक्षा पुरुषांचे स्थलांतर जास्त प्रमाणात झालेले आहे. अशा प्रकारच्या स्थलांतरामध्ये भारताच्या इतर राज्यांमधील नागरी भागातून ६१ लाख, तर ग्रामीण भागातून ११ लाख लोकांचे महाराष्ट्रात स्थलांतर झालेले आहे. १९९१ ते २००१ दशकात प्रामुख्याने बृहन्मुंबईमध्ये (मुंबई शहर व मुंबई उपनगर) स्थलांतरीत झालेल्या परप्रांतीयांची संख्या ११.२ लाख एवढी होती. त्याचप्रमाणे ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक व रायगड या जिल्ह्यांतही स्थलांतरीतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्वभाविकत: याचा ताण महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीवर पडलेला आपल्याला बघायला मिळतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची स्थापना कधी झाली? त्याची वैशिष्ट्ये व तत्त्वे कोणती?

३) महाराष्ट्रामध्ये अन्य राज्यांमधून झालेल्या स्थलांतराचे स्वरूप

भारतामधील महाराष्ट्र हे एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांत व परिसरात उद्योगधंद्यांची वाढ झालेली आहे. नोकरी, व्यवसाय, रोजगार शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे महाराष्ट्रात भारतातील इतर सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून स्थलांतरितांचा ओघ वारंवार सुरूच असतो. भारताच्या इतर राज्यांमधील नागरी भागांतून महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या पुरुषांची संख्या ३६.४८ लाख तर स्त्रियांची संख्या २५ लाख आहे. याचा अर्थ नागरी भागातील स्थलांतरात स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या सुमारे ११.५० लाख जास्त आहे.

भारताच्या इतर राज्यांमधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरीतांमध्ये उत्तर प्रदेशाचा सर्वप्रथम क्रमांक आहे. उत्तर प्रदेशातील स्थलांतरीतांची राज्यामधील टक्केवारी २८.३३% आहे. त्याखालोखाल कर्नाटक १५.९३%, गुजरात ११.६%, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात सर्वांत जास्त स्थलांतरीत लोक उत्तर प्रदेशामधून येतात. त्यांची एकूण संख्या २०.७२ लाख आहे. पुरुषवर्ग रोजगार व नोकरीसाठी जास्त प्रमाणात येतात.

कर्नाटकमधून महाराष्ट्रात एकूण ११.६५ लाख म्हणजे १५.९३% लोक स्थलांतरीत झाले. त्यापैकी पुरुषांची संख्या ५.३६ लाख, तर स्त्रियांची संख्या ६.२९ लाख आहे. एकूण स्थलांतरात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या सुमारे एक लाखाने जास्त आहे. कर्नाटकमधील नागरी भागातून महाराष्ट्रात ८.०६ लाख लोक महाराष्ट्रात आले. कर्नाटकमधील ग्रामीण भागामधून महाराष्ट्रात ३.५९ लाख लोकांनी स्थलांतर केले.

गुजरात राज्यामधून महाराष्ट्रात ८.४९ लाख ११.६१% लोकांनी स्थलांतर केले. गुजरातच्या नागरी भागातून महाराष्ट्रात ७.६६ लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यापैकी पुरुषांची संख्या ३८ लाख आणि स्त्रियांची संख्या ३.८६ लाख आहे. गुजरातच्या ग्रामीण भागातून महाराष्ट्रात होणारे स्थलांतर नागरी भागापेक्षा अत्यल्प आहे. ग्रामीण भागातील एकूण स्थलांतर ८२,००० आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ३१,००० आणि स्त्रियांची संख्या ५१,००० आहे. ग्रामीण भागातून पुरुषांपेक्षा स्त्रियांचे २०,००० पेक्षा जास्त स्थलांतर झाले. महाराष्ट्रात मध्य प्रदेश- ५.६ लाख, आंध्र प्रदेश- ४.३२ लाख, तर राजस्थानमधून एकूण ४.३१ लाख जणांनी स्थलांतर केले. बिहारमधून ३.६१ लाख लोकांनी स्थलांतर केले. बिहारमधील ग्रामीण भागातून महाराष्ट्रात होणारे स्थलांतर बरेच कमी आहे. त्यांची एकूण स्थलांतरीतांची संख्या फक्त ३९ हजार आहे.