प्रश्न क्र. १ : खालील घटनांचा योग्य क्रम लावा.

१) टिळक स्वराज्य फंडाची स्थापना

manoj bajpayee career films family quiz
Quiz: तुम्ही मनोज बाजपेयींचे चित्रपट पाहिलेत? मग या क्विझमधील प्रश्नांची द्या उत्तरं
model code of conduct, code of conduct,
आचारसंहिता समजून घेताना…
parineeti chopra says she had no idea who raghav chadha
“राघवला सिनेमातलं अन् मला राजकारणातलं…”, परिणीती चोप्राने नवऱ्याची केली गोड तक्रार; म्हणाली…
swapnil joshi reaction on campaign for political party
राजकीय पक्षांचा प्रचार करणार का? स्वप्नील जोशीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “पैसे घेऊन विशिष्ट…”

२) चौरीचौरा घटना

३) असहकार आंदोलनाची समाप्ती

४) खिलापत आंदोलन स्थगिती

पर्याय :

अ) १, २, ३, ४

ब) ४, ३, २, १

क) २, ३, ४, १

ड) २, १, ३, ४

प्रश्न क्र. २ :

खालील विधाने लक्षात घ्या.

१) जुलै १९०५ मध्ये कोलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये बंगाल विभाजनाविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२) बहिष्काराचा प्रस्ताव याच ठिकाणी पारित करण्यात आला.

वरील विधानांपकी कोणते विधान अयोग्य आहे?

पर्याय :

अ) फक्त १

ब) फक्त २

क) दोन्ही

ड ) दोन्ही बरोबर

प्रश्न क्र. ३

विधान अ : सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाल येथे फेडरेशन हॉलची स्थापना केली.

स्पष्टीकरण ब : या हॉलच्या स्थापनेमागे बंगालची एकता सिद्ध करावयाची होती.

पर्याय :

अ) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

क) विधान अ बरोबर व ब चूक.

ड) विधान अ चूक व ब बरोबर

प्रश्न. क्र. ४ :

काँग्रेसच्या १९०७ च्या सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली, हे १९०७ चे अधिवेशन पूर्वी कोठे होणार होते?

पर्याय :

अ) कोलकत्ता

ब) बनारस

क) मुंबई

ड) नागपूर

प्रश्न क्र. ५ :

मॉर्ले-मिंटो सुधारणा कायद्यामागे ब्रिटिशांचा खालीलपकी कोणता उद्देश होता?

पर्याय :

अ) सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देणे.

ब) भारतीयांचे कायदेमंडळात प्रतिनिधित्व वाढवणे.

क) भारतीयांना राजकीय फायदा मिळवून देणे.

ड) वरीलपैकी नाही.

प्रश्न क्र. ६ :

विधान अ : १९११ मध्ये भारताच्या राजधानीचे ठिकाण पूर्व भारतामधून पश्चिम भारतात बदलण्यात आले.

स्पष्टीकरण ब : १९११ मध्ये ब्रिटिश सम्राट जॉर्ज पंचम यांचे दिल्लीत आगमनासाठी दिल्ली दरबार भरविण्यात आला होता.

पर्याय :

अ) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब) विधान अ व ब दोन्ही बरोबर असून, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

क) विधान अ बरोबर व ब चूक.

ड) विधान अ चूक व ब बरोबर

प्रश्न क्र. ७ :

१९१९ च्या अधिनियमाबाबत खालील विधाने लक्षात घ्या.

१) या कायद्यानुसार भारत सचिवाचे वेतन भारतीय तिजोरीतून देणे बंद झाले.

२) भारत सचिवाच्या साहाय्यासाठी इंडियन हाय कमिशनर पदाची नियुक्ती करण्यात आली.

३) इंडियन हाय कमिशनरला ब्रिटिश सरकारकडून वेतन मिळणार होते.

वरील विधानांपकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत ते सांगा.

पर्याय :

अ) फक्त १ व ३

ब) फक्त २

क) फक्त ३

ड) फक्त २ व १

प्रश्न क्र. ८ :

खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?

१) ‘भारत माता सोसायटी’ नावाची क्रांतिकारी संघटना पंजाब या ठिकाणी कार्यरत होती.

२) भारत माता सोसायटीमध्ये अजित सिंह, लाला हरदयाल व जे. एम. चटर्जी हे क्रांतिकारक होते.

पर्याय :

अ) विधान १ बरोबर

ब) विधान २ बरोबर

क) विधान १ व २ बरोबर

ड) विधान १ व २ चूक

प्रश्न क्र. ९ :

क्रांतिकारकांवर चालविल्या जाणाऱ्या खालील खटल्याचा योग्य क्रम लावा.

१) लाहोर केस

२) नाशिक केस

३) हावडा केस

४) अलीपूर केस

पर्याय :

अ) २, १, ४ व ३

ब) ४, २, ३ व १

क) ३, १, २ व ४

ड) १, २, ३ व ४

या प्रश्नांची उत्तरं संध्याकाळी ८ वाजता लोकसत्ता.कॉमवर प्रसिद्ध होतील. वरील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.