scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : नदीप्रणालीनुसार भारताचे विभाजन कसे करण्यात आले? यामागचा उद्देश काय?

या लेखातून आपण भारताचे नदीप्रणालीनुसार करण्यात आलेल्या विभाजनाबाबत जाणून घेऊया.

river systems in india
नदीप्रणालीनुसार भारताचे विभाजन कसे करण्यात आले? यामागचा उद्देश काय? ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

सागर भस्मे

मागील लेखातून आपण भारतातील राज्यांच्या निर्मितीबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण भारताचे नदीप्रणालीनुसार करण्यात आलेल्या विभाजनाबाबत जाणून घेऊया. नद्या या सर्वात उपयुक्त नैसर्गिक संसाधने आहेत. या नद्यांनी योजनाकार, अर्थशास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, जलशास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील इतर तज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताला शेकडो मोठ्या आणि लहान नदीप्रणाली लाभलेल्या आहेत. ते सिंचन, जलविद्युत निर्मितीसाठी, उद्योग आणि घरगुती उद्देशासाठी पाण्याचे एक उत्तम स्त्रोत आहेत. देशातील जवळपास सर्व सुपीक क्षेत्रे नद्यांच्या निक्षेपामुळे निर्माण झाली आहेत. अनेक नद्या आंतर्देशीय जलवाहतुकीसाठी वाहिन्या म्हणून वापरल्या जातात. नद्यांच्या किनारी प्रदेशात मासेमारी हा महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे.

land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?
Google Pay Shutting Down
Google Pay ‘या’ देशात बंद होणार, भारतात काय परिस्थिती असेल?
haldwani
नझूल जमिनीवरील अवैध बांधकामामुळे उत्तराखंडमध्ये हिंसाचार, पण ‘नझूल जमीन’ म्हणजे काय? वाचा सविस्तर…
two arrested in evm unit stolen from saswad tahsildar office
सासवड तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्रे चोरणारे दोन चोरटे गजाआड…का चोरली मतदान यंत्रे?

हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील कृषीची विशिष्ट्ये कोणती? देशात किती प्रकारची हंगामी पिके घेतली जातात?

एस. पी. दासगुप्ता यांनी केलेल्या अंदाजानुसार, देशातील नद्यांमधील पाण्याचे वार्षिक उत्सर्जन १,८५८,१०० दशलक्ष घनमीटर आहे, ज्यापैकी एक-तृतीयांश (३३.८%) ब्रह्मपुत्रेचे योगदान आहे. त्यानंतर गंगा २५.२%, गोदावरी ६.४%, सिंधू ४.३%, महानदी ३.६%, कृष्णा ३.४% आणि नर्मदा २.९% असा यांचा वाटा आहे. उर्वरित २०.४% इतर नद्यांचे योगदान आहे.

भारतातील नदीप्रणाली (ड्रेनेज सिस्टम्स) :

भारतातील ड्रेनेज सिस्टिमचे वर्गीकरण करण्यासाठी अनेक आधार आहेत. ड्रेनेज सिस्टिमचे मुख्य प्रकार थोडक्यात खाली वर्णन केले आहेत :

१) जल विभाजक क्षेत्राचा आकार (Shape of water divide of India) : भारतातील नदीप्रणाली त्यांच्या आकारानुसार तीन प्रकारांमध्ये विभागल्या जातात. प्रमुख नदी खोऱ्यांचे क्षेत्र २०,००० चौरस किमी आणि त्याहून अधिक आहे. मध्यम नदी खोऱ्यांचे पाणलोट २,००० ते २०,००० चौरस किमीदरम्यान आहे आणि २,००० चौरस किमीपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या नदी खोऱ्यांना लघु नदी खोरे म्हणतात.

२) उगम (Origin) : सामान्यत: नद्यांच्या उगमाच्या आधारावर भारतातील दोन व्यापक नदीप्रणाली ओळखल्या जातात. एक सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांसह हिमालयातील नद्या आणि दुसरी द्वीपकल्पीय नद्या ज्यात महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा आणि तापी त्यांच्या उपनद्यांसह, या नद्यांचा समावेश होतो.

३) समुद्राकडे अभिमुखता (Orientation towards sea) : भारतीय जलनिस्सारण दोन प्रमुख ड्रेनेज सिस्टीम्समध्ये विभागले गेले आहे, जे समुद्राकडे नद्यांच्या अभिमुखतेच्या आधारावर आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. एक, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आणि दुसरे म्हणजे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. देशातील ७७ टक्के नदी क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दिशेने आहे. यामध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेनेरू, पेन्नेयर, वैगई इत्यादी नद्यांचा समावेश आहे. अरबी समुद्राला देशातील २३ टक्के भागातील नद्या जाऊन मिळतात. सिंधू, नर्मदा, तापी, साबरमती, माही आणि सह्याद्रीतून खाली येणाऱ्या पश्चिम किनार्‍यावरील नद्या यांसारख्या नदी खोऱ्यांचा समावेश होतो. भारतीय नद्यांनी सागरात वाहून नेलेल्या पाण्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक पाणी बंगालच्या उपसागरात साचले आहे; उर्वरित भाग अरबी समुद्रात वाहून जातो. हे वितरण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पडणाऱ्या ड्रेनेज सिस्टमला वेगळे करणाऱ्या जल विभाजक स्थानामुळे आहे. जसे की, कन्याकुमारीपासून २,७३६ किमी लांबीचा पश्चिम घाट, अजिंठा, मैकाल, विंध्य आणि अरवली पर्वतरांगांतून हरिद्वारजवळील शिवालिक टेकड्यांपर्यंत हा जल विभाजक आहे.

४) नदी व्यवस्था (River Regime ) : नदी व्यवस्था म्हणजे नदीतील पाण्याच्या प्रमाणातील होणारा हंगामी चढउतार (Seasonal up and down). हिमालयीन आणि प्रायद्वीपीय नद्यांच्या स्त्रोतांमधील हवामानातील फरकांमुळे या दोन भागांतील निचरा पद्धतींमध्ये फरक दिसून येतो. हिमालयातील नद्या बारमाही आहेत, कारण त्यांचा प्रवाह पाऊस आणि बर्फ वितळण्यावर अवलंबून असतो. अशा प्रकारे हिमालयातील नद्या पावसाळी तसेच हिमनदी (Glaciers ) दोन्ही प्रकारच्या आहेत.

दुसरीकडे द्वीपकल्पीय नद्यांना केवळ पावसाचे पाणी मिळते आणि त्यांचा प्रवाह केवळ हंगामी असतो. नद्यांचा निचरा/डिस्चार्ज हा क्युसेक (क्यूबिक फूट प्रति सेकंद) किंवा क्युमेक्स (क्यूबिक मीटर प्रति सेकंद) मध्ये मोजला जातो. जानेवारी ते जून या काळात गंगेचा प्रवाह कमी असतो. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये प्रवाहाची कमाल श्रेणी प्राप्त होते. सप्टेंबरनंतर प्रवाहाचा दर सातत्याने घसरतो. अशा प्रकारे गंगेची एक विशिष्ट मान्सूनची व्यवस्था आहे. तथापि, हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे पावसाळ्यापूर्वी या नदीत पुरेसे पाणी वाहते. हिमालयातील नदी, झेलमचा प्रवाह जूनमध्ये किंवा मे महिन्यातही मुख्यतः हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे होतो. जानेवारी ते जुलै या कालावधीत नर्मदेचा प्रवाह खूपच कमी असतो, जो ऑगस्टमध्ये अचानक वाढतो आणि कमाल पातळी गाठतो. गोदावरी नदी मे महिन्यापर्यंत कमी पातळीवर वाहत असते. पोलाराम येथे गोदावरीचा सरासरी कमाल प्रवाह ३,२०० क्युसेक आहे, तर सरासरी किमान प्रवाह फक्त ५० क्युसेक आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील सात राज्यांची निर्मिती कशी झाली? त्यांची वैशिष्ट्ये कोणती?

नद्यांची उपयोगिता (Uses of Rivers) :

नद्या आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत कारण, त्यामध्ये गोड्या पाण्याचा मोठा स्रोत आहे. खरे तर आपल्या ताज्या पाण्याच्या बहुतांश गरजा नद्यांद्वारे भागवल्या जातात. देशातील वार्षिक पर्जन्यमान अंदाजे ३७,०,४०० दशलक्ष घनमीटर आहे. त्याचा बराचसा भाग जमिनीत मुरतो आणि काही भाग बाष्पीभवनाने वातावरणात विलुप्त होतो. आपण नदीचे पाणी विविध कारणांसाठी वापरतो, जसे की सिंचन, जल-विद्युत उत्पादन, जलवाहतूक इत्यादी. घरगुती वापरासाठी शहरे आणि गावांना मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदेही पाण्यावर अवलंबून आहेत.

सिंचन (Irrigation) : नदीच्या पाण्याचा सर्वाधिक वापर सिंचनासाठी केला जातो. भारतीय नद्या दरवर्षी सुमारे १८,५८,१०० दशलक्ष घनमीटर पाणी वाहून नेतात. सुमारे ५,५५,१६६ दशलक्ष घनमीटर नदीचे पाणी प्रत्यक्षात कालव्यांद्वारे सिंचनासाठी वापरले जाते. हे भारतीय नद्यांच्या वार्षिक प्रवाहाच्या सुमारे ३० टक्के आहे.

जलविद्युत उत्पादन (Hydroelectricity production) : मोठ्या नद्यांमध्ये जलशक्तीची मोठी क्षमता असते. उत्तरेला हिमालय, पश्चिमेला विंध्य, सातपुडा आणि अरावली, पूर्वेला मैकाला आणि छोटानागपूर, ईशान्येला मेघालय पठार आणि पूर्वाचल आणि दख्खनच्या पठाराचे पश्चिम आणि पूर्व घाट मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्मितीची शक्यता निर्माण करतात. एकूण नदीच्या प्रवाहापैकी ६० टक्के हिमालयातील नद्यांमध्ये, १६ टक्के मध्य भारतीय नद्यांमध्ये (नर्मदा, तापी, महानदी इ.) आणि उर्वरित दख्खनच्या पठारावरील नद्यांमध्ये जल ऊर्जा विकासाची क्षमता आहे.

जल वाहतूक (नेव्हिगेशन) : देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात गंगा आणि ब्रह्मपुत्रा, ओडिशातील महानदी, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील गोदावरी आणि कृष्णा, गुजरातमधील नर्मदा आणि तापी आणि किनारी राज्यांमधील तलाव आणि भरती-ओहोटीच्या खाड्या जल वाहतूक करण्यासाठी उपयुक्त आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि महानदी हे सर्वात महत्त्वाचे जलवाहतूक आहेत. गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि तापी नद्यांमध्ये त्यांच्या मुखाजवळच जलवाहतूक करता येते. गंगा-भागीरथी-हुगडी नदीवरील राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक १, ब्रह्मपुत्रा नदीवरील राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक २, केरळमधील कोल्लम ते कोटापूरम येथील राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक ३ आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc indian geography dividation of india by river systems mpup spb

First published on: 01-12-2023 at 13:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×