सागर भस्मे

मागील लेखातून आपण खनिजांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण अक्षवृत्त, रेखावृत्त आणि वेळ निश्चिती याबाबत जाणून घेऊ या. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताला समांतर असणाऱ्या व एकमेकांपासून समान अंशावर असणाऱ्या काल्पनिक रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात. जसे जसे आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जातो, तसतसा अक्षवृत्तांचा आकार कमी होत जातो. सर्वात लहान अक्षवृत्त म्हणजे ध्रुव, जे बिंदूसमान मानले जाते व त्याला ९० डिग्री अक्षवृत्त असेदेखील म्हणतात. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणून विषुववृत्त मानले जाते व त्याला शून्य अंश अक्षवृत्त असे म्हणतात. पृथ्वीवर एकूण १८१ अक्षवृत्त आहेत, यातील ९० विषुववृत्ताच्या दक्षिण बाजूला तर ९० उत्तर बाजूला आहेत.

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?
resignation of central election commissioner arun goyal
‘गोयल यांचा राजीनामा वैयक्तिक कारणाने’
indian geography for upsc
UPSC-MPSC : भारताचा भूगोल : उत्तर भारतीय मैदानी प्रदेश

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अधातू खनिजे म्हणजे काय? भारतात ही खनिजे कुठे आढळतात?

रेखावृत्ते (Longitudes)

पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाणारी आणि विषुववृत्ताला काटकोनात छेदणारी जी अर्ध वर्तुळे आहेत, त्यांना रेखावृत्ते असे म्हणतात. अशी एकूण ३६० रेखावृत्ते आहेत आणि सर्व रेखावृत्तांची लांबी सारखी असते. दोन रेखावृत्तांतील अंतर दोन्ही ध्रुवांपासून विषुववृत्ताकडे वाढत जाते व विषुववृत्तावर ते जास्तीत जास्त म्हणजे १११ किमी आहे. लंडन शहरातील ग्रीनीच उपनगराजवळील Royal Astronomical Laboratory मधून जाणाऱ्या काल्पनिक रेखावृत्तास ‘मूळ रेखावृत्त’ किंवा ‘ग्रीनीच रेखावृत्त’ म्हणतात. त्यापैकी १८०° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्ताच्या बरोबर विरुद्ध आहे. म्हणून या बिंदूंना ॲन्टीपोडल पॉइंटस् असेही म्हणतात. १८० रेखावृत्ताच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील रेखावृत्तांना १ ते १०९ असे क्रमांक दिलेले आहेत. या १८० रेखावृत्तांमुळे पृथ्वीचे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे दोन भाग झालेले आहेत. रेखावृत्तांमुळे एखाद्या ठिकाणच्या वेळेचा अंदाज व्यक्त करता येतो.

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ (Local Time and Standard Time)

पृथ्वी स्वतःभोवती २४ तासांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करते. या काळात पृथ्वीवरील ३६० रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोरून जातात. ६० मिनिटांमध्ये १५ रेखावृत्त सूर्यासमोरून जातात. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील स्थळांची वेळ प्रत्येक रेखावृत्ताच्या चार मिनिटांनी पुढे असते. तर पश्चिमेकडील स्थळांची वेळ प्रत्येक रेखावृत्ताच्या चार मिनिटांनी मागे असते. पण, रेखावृत्तीय अंतर जेव्हा जास्त असते, तेव्हा हा फरक वाढत जाऊन त्यामुळे ज्या देशांचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे, तिथे साधारणपणे देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची वेळ ही स्थानिक वेळ मानली जाते. अशा वेळेला प्रमाण वेळ असे म्हणतात.

प्रमाण वेळ (Standard Time)

देशातील मध्यवर्ती रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ सर्व देशांशी संबंधित व्यवहारासाठी प्रमाण मानतात. त्यावेळेला प्रमाणवेळ असे म्हणतात. भारताची प्रमाण वेळ ही ८२° ३०’ पूर्व या रेखावृत्त ठरवली आहे. १९०५ पासून हीच प्रमाणवेळ भारताने प्रचलित केली आहे. हे रेखावृत्त उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहराजवळून जाते. ग्रीनिच रेखावृत्तावरील स्थानिक वेळ हीच जगाची आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ (GMT) मानलेली आहे. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे, म्हणजे ग्रीनिचमध्ये जर सकाळचे सहा वाजले तर भारतामध्ये सकाळचे ११ वाजून ३० मिनिटे झाली असतील.

काही देशांमध्ये पूर्व-पश्चिम विस्तार जास्त असल्याने; जसे अमेरिका, कॅनडा किंवा रशिया या देशांमध्ये एक प्रमाणवेळ मान्य योग्य ठरत नाही. अशा देशांत एकापेक्षा अधिक प्रमाणवेळ मानण्यात आले आहेत. जसे की रशिया या देशात ११ प्रमाणवेळ आहेत, कॅनडा देशात पाच प्रमाणवेळ आणि अमेरिका देशात पाच प्रमाणवेळ आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : सातपुडा पर्वतरांग; भूवैज्ञानिक निर्मिती आणि खनिजे

आंतरराष्ट्रीय वाररेषा (International Date Line)

१८८४ मध्ये वॉशिंग्टन डी.सी. येथे झालेल्या इंटरनॅशनल मेडियन कॉन्फरन्सच्या सभेमध्ये आंतरराष्ट्रीय वार रेषेचा समावेश करण्यात आला. पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या परिवलनामुळे पूर्वेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळ पश्चिमेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळेपेक्षा पुढे असते. पश्चिमेकडे निघालेल्यांनी १८०” हे रेखावृत्त ओलांडताना एक दिवस पुढची तारीख आणि वार गृहीत धरावा, तर पूर्वेकडे प्रवासास निघालेल्यांनी १८०° हे रेखावृत्त ओलांडताना एक दिवस मागची तारीख आणि वार गृहीत धरावा; तर १८०° रेखावृत्ताच्या अनुरोधाने वार व दिनांक यांच्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी जी काल्पनिक रेषा ठरविण्यात आली आहे, तिला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. सैबेरिया व अलास्का दरम्यानच्या बेरिंगच्या सामुद्रधुनीतून तसेच ॲल्यूशियन बेटाच्या पश्चिमेकडून ही रेषा वळलेली आहे.