Copernicus Emergency Management Sevice : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) कोपर्निकस आपत्कालीन सेवा

इराणचे राष्ट्राअध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यातील क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी इराण सरकारने युरोपियन युनियनची मदत मागितली होती. त्यानुसार युरोपियन युनियनने आपली जलद उपग्रह मॅपिंग सेवा सक्रिय केली.

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्यपरीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, एजन्सी आणि मंच, त्यांची रचना, आदेश या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

  1. कोपर्निकस आपत्कालीन सेवा नेमकी काय आहे?
  2. इराणचे राष्ट्राअध्यक्ष इब्राहिम रईसी नेमके कोण होते?

तुमच्या माहितीसाठी :

जलद मॅपिंग सेवा ही ‘इमर्जन्सी मॅपिंग सर्व्हिस (ईएमएस)’च्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे; जी युरोपियन युनियनच्या कोपर्निकस प्रोग्राम अंतर्गत येते.

कोपर्निकस प्रोग्राम हा युरोपियन युनियनच्या अंतराळ कार्यक्रमाचा भाग आहे. सेंटिनेल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपग्रहांच्या संचामधून माहिती संकलित करून, पृथ्वी आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे निरीक्षण करणे हे या प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे.

युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए)च्या वेबसाइटनुसार यामध्ये जमीन व्यवस्थापन, सागरी वातावरण, हवेतील वातावरण, आपत्कालीन स्थिती, हवामान बदल या बाबींचा समावेश आहे. वेबसाइटमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, वापरकर्त्यांना संपूर्ण माहिती विनामूल्य मिळते.

१९९८ मध्ये लाँच झालेल्या कोपर्निकस प्रोग्रामला पूर्वी ग्लोबल मॉनिटरिंग फॉर एन्व्हायर्न्मेंटल सिक्युरिटी (जीएनईएस) म्हटले जायचे. सध्या हा प्रोग्राम युरोपियन स्पेस एजन्सी आणि युरोपियन एनव्हायर्न्मेंट एजन्सी (ईईए)च्या समर्थनासह युरोपियन कमिशन (ईसी)द्वारे लागू केला जातो.

कोपर्निकस ईएमएस (Copernicus EMS) २०१२ पासून कार्यरत आहे. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थिती आणि मानवतावादी संकटे व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी उपग्रह रिमोट सेन्सिंग आणि इन सिटू डेटा स्रोतांमधून मिळविलेली भौगोलिक व स्थानिक माहिती हा कोपर्निकस ईएमएस प्रोग्राम प्रदान करतो.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) मलेशियाची अॅनिमल डिप्लोमसी

पर्यावरणाच्या समस्या कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मलेशिया या डिप्लोमसीचा वापर करीत आहे. ओरांगउटानच्या संवर्धनासाठी इतर देशांना आपल्याबरोबर जोडणे हे मलेशियाच्या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना याबरोबरच सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा आणि राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवरील परिणाम या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

  1. डिप्लोमसी म्हणजे काय?
  2. ‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’ कशी काम करते?
  3. ‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’बाबतचा इतिहास काय सांगतो?
  4. ओरांगउटान काय आहे?

तुमच्या माहितीसाठी :

डिप्लोमसी म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एखादा व्यवहार प्रत्यक्षात आणण्यासाठी वा तंटे सोडविण्यासाठी एकमेकांप्रति दाखविलेला चांगुलपणा असतो. अशी मुत्सद्देगिरी कशाही स्वरूपात दाखवली जाऊ शकते.

‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’मध्ये दोन देश एकमेकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी देशातील प्राण्यांची देवाण-घेवाण करतात. बरेचदा या देवाण-घेवाणीमध्ये दिले जाणारे प्राणी त्या देशाची ओळख असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या मुत्सद्देगिरीला सांस्कृतिकदृष्ट्याही एक वेगळे महत्त्व प्राप्त होते.

ओरांगउटान ही वानराची एक सुप्रसिद्ध प्रजाती असून, ती मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे जे देश पाम तेल खरेदी करतात, त्यांना ओरांगउटान देण्याचा निर्णय मलेशियाने घेतला आहे.

प्राचीन मानवी संस्कृतीमध्येही अ‍ॅनिमल डिप्लोमसीच्या नोंदी आढळतात. इजिप्तमधील सम्राट आपल्या संपत्ती आणि सत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी इतर देशांतील सम्राटांना दुर्मीळ प्राणी द्यायचे. इसवी सन पूर्व १५०० मध्ये इजिप्तचा सम्राट हॅटशेपसटने सीरियाच्या राजाला भेट म्हणून एक जिराफ पाठविला होता.

मध्ययुगीन काळामध्ये युरोपातील सम्राट निसर्गावरील त्यांचा अधिकार दाखविण्यासाठी सिंह आणि वाघ यांसारख्या प्राण्यांची वारंवार देवाणघेवाण करायचे. हे प्राणी सत्तेचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जायचे. अगदी आशियामध्येही दोन शासकांमध्ये आदर आणि एकतेचे प्रतीक म्हणून हत्तींची देवाण-घेवाण व्हायची.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी सूत्र संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…