मागील काही लेखांमधून आपण बंगाल, महाराष्ट्र व पंजाबमधील क्रांतिकारी चळवळींविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण भारताबाहेर सुरू झालेल्या ‘गदर चळवळी’विषयी जाणून घेऊ या. १९०४ च्या जवळपास मोठ्या प्रमाणात भारतातील नागरिकांनी कॅनडात स्थलांतर केले. त्यापैकी पंजाबमधून स्थलांतर झालेल्या लोकांची संख्या मोठी होती. तसेच यापैकी बरेच लोक हे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील माजी सैनिक होते. मात्र, हे लोक जेव्हा कॅनडात स्थलांतर झाले, त्यावेळी त्यांना वांशिक भेदभाव सहन करावा लागला.

हेही वाचा – UPSC-MPSC : पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ आणि दिल्ली-लाहोर कट खटला

Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
elgar parishad shobha sen
एल्गार परिषद: शोमा सेन यांना सहा वर्षांनंतर जामीन, हे प्रकरण आहे काय आणि त्यातील अन्य १६ आरोपींची सद्यस्थिती काय?
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

आपण एका स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक नसल्याने आपल्याला या वांशिक भेदभावांना सामोरे जावे लागत असल्याचा त्यांचा समज होता. तारकनाथ दास व जी. डी. कुमार हे अशी भावना असलेल्या लोकांपैकी दोन जण होते. या दोघांनी कॅनडातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी मोहीम सुरू केली. तारकनाथ दास यांनी यांनी ‘स्वदेश सेवक’; तर जी. डी. कुमार यांनी ‘फ्री हिंदुस्थान’ हे जर्नल सुरू केले आणि पाहता पाहता कॅनडातून एक राजकीय चळवळ सुरू झाली. मात्र, १९१० मध्ये कॅनडा सरकारने तारकनाथ दास आणि जी. डी. कुमार यांना कॅनडातून बाहेर काढण्यात आले.

कॅनडातून बाहेर पडल्यानंतर हे दोघे अमेरिकेतील सिएटलमध्ये स्थायिक झाले. १९११ मध्ये त्यांची ओळख लाला हरदयाळ यांच्याशी झाली. लाला हरदयाळ हे अमेरिकेतील एका विद्यापीठात प्राध्यापक होते. भारताला स्वतंत्र करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. भारताला स्वतंत्र करायचे असेल, तर ते केवळ सशस्त्र क्रांतीनेच शक्य होऊ शकते, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी अमेरिकेत आल्यानंतर युगांतर हे वृत्तपत्र सुरू केले. (बंगालमध्ये अनुशीलन समितीने सुरू केलेले ‘युगांतर’ वृत्तपत्र हे वेगळे होते.) तसेच त्यांनी १९१२ मध्ये ‘पॅसिफिक कोस्ट हिंदुस्थान असोसिएशन’ ही संघटना सुरू केली. पुढे १९१३ मध्ये हीच संघटना ‘गदर पार्टी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. लाला हरदयाळ यांच्याबरोबरच मोहम्मद बरकतुल्ला, भगवानसिंह रामचंद्र व सोहनलाल भाकना हे या पक्षाचे नेते होते. पुढे गदर पक्षाने ‘द गदर’ हे साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. या साप्ताहिकाच्या शीर्षभागी ‘इंग्रजी राजवटीचा शत्रू’ असे लिहिलेले होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ; रॅंड हत्या प्रकरण आणि नाशिक कट खटला

दरम्यान, १९१४ साली पहिले विश्वयुद्ध सुरू झाले. त्याचाच फायदा घेत, गदर पक्षाच्या सदस्यांनी भारतात सशस्त्र उठाव करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा पैसा त्यांनी वर्गणीच्या माध्यमातून गोळा केला. तसेच गदर पक्षाच्या सदस्यांनी पूर्व आणि आग्नेय आशिया, तसेच भारतीय सैनिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भारतीय सैन्यातील काही तुकड्या तयारही झाल्या. काही दिवसांतच पंजाबमध्ये उठाव करण्याची तारीखही निश्चित झाली. मात्र, याचा सुगावा ब्रिटिश अधिकाऱ्यांना लागला. त्यांनी लगेच बंडखोरांच्या तुकड्या बरखास्त केल्या आणि त्यांच्या नेत्यांना अटक केली. अनेकांना फाशी; तर काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पुढे १९१५ पर्यंत ब्रिटिशांना गदर चळवळ दाबण्यात यश आले.