प्रवीण चव्हाण 
यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या तयारीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असणाऱ्या भारतीय राज्यव्यवस्थेतील केंद्र-राज्य संबंध, घटनादुरुस्ती, घटनात्मक संस्था व बिगर-घटनात्मक संस्था याची चर्चा आपण आजच्या लेखामध्ये करणार आहोत. भारतीय राज्यव्यवस्थेवर विचारलेल्या एकूण प्रश्नांची संख्या लक्षात घेता ज्या घटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात त्या घटकांची चर्चा या लेखात केली आहे. वर नमूद केलेल्या उपघटकांवरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या फारशी नाही. मात्र परीक्षेच्या तयारीच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून आपल्याला या घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या घटकांवर विचारलेल्या प्रश्नांची काठिण्यपातळी फार नाही. त्यामुळे हे प्रश्न बरोबर आल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.

भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या भागामध्ये केंद्र-राज्य संबंधातील प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी, बाराव्या भागांमध्ये वित्तीय बाबी तर भाग १३ मध्ये व्यापारी बाबी समाविष्ट केल्या आहेत. याचा अभ्यास करताना प्राधान्याने भाग ११ मधील कायदेशीर बाबी व भाग १२ मधील वित्तीय बाबी यांना प्राधान्य द्यावे. भाग बारामधील वित्तीय संबंधांचा विचार करता कलम २८० मधील वित्त आयोग, आयोगाचे कार्य, आयोगाची रचना इत्यादीचा तपशीलवार अभ्यास करावा. केंद्र-राज्य संबंधातील व्यापारी संबंध या घटकावर फारसे प्रश्न विचारलेले आढळून येत नाहीत.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc preparation indian polity centre state relations constitutional amendment amy
First published on: 09-04-2024 at 08:19 IST