UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोक सेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारीसह इतर पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवार या पदासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करु शकतात

UPSC भरती २०२३ : २८५ वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी करा अर्ज
या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील २८५ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२३ आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.

UPSC भरती २०२३: तपशील
वरिष्ठ फार्म व्यवस्थापक: १ पद
केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर: २० पदे
मुख्य ग्रंथपाल: १ पद
शास्त्रज्ञ – ‘ब’: ७ पदे
स्पेशलिस्ट ग्रेड III: १३ पदे
असिस्टंट केमिस्ट : ३ पदे
सहाय्यक कामगार आयुक्त:१ पद
वैद्यकीय अधिकारी: २३४ पदे
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर: ५ पदे

हेही वाचा – इंडिया पोस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मेल मोटर सेवा मुंबई येथे ‘या’ पदासाठी होणार भरती, मिळेल ‘इतका’ पगार

पात्रता निकष
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज फी
उमेदवारांना रुपये २००/- शुल्क भरावे लागेल. [शुल्क भरण्यासाठी अनुसूचित जाती/जमाती/महिला उमेदवारांना सुट दिली आहे] एकतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोखीने पैसे पाठवून किंवा व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय वापरून पेमेंट किंवा कोणत्याही बँकेचे नेट बँकिंग वापरून.