जिल्हा परिषद, गडचिरोली शिक्षण विभाग अंतर्गत ‘कंत्राटी शिक्षक’ पदभरतीकरिता जाहिरात २०२४ (क्र. ०१ दि. १३ ऑगस्ट २०२४).

(१) प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) (इ. १ ते ५ वी करिता) – ४१९ पदे.

पात्रता : ( i) १२ वी, ( ii) D. Ed. किंवा तत्सम परीक्षा, ( iii) TET/ CTET पेपर-१, ( iv) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२२ उत्तीर्ण.

(२) पदवीधर प्राथमिक शिक्षक (इ. ६ ते ८ वी करिता) – १२० पदे.

पात्रता : ( i) पदवी, ( ii) D. Ed./ B. Ed. किंवा तत्सम परीक्षा, (iii) TET/ CTET पेपर-२, ( iv) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२२ उत्तीर्ण.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ( TAIT) उत्तीर्ण उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास अट शिथिल केली जाऊू शकते.

वयोमर्यादा : (दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी) १८ ते ४० वर्षे (मागासवर्गीय/ दिव्यांग उमेदवारांस कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे).

मानधन : दरमहा रु. २०,०००/-.

हेही वाचा : चौकट मोडताना : मानाची आणि वेगळी नोकरी

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : www. zpgadchiroli. in या संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्जावर अलिकडे काढलेला व स्वतचा स्वाक्षरी केलेला फोटो लावावा व पुढील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रती जोडाव्यात.

(१) १० वी/१२ वी गुणपत्रक व प्रमाणपत्र

(२) पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र

(३) D.Ed./ B.Ed. किंवा तत्सम व्यावसायिक अर्हतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र

(४) TET/ CTET पेपर-१ किंवा पेपर-२ उत्तीर्ण प्रमाणपत्र

(५) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ( TAIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र

(६) शाळा सोडल्याचा दाखला

(७) स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार असल्यास पेसा क्षेत्रातील रहिवास प्रमाणपत्र

निवड पद्धती : प्राप्त अर्जांमधून अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२२ मधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी बनविली जाईल.

सदर जाहिरातीनुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवर नियुक्ती करावयाची असल्याने स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात येईल.

हेही वाचा : MPSC मंत्र : अराजपत्रित मुख्य परीक्षा – सामान्य विज्ञान

उमेदवाराने स्वत पूर्ण भरलेले अर्ज ‘शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली (दुसरा मजला) यांचे कार्यालयात दि. २७ ऑगस्ट सायं. ६.१५ वाजेपर्यंत स्विकारले जातील. (प्रत्यक्ष अथवा नोंदणीकृत रजिस्टर पोस्टाने) (अर्ज पाठविताना लखोट्यावर ‘कंत्राटी शिक्षक या पदासाठी अर्ज’ असे ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक आहे.)’

‘समीर’मधील संधी

सोसायटी फॉर अॅप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च (SAMEER), IIT कँपस, पवई, मुंबई – ४०० ०७६ (Advt. No. ०६/२०२४ dt. 25th July 2024) १ वर्ष कालावधीच्या ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा इंजिनिअर्स अॅप्रेंटिस ट्रेनी (२०२४-२५) पदांची अॅप्रेंटिस अॅक्ट अंतर्गत भरतीसाठी वॉक-इन-इंटरह्यू. एकूण रिक्त पदे – २८.

(I) ग्रॅज्युएट इंजिनिअर्स अॅप्रेंटिस ट्रेनी – एकूण २० पदे.

(१) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन – १६ पदे (इंटरव्ह्यू दि. २९ ऑगस्ट २०२४).

(२) कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग/ आयटी – २ पदे (इंटरव्ह्यू दि. ३० ऑगस्ट २०२४).

(३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – २ पदे (इंटरव्ह्यू दि. ३० ऑगस्ट २०२४).

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग विषयातील पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(II) डिप्लोमा इंजिनिअर्स अॅप्रेंटिस ट्रेनी.

इलेक्ट्रॉनिक्स अँडकम्युनिकेशन – ८ पदे (इंटरव्ह्यू दि. ३० ऑगस्ट २०२४).

पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण.

उमेदवारांनी नॅशनल अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्किम (NATS) वेब पोर्टल आणि बोर्ड ऑफ अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) मुंबई यांचेकडे नोंदणी केलेली असावी. पात्रता परीक्षा ५ वर्षांच्या आत उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार इंटरव्ह्यूसाठी पात्र आहेत.

स्टायपेंड : ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस ट्रेनी रु. १०,५००/-, डिप्लोमा अॅप्रेंटिस टेनी रु. ८,५००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

अॅप्रेंटिस ट्रेनीज, एम्प्लॉईजसाठी उपलब्ध असलेली बसची सोय आणि कँटीन सेवा घेण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा : २५ वर्षे.

वॉक-इन-इंटरव्ह्यू तपशील – वेळ सकाळी ९.०० वाजता (सकाळी १०.०० वाजेनंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.)

(१) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन ग्रॅज्युएट – २९ ऑगस्ट २०२४.

(२) मेकॅनिकल इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग/ आयटी ग्रॅज्युएट आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा – ३० ऑगस्ट २०२४.

हेही वाचा : Success Story: मूर्ती लहान, पण कीर्ती महान; २२ वर्षीय तरुणाने आधुनिक पद्धतीने केली केशरची लागवड, महिन्याला कमावतो लाखो रुपये

वॉक-इन-इंटरव्ह्यू ठिकाण – SAMEER, IIT- B Campus, Powai, Mumbai – 400076. (IIT Campus च्या मेन गेटपासून ऑफिस २ कि.मी. अंतरावर आहे.)

उमेदवारांनी www. sameer. gov. in या संकेतस्थळावरील जाहिरातीबरोबर दिलेल्या नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून सोबत पुढील मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्सचा एक संच घेऊन उपस्थित रहावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(१) १० वी/१२ वीचे मार्कशिट, (२) पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि सर्व सेमिस्टर्सचे मार्कशिट, (३) अनुभव (असल्यास) दाखला, (४) जन्मतारखेचा पुरावा, (५) दोन पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ, (६) जातीचा दाखला (लागू असल्यास).