पुणे येथील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स व नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, पुणे येथे अ‍ॅस्ट्रॉनॉमी, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स व फिजिक्स विषयांमध्ये पीएचडी करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या आययूसीएए- एनसीआरए अ‍ॅडमिशन टेस्ट (आयएनएटी- २०१७) या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अ‍ॅस्ट्रॉनॉमी अथवा अप्लाइड गणित यांसारख्या विषयांसह बीएस्सी, एमएस्सी अथवा इंटिग्रेटेड एमएस्सी किंवा बीई, बीटेक, एमई अथवा एमटेक यांसारखी पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

विशेष सूचना – जे उमेदवार वरील पात्रता परीक्षांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसणार असतील तेसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.

प्रवेश पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची पुणे येथे ७ डिसेंबर २०१७ रोजी लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांची ७ वा ८ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथेच मुलाखत घेण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित विषयातील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्यात येईल. योजनेअंतर्गत निवड झालेल्या संशोधक उमेदवारांना त्यांच्या संशोधन कालावधीसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल व यशस्वीपणे संशोधन करणाऱ्यांना पीएचडी प्रदान करण्यात येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – या संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी http://inat.ncra.tifr.res.in/inat या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१७ आहे.