आजच्या लेखामध्ये आपण आíथक आणि सामाजिक विकास या पूर्व परीक्षेमधील भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित घटकाचे स्वरूप आणि व्याप्ती याची चर्चा करणार आहोत. २०११ पासून ते २०१६ पर्यंत या घटकावर एकूण १०१ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यावरून हा घटक पूर्व परीक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे याची कल्पना आपणाला करता येते. हा अभ्यासघटक नागरी सेवा परीक्षेच्या दृष्टीने कसा अभ्यासावा व याची सुरुवात नेमकी कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. आजच्या लेखामध्ये आपण सर्वप्रथम या घटकाचे परीक्षाभिमुख स्वरूप थोडक्यात समजून घेणार आहोत.

जागतिकीकरणाच्या सर्वव्यापी परिणामामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडून आलेले आहेत. भारत सरकारने १९९१मध्ये आíथक सुधारणा धोरणाच्या अंतर्गत आíथक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केला ज्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. आपली अर्थव्यवस्था विकसनशील असल्याने समाजातील सर्व स्तरातील घटकांना समन्यायी पद्धतीने लाभ घेता यावा यासाठी सर्वसमावेशक वाढ, शाश्वत विकासाला अनुसरण आíथक विकास साध्य करणे, सामाजिक क्षेत्र उपक्रम ज्याद्वारे आíथक आणि सामाजिक सक्षमीकरण करणे इत्यादी बाबींना अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे व याची प्रचीती आपणाला १९९१ नंतर सरकारद्वारे आखल्या गेलेल्या विविध योजना, धोरणे व उपक्रम यावरून दिसून येते.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

आíथक आणि सामाजिक विकास या घटकामध्ये शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम,लोकसंख्याशास्त्र इत्यादी मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम आपण या सर्व मुद्दय़ांची थोडक्यात उकल करून घेणार आहोत.

शाश्वत विकास

ही संकल्पना अभ्यासताना, ती नेमकी काय आहे, याची वैशिष्टय़े काय आहेत, आíथक विकासच्या प्रक्रियेमध्ये या संकल्पनेशी संबंधित ध्येय धोरणे, सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्याशी संबंधित विविध घडामोडी आणि हाती घेण्यात आलेले उपक्रम याची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

गरिबी अथवा दारिद्रय़

या मुद्दय़ाचा अभ्यास करताना सर्वप्रथम याची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. गरिबी ही संकल्पना काय आहे व याचे किती प्रकार आहेत? निरपेक्ष गरिबी व सापेक्ष गरिबी काय आहे? या प्रकारच्या गरिबीचे निकष कसे ठरविले जातात? गरिबी निर्मूलनासाठी सरकारमार्फत कोणत्या योजना राबविल्या जातात, सरकारमार्फत गरिबीचे वेळोवेळी निकष ठरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या, तसेच या समित्यांनी दिलेले अहवाल इत्यादीशी संबंधित वस्तुनिष्ठ माहिती तसेच विश्लेषणात्मक आकलन असणे गरजेचे आहे.

समावेशन

भारतामध्ये जी आíथक विकास प्रक्रिया चालू आहे, त्यामध्ये समाजातील वंचित घटकापर्यंतही या प्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ कसा पोहचवता येईल तसेच या वंचित घटकाचे या प्रक्रियेमध्ये समावेशन करण्यासाठी सरकारमार्फत उपयोजित केलेली धोरणे, वित्तीय समावेशकता, इत्यादीशी संबंधित माहिती संकलित करून हा मुद्दा तयार करावा लागणार आहे.

लोकसंख्याशास्त्र

या मुद्दय़ाचा अभ्यास करताना लोकसंख्या आणि आíथक विकास याच्यामध्ये नेमका काय संबंध आहे? आíथक विकासामुळे लोकसंख्या वाढीवर कोणते परिणाम झालेले आहेत? भारतातील जनगणना पद्धत, जन्म दर, बालमृत्यू दर, आयुर्मान दर, जनसांख्यिकीय लाभांश यासारख्या संकल्पनाची मूलभूत माहिती व याच्याशी संबंधित आकडेवारी याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या स्थिरीकरण इत्यादीची माहिती असावी लागते. थोडक्यात, या मुद्दय़ाचा अभ्यास हा आíथक विकासाच्या कलेने करणे अपेक्षित आहे.

सामाजिक क्षेत्रातील उपक्रम

भारत हा कल्याणकारी राज्याचा पुरस्कर्ता आहे म्हणून या मुद्दय़ाचा अभ्यास करताना आपणाला भारतामध्ये जे सर्वसमावेशक वाढीचे धोरण आखण्यात आलेले आहे, त्यानुसार हा घटक अभ्यासणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात समाजातील विविध घटकांसाठी सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या निरनिराळ्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या योजना, उपक्रम इत्यादीची माहिती अभ्यासणे क्रमप्राप्त आहे. उपरोक्त पद्धतीने आपणाला या विषयाची सर्वसाधारण समज असावी लागते, तसेच हे सर्व नमूद मुद्दे एकमेकांशी संलग्न आहेत.  त्यामुळे सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती प्राप्त करणे गरजेचे आहे. उपरोक्त सर्व मुद्दय़ांतर्गत अनेक संकल्पनाचे  योग्य आकलन करणे गरजेचे आहे.  याव्यतिरिक्त आपणाला सर्वसमावेशक वाढ, कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, भारतीय वित्तीय प्रणाली, भारताचा परकीय व्यापार, इत्यादीविषयी माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. जरी हे विषय आíथक आणि सामाजिक विकास या घटकांतर्गत प्रत्यक्षरीत्या नमूद केलेले नसले तरीही गतवर्षीच्या प्रश्न विश्लेषणावरून या विषयावर अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, हे आपल्या लक्षात येते. या घटकावर चालू घडामोडीच्या अनुषंगाने सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. यापुढील दोन लेखांमध्ये आपण या घटकावर विचारण्यात आलेल्या गतवर्षीय परीक्षेतील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेऊन या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने कशी तयारी  करावी व नेमके कोणते संदर्भ साहित्य या घटकाचा अभ्यास करण्यासाठी वापरावे, याविषयी चर्चा करणार आहोत.