19 March 2019

News Flash

आयआयटी- मोनॅश अकादमीची संशोधनपर पीएचडी

अर्जदारांनी विज्ञान वा अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई व ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्न येथील मोनॅश अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील प्रगत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर पीएचडीच्या २०१८ या सत्रासाठी खालीलप्रमाणे नोंदणी करण्यात येत आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

अर्जदारांनी विज्ञान वा अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी जीएटीई, जीआरई, सीएसआयआर, नेट, जेएएम यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी व त्यांना संबंधित क्षेत्रातील संशोधनपर कामामध्ये आवड असायला हवी. संगणकाचे अद्ययावत ज्ञान आवश्यक.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना समूह चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित विषयातील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्यात येईल.

योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधनाच्या एक वर्ष कालावधीसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना आयआयटी मुंबई व मोनॅश अकादमीच्या तज्ज्ञांकरवी त्यांच्या संशोधनपर पीएचडीसाठी शैक्षणिक व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात येईल. या कालावधीत त्यांना संबंधित विषयातील तज्ज्ञांसह काम करण्याची संधीपण देण्यात येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी

संपर्क- या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली आयआयटी मोनॅश अकादमीची जाहिरात पाहावी अथवा www.iitbmonash.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०१८ आहे.

विज्ञान- अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्या पदवीधरांना आयआयटी व विदेशी संशोधन संस्थेच्या सहकार्यासह विदेशी विद्यापीठातून संशोधनपर पीएचडी करायची असेल त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

First Published on March 9, 2018 12:26 am

Web Title: iitb monash research academy