26 February 2021

News Flash

महाराष्ट्रातील महत्त्वाची विद्यापीठे

मुंबई विद्यापीठ हे जगातल्या मोठय़ा महाविद्यालयांपैकी एक असून या विद्यापीठाअंतर्गत ७११ महाविद्यालये आहेत.

का? कुठे? कसे?

आपल्याला शैक्षणिक कोर्सेस करायचे असतील तसेच विविध शाखांमधून उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर महाराष्ट्रातील विद्यापीठे तसेच शिक्षणसंस्था यांची माहिती संग्रही असणे आवश्यक आहे.

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात जूने विद्यापीठ असून यात पदवी शिक्षण ते व्यावसायिक शिक्षणापर्यंत अनेक कोर्सेस इथे उपलब्ध आहेत. या विद्यापीठाची महाविद्यालये व कार्यालये कलीना, ठाणे व फोर्ट येथे आहेत. कलीना व ठाणे येथे शैक्षणिक कोर्सेसचे काम चालते. मुंबई विद्यापीठ हे जगातल्या मोठय़ा महाविद्यालयांपैकी एक असून या  विद्यापीठाअंतर्गत ७११ महाविद्यालये आहेत.

डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

दापोलीमध्ये असणाऱ्या या कृषी विद्यापीठाची सुरूवात १९७२मध्ये झाली होती. २००१ साली या विद्यापीठाला डॉ बाबासाहेब

सावंत यांचे नाव देण्यात आले.

याचे संशोधन केंद्र कर्जत मध्ये असून तेथे त्यांनी भाताच्या काही प्रकारांची शेती तयार केली आहे. येथे भात, बागायतीशेती, मासेमारी यावर जास्त लक्ष केंद्रीत केले जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

औरंगाबादमध्ये १९५८ साली सुरू झालेले हे विद्यापीठ मराठवाडय़ातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे. या भागात शिक्षणाचा प्रसार आणि विकास करण्याचे कार्य या विद्यापीठाने केले आहे. या विद्यापीठाअंतर्गत ४० महाविद्यालये येतात. एकूण विद्यार्थीसंख्या ४ लाख ४४ हजार ३३६ इतकी आहे

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र खुले विद्यापीठ

१९५६ साली उभारण्यात आलेल्या या विद्यापीठाचे मुख्य कार्यालय नाशिक येथे आहे.

१० ठिकाणी या विद्यापीठाची महाविद्यालये आहेत. अमरावती, औरंगाबाद, कल्याण, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नांदेड, नागपूर, पुणे, सोलापूर येथे या विद्यापीठाच्या शाखा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:56 am

Web Title: important universities in maharashtra
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : ओळखा प्रश्नांचा रोख
2 करिअरमंत्र : बायोमेडिकलच्या पुढे काय?
3 वेगळय़ा वाटा : पेट ग्रूमिंगमधील संधी
Just Now!
X