30 September 2020

News Flash

नोकरीची संधी

भरती प्रक्रियेसाठी गेट- २०१७ स्कोअर व्हॅलिड असेल.

ग्रॅज्युएट ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (गेट२०१७) मधील स्कोअरच्या आधारे भारतीय नवरत्न कंपन्यांमध्ये अधिकारी पदावर अभियांत्रिकी पदवीधरांची भरती.

(१) िहदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) सिव्हिल, केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन. सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ www.hindustanpetroleum.com >career opportunities किंवा  www.hpclcareers.com वर दि. १० जानेवारी २०१७ ते १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत अर्ज करावेत.

(२) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) मेकॅनिकल/केमिकल इंजिनीअर. सविस्तर जाहिरात https://bharatpetroleum.com/careers/careers.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज https://bharatpetroleum.com/careers/current-openings.aspx या संकेतस्थळावर दि. ६ जानेवारी २०१७ ते १० फेब्रुवारी २०१७ दरम्यान करावेत.

(३) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (ईटी) म्हणजेच कार्यकारी प्रशिक्षणार्थी मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सची भरती. अर्ज  www.mazdock.com अंतर्गत career>executives या संकेतस्थळावर दि. ६ जानेवारी २०१७ ते ६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.

(४) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) रिक्रुटमेंट अँड असेसमेंट सेंटर (आरएसी) मध्ये गेट स्कोअरनुसार सायंटिस्ट ‘बी’ पदावर भरती. www.drdo.gov.in http://www.drdo.gov.in/  आणि www.rac.gov.in  http://www.rac.gov.in/ या संकेतस्थळावर योग्य वेळी विस्तृत जाहिरात प्रसिद्ध होईल.

पात्रता – संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/विकलांग – किमान ५०टक्के गुण) जर पदवी परीक्षेचे गुणपत्रक दि. ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत सादर करू शकले तर पदवीच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असतील. उमेदवारांना ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (गेट) २०१७ परीक्षा संबंधित पेपर कोडसाठी द्यावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी गेट- २०१७ स्कोअर व्हॅलिड असेल.

वेतन – सीटीसी रु. १० लाख प्रतिवर्ष. निवडलेल्या उमेदवारांना १ वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधी (प्रोबेशन) ला सामोरे जावे लागेल.

अर्ज कसा करावा – उमेदवारांना प्रथम गेर्ट-२०१७ साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन  www.gate.iitb.ac.in किंवा  http://appsgate.iitr.ernet.in/ या संकेतस्थळावर दि. ४ ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत. त्यानंतर दिलेल्या मुदतीत कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करावा.

 

भारतीय नौदलात अभियांत्रिकी पदवीधर अविवाहित पुरुष/महिला यांना पायलट/नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन ऑफिसर (एनएआयसी) होण्याची सुवर्णसंधी.

पायलट/एनएआयसी एन्ट्री कोर्समधून शॉर्ट सíव्हस कमिशन मिळविण्याची संधी. कोर्स जून २०१७

पासून सुरू होणार.

पात्रता – पायलट पदांसाठी अभियांत्रिकी पदवी किमान ६०टक्के गुणांसह (कोणत्याही शाखेतील) एनएआयसी पदांसाठी – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इन्स्ट्रमेंटेशन/ आयटी/केमिकल/मेटॅलर्जी/एअरोस्पेस इंजिनीअरिंग पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण अथवा या विषयांतील अंतिम वर्षांचे उमेदवार.

वयोमर्यादा – (अ) पायलटसाठी १९ ते २४ वष्रे. उमेदवाराचा जन्म दि. २ जुल १९९३ ते १ जुल १९९८ दरम्यानचा असावा. (सीपीएल होल्डर्ससाठी

१९-२५ वष्रे)

(ब) एनएआयसी – १९ १/२ ते २५ वष्रे (उमेदवाराचा जन्म २ जुल १९९२ ते १ जानेवारी १९९८ दरम्यानचा असावा.) शारीरिक मापदंड – (अ) पायलट – उंची – १६२.५ सें.मी. (ब) एनएआयसी – उंची – १५७ सें.मी. पुरुष, १५२ सें.मी. महिला.

वेतन – नियुक्तीनंतर सब-लेफ्टनंट पदावर कमिशन होणार. सीटीसी रु. ९०,०००/- प्रतिमाह (सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनात वृद्धी होणार.) उमेदवारांची पायलट पदासाठी रु. ५७ लाखांचा आणि एनएआयसी पदासाठी रु. ५० लाखांचा ग्रुप इन्शुरन्स उतरविला जाईल.

निवड पद्धती – डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या एसएसबी मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलाविले जाईल. एसएसबीने निवडलेल्या मुलांना पायलट पदासाठी पायलट अ‍ॅप्टिटय़ूड बॅटरी टेस्ट (पीएबीटी) पास केल्यास आणि मेडिकल टेस्टमध्ये फिट ठरल्यास गुणवत्तेनुसार अंतिम निवड. दोन्ही पदांसाठी जास्तीतजास्त १४ वर्षांसाठी शॉर्ट सíव्हस कमिशन दिले जाईल.

ट्रेिनग – जून २०१७ पासून इझिमाला, केरळ येथे सुरू होणार. ट्रेिनगदरम्यान उमेदवारांना पूर्ण वेतन दिले जाईल.

अर्ज कसा करावा – अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.joinindiannavy.gov.in  http://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दि. ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची िपट्रआउट काढून त्यावर पासपोर्ट साइझ फोटो चिकटवून योग्य जागी सही करून आवश्यक त्या कागदपत्रांसह पोस्ट बॉक्स नं. २, सरोजिनी नगर पोस्ट ऑफिस, न्यू दिल्ली – ११० ०२३ या पत्त्यावर दि. १० ऑक्टोबर २०१६ पर्यंत पोहोचतील अशी पाठवावी.

 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, माझगाव, मुंबई येथे दोन वर्षांच्या कंत्राटी तत्त्वावर कुशल श्रेणी मधील विविध पदांची ओबीसी/एस्सी/एसटी उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम. (जाहिरात क्र. ८३/२०१६)

पदाचे नाव/पद संख्या –

(१) रिगर – (इमाव – २६, अज – २),

(२) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – (इमाव – १३),

(३) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – (इमाव – २, अज – १),

(४) ज्युनियर क्यू.सी. तपासनीस मेकॅनिकल – (इमाव – २, अज -१),

(५) कंपोझिट वेल्डर – (इमाव – ३, अज – २),

(६) फिटर – (अज – २),

(७) मिलराइट मेकॅनिक – (इमाव – १, अज – १),

(८) इलेक्ट्रिशियन – (अजा – २),

(९) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – (अजा – २) इत्यादी.

पात्रता – १०वी उत्तीर्ण. अधिक संबंधित ट्रेडमधील नॅशनल अप्रँटिसशिप सर्टििफकेट परीक्षा उत्तीर्ण. (पद क्र. ९) ज्युनियर क्यू.सी. तपासनीस (मेकॅनिकल) साठी – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास ज्या उमेदवारांनी फिटर/शीट मेटल फॅब्रिकेटर ट्रेडमधील एनएसी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना दोन महिन्यांच्या ट्रेनी स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/ट्रेनी रिगर या पदांसाठी दरमहा रु. ५,०००/- च्या स्टायपेंडवर भरती केले जाईल. अशा उमेदवारांचा एकूण करार २ वर्षांसाठीच असेल.

वयोमर्यादा – १८ ते ३३ वष्रे (अजा /अज – १८ ते ३८ वष्रे, इमाव – १८ ते ३६ वष्रे). वेतन – रु. ७,५००/- दरमहा. अधिक नियमानुसार औद्यागिक महागाई भत्ता, एचआरए, ट्रान्सपोर्ट सबसिडी, इ.

निवड पद्धती – लेखी परीक्षेतील पात्र उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलाविले जाईल.

अर्ज कसा करावा – अर्ज विहित नमुन्यात जो www.mazgaondock.gov.in  http://www.mazgaondock.gov.in/ या संकेतस्थळावर करिअर नॉन-एक्झिक्युटिव्ह अ‍ॅडव्हर्टाइज रेफरन्स नं. एच्आर-आरईसी-एनई/बीएल/८३/२०१६ येथून ए-४ साइजच्या कागदावर डउनलोड करून पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह व ऑनलाइन डाउनलोड केलेल्या एसबीआय चलानवर रु. १४०/- भरून

त्याची एमडीएल कॉपी जोडून (अजा/अजसाठी फी नाही.) पुढील पत्त्यावर दि. २८ सप्टेंबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

“DGM (HR-Rec-NE), Recruitment Cell, Service Block, 3rd Floor, Mazgaon Dock, Ship Builders Ltd., Dockyard Road, Mumbai – 400 010.”

 

नेहरू युवा केंद्र संघटनेत जिल्हा समन्वयकांच्या जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली नेहरू युवा केंद्राची जाहिरात पाहावी

अथवा www.nyks.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

तपशीलवार भरलेले अर्ज डायरेक्टर जनरल, नेहरू युवा केंद्र संघटना, कोर-४, दुसरा मजला, स्कोप मिनार, लक्ष्मीनगर, जिल्हा केंद्र, दिल्ली- ११००९२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०१६.

 

संरक्षण मंत्रालयांतर्गत डायरेक्टोरेट जनरल ऑफ एरोनॉटिकल क्वालिटी ॅशुरन्समध्ये फोरमन मेकॅनिकलच्या जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.upsconline.nic या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०१६.

 

हाऊसिंग ॅण्ड डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या ६५ जागा. वयोमर्यादा २६ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली ‘हुडको’ची जाहिरात पाहावी. अथवा www.hudco.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज हाऊसिंग अ‍ॅण्ड अर्बन डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लि,, ‘हुडको भवन’ कोर- ७ए, इंडिया हॅबिटल सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१६.

 

कंट्रोलरेट ऑफ क्वालिटी ॅशुरन्स (ॅम्युनेशन)खडकी पुणे येथे बहुविध कर्मचाऱ्यांच्या जागा.

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.

अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या

१० ते १६ सप्टेंबर २०१६च्या अंकातील कंट्रोलरेट ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स, खडकी, पुणेची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील व संपूर्णपणे भरलेले अर्ज दि कंट्रोलर, कंट्रोलरेट ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स (अ‍ॅम्युनेशन) खडकी, पुणे- ४११००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१६.

 

संरक्षण मंत्रालयांतर्गत अहमदनगर येथे आचाऱ्यांच्या जागा.

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व विविध प्रकारच्या पाककृती बनविण्यासाठी पात्र असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.

अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ सप्टेंबर २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिन ब्रँच (सिव्हिल सेक्शन) हेडक्वार्टर्स एमआयआरसी, दरेवाडी, सोलापूर रोड, नगर- ४१४११० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१६.)

 

एअर इंडिया इंजिनीअिरग íव्हसेस लिमिटेडमध्ये तंत्रज्ञांसाठी संधी

(१) एअरक्राफ्ट टेक्निशियनच्या एकूण ९५१ पदांची भरती (अजा – १४३, अज – ७१, इमाव – २५८, खुला – ४८९)

पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनीअरींग/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंगमधील पदविका किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/इमाव – ५५टक्के) किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंगमधील डीजीसीए मान्यता प्राप्त प्रमाणपत्र कोर्स किमान ६० गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/इमाव – ५५टक्के)

(२) ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअर) एकूण २७० जागा (अज – ४१, अज – २१, इमाव – ७५, खुला – १४३).

(३) ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (इंजिनीअरिंग सपोर्ट सíव्हसेस) एकूण १०२ जागा (अजा – १४, अज – ७, इमाव – २७, खुला – ५३)

पात्रता – २ आणि ३ साठी

मेकॅनिकल/एअरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयांतील अभियांत्रिकी पदवी आणि जीएटीई (गेट) स्कोअर किमान ८० टक्के (अजा/अज/इमाव – ७५ टक्के).

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. १ जुल २०१६ रोजी २८ वष्रेपर्यंत (अजा/अज – ३३ वष्रे, इमाव – ३१ वष्रे)

निवड पद्धती – पात्र उमेदवारांना मुंबई, नवी दिल्ली, कलकत्ता किंवा हैद्राबाद या केंद्रांवर लेखी परीक्षा द्यावी लागेल. यातील गुणवत्तेनुसार उमेदवारांची ५ वर्षांच्या करारावर निवड केली जाईल.

परीक्षा शुल्क – रु. १,०००/- ऑनलाइन एसबीआय चलनामार्फत (अजा/अज/मा.स. यांना फी माफ आहे.)

वेतन – एक वर्षांच्या ट्रेिनगदरम्यान रु. १५,०००/- दरमहा. ट्रेिनग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास एअरक्राफ्ट टेक्निशियन या पदावर रु. १७,६८०/- दरमहा वेतन. (वेतनवाढ विचाराधीन आहे.)

अर्ज कसा करावा

www.airindia.in  http://www.airindia.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दि. ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत करावा. ऑनलाइन अर्जाची िपट्रआउट आवश्यक त्या कागदपत्रांसह पोस्ट बॉक्स नं. १२००६, कोस्सीपोरे पोस्ट ऑफिस, कलकत्ता – ७०० ००२ या पत्त्यावर दि. १५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. (एअरक्राफ्ट टेक्निशियन पदासाठी अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०१६ आहे.)

 

केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च ॅण्ड डेव्हल्पमेंटमध्ये शिपायांच्या ३२ जागा.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ सप्टेंबर २०१६च्या अंकातील ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटची जाहिरात पाहावी.

तपशीलवार अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१६.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 12:30 am

Web Title: job opportunities 22
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : कर्तव्यवाद आणि नैतिकता
2 एमपीएससी मंत्र : पैलू कृषी क्षेत्राचे
3 करिअरनीती : घरी .. बाहेरी
Just Now!
X