नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लि. श्रीगंगानगर, राजस्थानमध्ये एकूण ५८ ट्रेनी पदांची भरती.

(१) सिनियर ट्रेनी (मार्केटिंग – २ पदे)/क्वलिटी कंट्रोल (२ पदे)/हॉर्टकिल्चर (१ पद).

पात्रता – एमबीए/एमएस्सी (अ‍ॅग्रि.)

किमान ५५ % गुणांसह उत्तीर्ण.

(२) डिप्लोमा ट्रेनी (अ‍ॅग्रो इंजिनीअरिंग).

पात्रता – संबंधित पदविका किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण. (३) ट्रेनी एचआर (४ पदे).

पात्रता -५५% गुणांसह पदवी ट्रेनी अ‍ॅग्रिकल्चर (२७ पदे).

पात्रता – बी.एस्सी. (अ‍ॅग्रि.) किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.

ट्रेनी (डीईओ) (२ पदे).

पात्रता – बीसीए/बी.एससी. कॉम्प्युटर सायन्स/आयटी किंवा कोणतीही पदवी १ वर्षांची कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमधील पदविका.

ट्रेनी (टेक्निशियन) (१५ पदे) (इलेक्ट्रिशियन/वेल्डर/डिझेल मेकॅनिक/ट्रॅक्टर मेकॅनिक/मशीनमॅन).

पात्रता – एनसीव्हीटी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.

ट्रेनी स्टोअर्स – संबंधित पदविका (मेकॅनिकल/अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग इ. किंवा बी.एससी. (अ‍ॅग्रि.)) किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – सर्व पदांसाठी २७ वष्रे.

(इमाव – ३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रे) ऑनलाइन अर्ज  http://www.indiaseeds.com/ वर दि. १५ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

 

सीएसआयआर – नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, पुणे येथे वैज्ञानिक (१५ पदे) आणि वरिष्ठ वैज्ञानिक (१० पदे) पदांची भरती

विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या एमई/एमटेक/पीएचडी उमेदवारांना संधी.

वयोमर्यादा – (दि. १० एप्रिल २०१७ रोजी) ३२ वष्रे. (वैज्ञानिक पदासाठी) आणि ३७ वष्रे (वरिष्ठ वैज्ञानिक पदासाठी).

वेतन – दरमहा रु. ७५,५४१/- (वैज्ञानिक), रु. ८६,६४४/- (वरिष्ठ वैज्ञानिक)

ऑनलाइन अर्ज  http://recruit.ncl.res.in/ या संकेतस्थळावर दि. १० एप्रिल २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची िपट्रआउट स्वीकारण्याची अंतिम तारीख ३ मे २०१७.

 

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., कलकत्ता येथे ७ अ‍ॅक्च्युरियल अ‍ॅप्रेंटिसपदांची भरती.

पात्रता – किमान ६०% गुणांसह पदवी

(कोणतीही शाखा) (अजा/अज – ५५% गुण). अधिक इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅक्च्युअरीज ऑफ इंडिया किंवा इन्स्टिटय़ूट अँड फॅकल्टी ऑफ अ‍ॅक्च्युअरीज लंडन यांचे किमान ५ अ‍ॅक्च्युअरियल पेपर उत्तीर्ण.

वयोमर्यादा – २१ ते २७ वष्रे (इमाव – ३०, अजा/अज – ३२ वष्रे). स्टायपेंड – दरमहा रु. २५,०००/- (पहिले वर्ष),  रु. ३०,०००/-

(दुसरे वर्ष).  विस्तृत माहिती http://www.nationalinsuranceindia.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०१७.

 

सीएसआयआर- स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग रिसर्च सेंटर, चेन्नई येथे वैज्ञानिक आणि वरिष्ठ वैज्ञानिकांच्या एकूण ११ पदांची भरती.

पात्रता – एमई/एमटेक. (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग/अप्लाइड मेकॅनिक्स/ एअरोस्पेस इंजिनीअरिंग/डिझाइन इंजिनीअरिंग) वरिष्ठ वैज्ञानिकांसाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – वैज्ञानिकांसाठी ३२ वष्रे, वरिष्ठ वैज्ञानिकांसाठी ३७ वष्रे. पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील.

वेतन – वैज्ञानिक – रु. ७५,५११/-  वरिष्ठ वैज्ञानिक – रु. ८४,७१४/-

परीक्षा शुल्क – रु. ५००/-. ऑनलाइन अर्ज http://serc.res.in/ या संकेतस्थळावर दि. ३ मे २०१७ पर्यंत करावेत.

आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्जाची िपट्रआउट स्वीकारण्याचा अंतिम दि. १५ मे २०१७ आहे.

 

कृषी वैज्ञानिक निवड मंडळ (अ‍ॅग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्ड (एएसआरबी)नवी दिल्ली, अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सíव्हस (एआरएस) –

परीक्षा-२०१६ आणि सोबत नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एनईटी-१) – २०१७ घेणार.

यातून अ) कृषी संशोधनातील १८० वैज्ञानिकांच्या पदांसाठी निवड आणि ब) कृषी विद्यापीठात लेक्चरर/साहाय्यक प्रोफेसरच्या पदांसाठी निवड करणार.

पात्रता – दिनांक ८ जुल २०१७ रोजी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – एआरएससाठी २१ ते ३२ वष्रे. एनईटीसाठी किमान २१ वष्रे कमाल मर्यादा नाही. पूर्वपरीक्षा ऑनलाइन पद्धतीने दि. १६ मे ते २१ मे २०१७ दरम्यान होईल. मुख्य परीक्षा दि. ८ जुल २०१७ रोजी होईल.

परीक्षा शुल्क – दोन्ही परीक्षांसाठी रु. १,५००/- (इमाव – रु. १,०००/-, अजा/ अज – रु. २५०). ऑनलाइन अर्ज   http://www.asrb.org.in/ आणि  http://www.icar.org.in/  या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.