रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया- मुंबई अंतर्गत साहाय्यकांच्या ६२३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा आरबीआयच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१७.

इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन लि. मुंबई येथे मॅनेजर/ असिस्टंट मॅनेजर- एचआर म्हणून संधी-

अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन मुंबईची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या  hr.iprcl@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशन लि., ४ था मजला, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, एम. पी. रोड, माझगाव (पूर्व), मुंबई- ४०००१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१७.

राष्ट्रीय महिला आयोगामध्ये कनिष्ठ कारकुनांच्या ७ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय महिला आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.ncw@nic.in ¹FF संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज उपसचिव, राष्ट्रीय महिला आयोग, प्लॉट नं. २१, जसोला इंन्स्टिटय़ुशनल एरिया, नवी दिल्ली ११००२५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१७.

इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे टेक्निकल सुपरिंटेंडेंटच्या ७ जागा-

अर्जदार बीई-बीटेक, एमएससी- एमसीए असावेत व त्यांना संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव असायला हवा किंवा ते इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा ६ वर्षांचा अनुभव असावा अथवा ते बीई- बीटेक असावेत व संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव असायला हवा.

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा आयआयटी मुंबईच्या  http://www.iitb.ac.in/ en/ careers/ staff- recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१७.

इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स, नागपूर येथे चीफ केमिस्ट म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स, नागपूरची जाहिरात पाहावी अथवा आयबीएमच्या http://www.ibm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कंट्रोलर जनरल, इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१७.