भारत सरकार संरक्षण मंत्रालय (जाहिरात क्र. ०२/२०१७) भारतीय नौदलाच्या नेव्हल अर्मीमेंट इन्स्पेक्शन ऑर्गनाझेशनमध्ये, वेस्टर्न नेव्हल कमांड मुख्यालय, मुंबई येथे चार्जमनच्या एकूण ९९ पदांची भरती.

(अ) चार्जमन (मेकॅनिक) – ५८ पदे (यूआर – ३६, इमाव – १५, अजा – ५, अज – २) (विकलांग ओएच – २, एचएच – २, व्हीएच – १ जागा राखीव)

पात्रता – फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथेमॅटिक्स विषयासह बी.एस्सी. उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन इंजिनीअिरगमधील डिप्लोमा उत्तीर्ण

(ब) चार्जमन (अ‍ॅम्युनिशन अ‍ॅण्ड एक्सप्लोझिव्ह) – ४१ पदे (यूआर – १५, इमाव – ६, अजा – १४, अज – ६) (ओएच – १, एचएच – १ पद राखीव)

पात्रता – फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा गणित विषयात बी.एस्सी. किंवा केमिकल इंजिनीअिरग डिप्लोमा. वयोमर्यादा दोनही पदांसाठी १८ ते २५ वष्रे (इमाव – २८ वष्रे, अजा/अज – ३० वष्रेपर्यंत, विकलांग -३५/३८/४० वष्रेपर्यंत)

वेतन- पे बँड रु. ३५,४००-८१,२००/-

लेव्हल – ६.

विस्तृत जाहिरात इम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २ डिसें. २०१७ च्या अंकात पाहावी.

ऑनलाइन अर्ज  http://hqwncrecruitment.com या संकेतस्थळावर दि. २५ डिसें. २०१७ दरम्यान करावेत.

मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमार्फत ४ वर्षांचा बी-एस्सी (नर्सिंग) कोर्स – २०१८

एकूण १६० जागांसाठी. प्रवेश फक्त अविवाहित /परित्यक्ता/विधवा महिला उमेदवारांसाठी .

पात्रता- बारावी विज्ञान (फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजी/ इंग्रजी विषयांसह किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (१२ वी परीक्षेस फेब्रु./मार्च २०१८ मध्ये परीक्षेस बसणाऱ्या महिलासुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – जन्म १ ऑक्टो. १९९३ ते ३० सप्टेंबर २००१ दरम्यानचा असावा.

निवड पद्धती- फेब्रुवारी (२०१८) महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ९० मिनिटे कालावधीच्या लेखी परीक्षेस सामोरे जावे लागेल. मे २०१८ मध्ये मुलाखत द्यावी लागेल.

लेखी परीक्षा आणि मुलाखत यातील एकत्रित गुणवत्तेवर आधारित अंतिम निवड केली जाईल. कॉलेज ऑफ नर्सिंग (CON)

१) आम्र्ड फोस्रेस मेडिकल कॉलेज, पुणे –  ३० जागा

२) आयएनएचएस आश्विनी मुंबई – ३० जागा, नवी दिल्ली, लखनौ येथे प्रत्येकी ३० जागा, कलकत्ता आणि बंगलोर येथे प्रत्येकी २० जागा.

नर्सिंग कोर्स पूर्ण झाल्यावर किमान ५ वष्रे नर्सिंग सíव्हसेसमध्ये काम करण्याचा करार (Bond) करावा लागेल.

शारीरिक मापदंड- उंची- १४८ सेंमी.

लेखी परीक्षा, मुंबई, पुणे इ. केंद्रांवर घेतली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.com संकेतस्थळावर दि. ३० डिसें. २०१७ पर्यंत करावेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवर ३९३ लेखनिक पदांची भरती.

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, किमान ५० टक्के गुण.

वयोमर्यादा –  दि. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी कमाल ३८ वष्रे.

वेतन – रु. १४,६०० + इतर भत्ते.

निवड पद्धती – लेखी परीक्षा – ९० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. या परीक्षेमध्ये बँकिंग, मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असेल.

परीक्षेचे माध्यम – इंग्रजी / मराठी.

मुलाखत – १० गुणांसाठी.

प्रोबेशन पिरियड –  एक वष्रे, संकलित पगार रु. १३,५००/- दरमहा.

ऑन लाइन अर्ज व लेखी परीक्षेचे शुल्क

रु. ७५०/- हे www.pdccbank.com/  या संकेतस्थळावर भरावे. या संकेतस्थळावरील carrier या पर्यायामध्ये यासंबंधीची अधिक माहिती मिळेल. ऑन लाइन अर्ज १६ डिसेंबर २०१७ या तारखेपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत करायचे आहेत.