कोकणातील विकासकामांची गती वाढविण्यासाठी, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावामध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे या उद्देशाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम ही योजना राबिवण्यात येत आहे.

  • कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरीय समिती व प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणी समिती गठित करण्यात आली आहे.
  • कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत पर्यटनाच्या दृष्टीने प्रचलित असा एखादा गावाचा समूह अस्तित्वात असल्यास त्या समूहाच्या पर्यटनविकासास प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • स्थानिक ग्रामस्थांना पर्यटनविकासासाठी सक्षम करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने पाठय़क्रम आयोजित करणे, ग्रामस्थांना प्रशिक्षण देणे, कोकण कृषी विद्यापीठात कोकण पर्यटनास उपयुक्त प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यास साहाय्य करणे असे उपक्रम राबविण्यात येतात.
  • स्थानिक ग्रामस्थांना अशा कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास पर्यटनास पूरक उद्योग उभारण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्या कर्जाच्या चार टक्क्यांच्या वरील मात्र १२ टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत व्याजाच्या रकमेचा फरक राज्यस्तरीय समिती मंजूर करणार आहे.
  • गावातून पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्याची बांधणी, विद्युतव्यवस्था, वाहनतळ उभारणे यांसारखी कामे या कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आली आहेत. शासनामार्फत त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे.
  • कोकण हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शासनाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळून गावांच्या सौंदर्यस्थळांचे बळकटीकरण होऊन गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

अधिक माहितीसाठी: https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=559rkts/PHE=

land, industrial development, Kolhapur,
कोल्हापुरात औद्योगिक विकासासाठी उद्योगासाठी ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करणार – उदय सामंत
kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट