रशियातील सरकारी विद्यापीठांनी एमबीबीएस आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांना जाऊ  इच्छिणाऱ्या भारतातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. रशियातील सरकारी विद्यापीठांमध्ये जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा उपलब्ध असतात आणि संशोधन सुविधाही उच्च दर्जाच्या असतात. शिवाय उच्चविभूषित प्राध्यापक असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडते.

एमबीबीएस हा अभ्यासक्रम राबवणाऱ्या रशियन सरकारच्या विद्यापीठांमध्ये आय एम सेचेनॉव्ह मॉस्को मेडिकल युनिव्हर्सिटी, टॅमबॉव्ह स्टेट विद्यपीठ, पायटीगॉस्र्क वोल्गोग्रॅड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, अ‍ॅस्ट्राखान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, साराटोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि रशियातील युरोपियन भागातील इतरही विद्यापीठांचा समावेश आहे.

99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

रशियातील कॉन्सुलेट जनरल ऑफ रशियन फेडरेशनने ‘एडय़ुरशिया’ला भारतातील रशियन सरकार आणि सरकारी विद्यापीठांमधील प्रवेशासाठीचे अधिकृत प्रवेश विभाग म्हणून अधिकृत केले आहे. हा विभाग भारतात रशियन सरकारच्या विद्यापीठांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विभाग म्हणूनही कार्यरत आहे. मॉस्को मेडिकल युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विभागातील वरिष्ठ असोसिएट डॉ. मिखाईल जी म्हणाले, ‘‘रशियन विद्यापीठांतून विद्यार्थीच नव्हे तर संशोधक घडवण्याचे प्रमाण मोठे आहे. म्हणूनच गेल्या १५ ते २०

वर्षांत रशियामध्ये येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे.’’ अधिक माहितीसाठी विद्यार्थी त्यांच्या शंका apply@edurussia.in  वर पाठवू शकतात किंवा ०२२-६१०५४५४८ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना  रशियातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आपला अर्ज ‘एडय़ुरशिया’ या प्रवेश विभागाच्या अधिकृत केंद्राकडून पुढे जाईल एवढी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे फसवणुकीच्या घटना टाळता येऊ शकतील. तसेच रशियामधील विद्यापीठांमध्ये कोणत्याही प्रकारची पॅकेज पद्धत नसते. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी  भारतात कोणत्याही प्रकारचे शुल्क भरू नये. काही व्यक्ती या विभागाचे एजंट असल्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सावध राहावे, असे  ‘एडय़ुरशिया’चे मनोज पत्की यांनी स्पष्ट केले आहे