प्रज्ञा शिदोरे 

pradnya.shidore@gmail.com

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

जगभरातील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्थांबरोबर काम करण्याचा दांडगा अनुभव असणारी देवकी सध्या त्याच संस्थेबरोबर ‘सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक’ या देशामधील संघर्षांला बळी पडलेल्या लोकांसाठी काम करते आहे. पुण्यातील सामाजिक उपक्रमांनी सुरू झालेला तिचा हा प्रवास अर्थशास्त्र, फ्रान्स भाषा आणि ‘इंटरनॅशनल पब्लिक मॅनेजमेंट’च्या अभ्यासामुळे अधिक व्यापक झाला आणि पुढे लेबनानमधील बैरूत येथे  ती युनायटेड नेशन्सच्या पॅलेस्टीनियन निर्वासितांसाठीच्या मदत आणि विकासासाठी काम करणाऱ्या यंत्रणेमध्ये सहभागी झाली. स्वयंसेवक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी देवकी एरंडे जगातल्या असमानतेमुळे निर्माण झालेल्या संघर्षांविरोधात लढते आहे. तिथल्या लोकांना जगवते आहे..

हे जग सर्वासाठी समान नाही! या असमानतेमुळे इथे चालू असलेला संहार, पर्यावरणाचा ऱ्हास, पक्षपाती धोरणं, मोठय़ा प्रमाणात येणारे साथीचे आजार आणि युद्ध यामुळे २०१९ वर्ष हे गेल्या दशकातलं सर्वात उदास, किंवा निराशाजनक वर्ष होतं, असं ‘गॅलप’चा २०१९ चा ‘ ग्लोबल इमोशन्स रिपोर्ट’ सांगतो. यामध्ये सर्वात निराशाजनक अनुभव हे ‘सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक’ या देशामध्ये राहत असलेल्या लोकांनी व्यक्त केले. देवकी एरंडे ही याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्थांबरोबर विविध कारणांनी तिथल्या संघर्षांचे बळी गेलेल्या लोकांसाठी काम करते आहे.

जगभरातील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्थांबरोबर काम करण्याचा दांडगा अनुभव असणारी देवकी मूळची पुण्याची. हुजूरपागेतून शालेय शिक्षण संपवून तिने फग्र्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला तो फक्त खरंतर पुरुषोत्तम करंडक नाटय़स्पर्धेत भाग घेण्यासाठी. पण हळूहळू कॉलेजतर्फे आणि रोटरॅक्ट क्लबमार्फत ती अनेक सामाजिक कामांमध्ये गुंतत गेली. फर्ग्युसनमधून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर देवकीनं पुणे महाविद्यालयातून फ्रेंच ट्रान्सलेशन या विषयात पद्व्युत्तर शिक्षण घेतलं. याच काळात तिने पुण्यातल्या सामाजिक प्रश्नांवर बरेच उपक्रम केले. त्यामध्ये गणपती उत्सवाच्या काळात निर्माल्य नदीत टाकलं जाऊ नये, म्हणून लोकशिक्षणाचं काम असो, किंवा परिसर संस्थेबरोबर पुणेकरांनी दुचाकीचा वापर टाळून सायकलचा वापर वाढवावा यासाठी केलेलं काम असो हे समाजाला उपयोगी होईल असं काम तिचं करिअर ठरेल अशी तिला अजिबात कल्पना नव्हती, असं देवकी म्हणते. भाषा म्हणजे संस्कृती, विचार करण्याची पद्धत. म्हणून कोणतीही नवीन, परकीय भाषा आपलं भावविश्व समृद्ध करते. असाच अनुभव देवकीलाही आला. तिच्या या वेगळ्या वाटेचा पाया हा फ्रेंच भाषा शिकण्यापासून घातला गेला असं देवकीला वाटतं. ‘‘फ्रेंच भाषेमुळे एक वेगळंच जग माझ्या समोर उभं राहिलं. असं जग ज्याची मी कधी कल्पनादेखील करू शकले नसते, असं. या अशा जगाचा भाग होण्याची संधी मला या भाषेने दिली.’’ फ्रेंच शिकताना तिला फ्रान्समध्ये जाण्याची संधी तिला एका एक्स्चेंज प्रोग्राममधून मिळाली. तिच्या बरोबर फ्रान्सला जाणारे विद्यार्थी हे मराठी नव्हते. त्यामुळे तिला केवळ फ्रेंचच नाही तर इतरही संस्कृतींशी ओळख होत होती. या काळात तिने तिथल्या शाळेतल्या मुलांना इंग्रजीही शिकवलं. फ्रान्समध्ये फ्रेंच कुटुंबाबरोबर राहणं हा खूप काही वेगळं, शिकवणारा अनुभव होता. अर्थशास्त्र आणि फ्रेंच भाषा या दोहोंनी तिच्यासाठी जगाची दारं उघडली. पद्व्युत्तर शिक्षणानंतर तिला ‘सियाँसेस पो’ या संस्थेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ही राज्यशास्त्राच्या शिक्षणासाठी जगभरात नावाजलेली अशी संस्था आहे. अमेरिकेतील आयव्ही लीग किंवा ब्रिटनमधील ऑक्सब्रिजशी याची तुलना होऊ शकते. फ्रान्सच्या आत्तापर्यंतच्या ८ पैकी ७ राष्ट्राध्यक्षांनी आणि १४ पंतप्रधानांनी इथून शिक्षण घेतलं आहे. तिथे जगभरातल्या लोकांमध्ये मिसळल्यावर आपणच आपल्याला खुजे वाटायला लागतो, पण यामुळे जगात केवढय़ा तरी गोष्टी करण्यासारख्या आहेत, याचं भान येतं, आणि जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन तयार होतो, असं ती म्हणते. तिथे तिने ‘इंटरनॅशनल पब्लिक मॅनेजमेंट’ या विषयातलं शिक्षण पूर्ण केलं. यामध्ये जगात सुरू असलेले संघर्ष आणि त्यासाठी काम करत असलेल्या संस्थांबद्दल तिचा अभ्यास झाला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर लेबनानमधील बैरूत येथे ती युनायटेड नेशन्सच्या पॅलेस्टीनियन निर्वासितांसाठीच्या मदत आणि विकासासाठी काम करणाऱ्या यंत्रणेमध्ये सहभागी झाली. इथे इस्त्राइल आणि पॅलेस्टीनमधल्या या संघर्षांचा सामान्यांवर परिणाम कसा होतो ते जवळून बघता आलं. १९४८ मध्ये स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्सच्या या रचनेला आज ७२ वर्ष झाली, तरीही आज लेबनानमध्ये ४ ते ५ लाख निर्वासित आहेत. या इंटर्नशिपमध्ये तिने पॅलेस्टीनियन निर्वासितांबरोबर शिक्षणविषयक काम केलं. देवकी म्हणते, की जरी तिने रेफ्युजी कॅम्प इथे पहिल्यांदा पाहिला असला तरी तो पाहून तिला फार आश्चर्य वाटलं नाही, कारण तो दिसायला आपल्या कोणत्याही झोपडपट्टीसारखाच दिसतो. पण तिथे काम केल्यावर तिच्या लक्षात आलं की या दोन्हीमध्ये एक सर्वात मोठा फरक आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा! पॅलेस्टीनियन निर्वासित हे नागरिक नव्हते, त्यांना नागरिक म्हणून कोणतेही अधिकार नव्हते. त्यांना या कॅम्पमधून बाहेर पडण्याची मुभा नव्हती.  पॅलेस्टीनियन मुलांना लेबनानमध्ये शिक्षण घेता यावं यासाठी युरोपियन युनियन शिष्यवृत्ती देत असतं. देवकी लेबनान-बैरूतमध्ये शिष्यवृत्ती विभागात काम करत होती. कायद्याप्रमाणे पॅलेस्टीनियन मुलांना लेबनानमध्ये वकील, डॉक्टर यांसारखे कोणतेही व्यवसाय करता येत नाहीत. या विभागाचं काम हे या मुलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मग कोणत्या नोकऱ्या घेता येतील यासाठी त्यांनी काय शिकायला हवं, यासंबंधी समुपदेशन करण्याचं होतं. म्हणजे जर एखाद्याला डॉक्टर होण्याची इच्छा असेल, तर तो हे शिक्षण तर घेऊ शकेल, पण ती प्रॅक्टिस करू शकणार नाही, मग त्यापेक्षा तू नìसगचं शिक्षण का घेत नाहीस, या पद्धतीचा सल्ला इथे द्यायला लागायचा. कायद्यानेच अनेक लोकांच्या विकासाच्या नाडय़ा अशा प्रकारे आवळणे हे देवकीसाठी सर्वात धक्कादायक होतं. अशा ठिकाणी जिथे एखाद्या देशाच्या राजकीय धोरणामुळे, त्यातून झालेल्या संहारामुळे, अनेक लोकांची स्वप्ने, इच्छा-आकांक्षा, भविष्य हे कायमचं बदलून जातं अशा ठिकाणी स्वातंत्र्याचं महत्त्व समजतं आणि आपण ते कसं गृहीत धरतो याची जाणीवही होते.

आफ्रिकेमधल्या कामानंतर देवकीने काही वर्ष मुंबईत ‘स्टॅटेजिक फोरसाइट ग्रुप’ या थिंक टँकबरोबर पाणी या विषयावर काम केलं. त्यात आखाती देशांमधील पाणी हा विषय घेऊन या प्रदेशात शांतता कशी प्रस्थापित करता येईल हा तिच्या अभ्यासाचा विषय होता. त्यानंतर फ्रेंच व्हॉलेंटीयर्स ही फ्रेंच संस्था फ्रान्समधल्या तरुणांना जगभरात स्वयंसेवक म्हणून पाठवत असते. फ्रान्सची जागतिक प्रश्नांबद्दल बांधिलकी दाखवण्यासाठी ही संस्था सुरू झाली. आता ही संस्था, ज्या देशांत ते मदत करतात, तिथल्या तरुणांनाही जगातील इतर देशांत जाऊन काम करण्याची संधी मिळावी यासाठी काम करते. देवकी या संस्थेमधून स्वयंसेवक म्हणून बाहेर जाणारी पहिलीच भारतीय ठरली. जुलै २०१७ पासून देवकीची ही आफ्रिका सफर सुरू झाली.

स्वयंसेवक म्हणून आफ्रिकेत सर्वप्रथम चाड या देशाची राजधानी इंजामिना इथे सुदानच्या निर्वासितांना त्यांच्या उपजीविकेचं साधन स्वत: निर्माण करता यावं यासाठी देवकी काम करायची. त्याबरोबरच स्वयंरोजगारसाठी कशी पावलं उचलायची यासाठी प्रशिक्षणचं आयोजनही करायची. चाडमधल्या या निर्वासितांसाठी हा कार्यक्रम अतिशय फायदेशीर ठरला, असं देवकी सांगते. यानंतर तिला आफ्रिकेतच कामाच्या बऱ्याच संधी मिळत गेल्या. त्यात ती ‘जेस्युआइट रेफ्युजी सव्‍‌र्हिस’ या संस्थेबरोबर ‘ एज्युकेशन कॅनॉट वेट’ या प्रकल्पासाठी काम करायला लागली. ही संस्था सुदानच्या निर्वासितांसाठी व्यवसाय प्रशिक्षणाचं काम करायची. त्यांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या रकमेचा काही भाग त्यांच्याच मुलांच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवला जायचा. यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या कामामध्ये तिने सहभाग घेतला. हे काम होतं सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशाची राजधानी बांगी इथे. इतर काही आफ्रिकन देशांप्रमाणेच १९५८ मध्ये फ्रान्सपासून स्वायत्तता मिळवलेला हा देशही गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पन्नामध्ये मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक जगात सर्वात खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. इथली अर्थव्यवस्था कमकुवत असून हा देश जवळजवळ संपूर्णपणे विदेशी अनुदानावर अवलंबून आहे. इथे असलेल्या १४ सशस्त्र गटांच्या हातात इथली सत्ता गेली आहे. साधारण २००४ पासून यामध्ये लहान-मोठी गृहयुद्धे सुरूआहेत. या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघ शांतता नांदावी यासाठी इथल्या सरकारबरोबर विविध प्रकारची कामं करत आहे. देवकीही याच कामाचा एक भाग होती.

एकदा बांगीमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाच्या आसपास गोळीबार झाला होता, काही गाडय़ांचे नुकसानही झाले. पण जिवाला धोका व्हावा, असं काही घडलं नाही. पण अशा प्रसंगांना कसं तोंड द्यायचं याविषयी इथे काम करणाऱ्या या लोकांचं प्रशिक्षण झालं, असं देवकी सांगते. तसंच, कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारचं काम करायला जाताना तिकडच्या समाजाचं, चालीरीतींचं भान असणं अत्यावश्यक आहे, असं ती म्हणते. म्हणून इथे काम करणाऱ्या प्रत्येकाला प्रशिक्षण घ्यावंच लागतं. कधी कधी तुम्ही स्त्री असणं तुमच्या कामासाठी खूप उपयोगी ठरतं. तिथल्या महिलांशी जोडून घ्यायला त्याने मदत होते. अशा प्रकारचं काम करण्यासाठी ३ गोष्टी असायलाच हव्यात, असं देवकी म्हणते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहानुभूती. समोर आलेल्या कोणत्याही प्रसंगाला भावनिक न होता, परिस्थितीचं तारतम्य बाळगून प्रतिसाद देणं. त्याबरोबरच आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ असणं आणि लोकांशी बोलताना अतिशय नम्र असणं! अशा ठिकाणी जिथे आपल्याला तिथल्या लोकांची बोलीभाषा माहीत नाही, तिथे लोकांशी जोडून घ्यायला ही तत्त्वं खूपच महत्त्वाची ठरतात.

या तत्वांबरोबरचं देवकीनं तिथल्या लोकांशी जोडून घ्यायला आणखीन एक शक्कल लढवली. तिने लेबनानमध्ये असताना बॉलीवूड डान्स शिकवण्यासाठीची कार्यशाळा घेतली. ती म्हणते, की मी भारतीय आहे असं कळल्यावर लोक हमखास बॉलीवूडविषयी प्रश्न विचारतात. एकदा तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या विमानात असताना सर्व रशियन हवाई परिचारिकांनी, ती भारतीय आहे हे कळल्यावर ‘आय अ‍ॅम अ डिस्को डान्सर’ हे गाणं गाऊन दाखवलं. याउलट भारतीय लोकांना ती जिथे काम करते त्या परिसराची ओळख व्हावी यासाठी तिने ‘वुमन्स ऑफ इंजामिना’ हे फेसबुक पेज सुरूकेलं. ‘वुमन्स ऑफ न्यूयॉर्क’ या फेसबुक पेजच्या धर्तीवर सुरू झालेल्या उपक्रमात ती तिथली माणसं, संस्कृती आणि त्यांच्याविषयीच्या गोष्टी सर्वासमोर आणते.

देवकी म्हणते की हे काम करताना सवार्ंत अवघड गोष्ट वाटते ती आपल्या लोकांपासून दूर राहणं. कधी कधी इथली परिस्थिती खूप अवघड बनते, जग जवळ आलं असलं तरी दरवेळी आपल्या लोकांशी बोलणं शक्य होतच असं नाही. कधी त्यांना काळजी वाटू नये म्हणून तर कधी फोन किंवा इंटरनेट उपलब्धच नसतं म्हणून. अशा वेळी तुम्हाला एकटय़ानेच त्रास सहन करत राहावा लागतो. पण या कामामुळे मिळणारं समाधान हे असे प्रसंग तारून नेण्याची शक्ती देतं! हे जग

समान नाही. पण समानतेची ही भावना वाढावी, प्रत्येकाला विकासासाठी समान संधी मिळाव्या यासाठी अनेक लोक, संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत.

मी जसं जसं आफ्रिकेबद्दल, आफ्रिकेमधील या अंतरराष्ट्रीय संस्थांच्या कामाबद्दल वाचते आहे, लोकांशी बोलते आहे, तसं तसं मला खरं देवकीला आणखी खूप प्रश्न विचारावेसे वाटत आहेत. जसं, या संस्था विकसित देशामधल्या लोकांना मदतीची सवय तर लावत नाहीत ना? कोणत्या टप्प्यावर या अंतरराष्ट्रीय संस्थांनी आपलं काम थांबवावं? हे आणि असे अनेक प्रश्न. कदाचित, आणखी पाच वर्षांत तिच्या अनुभवाची शिदोरी आणखीन जड झाल्यावर मी पुन्हा तिच्याशी बोलीन. पण तोपर्यंत देवकीला तिच्या कामासाठी, आणि तिच्याबरोबर तिच्यासारखं काम करणाऱ्या सर्वाना सलाम. संघर्षांचे बळी गेलेल्या लोकांसाठीचं हे काम लवकरात लवकर थांबवायला लागावं, जगातला संघर्ष संपावा आणि शांतता नांदावी एवढीच इच्छा!