गुगलवर फोटो किंवा माहिती कशी शोधायची, हे आपण शिकलोच (२५ जाने.). आता आपले ‘ई-मेल अकाउंट’ कसे उघडायचे ते पाहूया. ई-मेल अकाउंटला आपण सोप्या भाषेत ‘इंटरनेटवरील आपला पत्ता’ असे म्हणून शकतो. तुमच्या ई-मेलवर इतर जण त्यांचा ई-मेल संदेश, फोटो वगैरे पाठवू शकतात. आणि यावरून तुम्ही लेखी गप्पाही मारू शकता म्हणजेच चॅटही करू शकता.
जी मेलप्रमाणे याहू, हॉटमेल, आऊटलूक, रेडिफमेल अशा अनेक साइट्समार्फत ई मेल आयडी तयार करता येतो, आता आपण पाहूया, जी मेलवर ई मेल आयडी कसा तयार करावा. १) प्रथम अ‍ॅड्रेस बारमध्ये http://www.gmail.com असे टाइप करावे, आता आपल्यासमोर साइन इन (sign in) असे निळय़ा चौकोनात लिहिलेली खिडकी सुरू होईल. (आकृती १ पाहा)
२) या निळय़ा चौकोनाच्या खाली नवीन ई- मेल आयडी तयार करण्याकरिता create an account  या पर्यायावर क्लिक करावे.
३) create your google account   असे लिहिलेले एक पान आपल्यासमोर सुरू होईल. आता आपल्याला समोर अनेक चौकटी दिसतील.
४) यापैकी प्रत्येक चौकटीत आपल्याला स्वत:ची माहिती भरायची आहे. (आकृती २ पाहा)उदा. नाव, आडनाव, पासवर्ड, युजरनेम..
आपल्या नावाने अथवा टोपणनावाने ई-मेल खाते तयार करता येते. अनेक जण असा पर्याय निवडतात. उदा- नेहा नाईक हिचा ई-मेल आयडी neha.naik@gmail.com असा होऊ शकतो. अर्थात ई-मेल आयडी वरील नाव काय असावे, हे सर्वस्वी आपण ठरवू शकतो.
५) यातील प्रत्येक चौकटीतील माहिती भरणे अनिवार्य असते. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी I agree to the Google Term of Service and privacy Policy  या पर्यायावर क्लिक करून  continue या पर्यायावर क्लिक करावे. आता तुमच्यासमोर तुम्ही तयार केलेली, उदा. abc@gmail.com  असा तुमचा ई मेल आयडी लिहिलेली विंडो (पान) सुरू होईल.
६) continue with Google  या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपले ई-मेल अकाउंट आपल्या सेवेस तत्पर होईल.
टीप- आपला पासवर्ड म्हणजेच संकेतशब्द हा नेहमी गोपनीय ठेवावा. पासवर्ड तयार करताना तो तुमच्या लक्षात राहील असा करावा. उदा.- आवडत्या व्यक्ती, प्राण्याचे, ठिकाणाचे नाव. पासवर्ड गोपनीय न राहिल्यास त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
चला आजी-आजोबा..आता झाले आपले
ई-मेल अकाउंट तयार. एक पत्र अर्थात मेल ‘चतुरंग’च्या आयडीवरही पाठवा बरं.    
    
—————————-

Indian Railway facts
रेल्वे इंजिनवर लिहिलेल्या ‘या’ शब्दांच्या मदतीनं ओळखा गाडी कोणती आहे? कोडमध्ये दडलेली असते खास माहिती
Nail Polish making video in the process of making nail polish
तुम्ही जी नेलपॉलिश लावता ती कशी बनते माहिती आहे का? थेट फॅक्टरीतील Video एकदा बघाच
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन
DO you know how to make asafoetida
जगभरातल्या जेवणात वापरलं जाणारं हिंग कसे बनते माहितीये का? ‘हा’ Video एकदा पहाच