07 July 2020

News Flash

 गच्चीवरची बाग: नैसर्गिक खताची जोपासना

घरच्या कचऱ्याचा वापर करून नैसर्गिक खत करताना अनेकदा ते कुजून त्याची दरुगधी पसरू शकते. त्यामुळे केलेली मेहनतही वाया जाते आणि दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो

| August 29, 2015 01:01 am

घरच्या कचऱ्याचा वापर करून नैसर्गिक खत करताना अनेकदा ते कुजून त्याची दरुगधी पसरू शकते. त्यामुळे केलेली मेहनतही वाया जाते आणि दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच. ते टाळण्यासाठी ..
आपल्याकडे साधी एक प्लॅस्टिकची बादली असेल तर त्यास खाली अर्धा इंच व्यासाचे छिद्र करावे. तळाशी थोडा सुका पालापाचोळा भरावा. यात ओला कचरा टाकावा. रोज नवा कचरा टाकताना बादलीतील आधीच्या दिवसाच्या कचऱ्यासोबत तो नीट मिसळून घ्यावा. म्हणजे आधीचे कम्पोिस्टग करणारे नसíगक जिवाणू त्यात एकत्र होतात. कचऱ्याची प्रक्रिया लवकर घडते. तसेच या बादलीच्या झाकणाखाली ऊध्र्व दिशेने एक प्लेट नट बोल्टने जोडावी. म्हणजे कचरा कुजताना ओल्या कचऱ्यातील जी काही वाफेच्या स्वरूपात उष्णता बाहेर निघते ती पाण्याच्या रूपात जमा होते. रोज नवीन कचरा त्यात टाकताना झाकणातील पाणी काढून टाकावे. बादलीचे हे झाकण सावकाश बाजूला उभे करावे त्यातील पाणी बादलीत पडू देऊ नये. हेच पाणी पुन्हा बादलीत जमा झाल्यास कचरा सडण्याची शक्यता असते. कचरा सडवण्यापेक्षा तो कुजवणे अधिक महत्त्वाचे आहे. बादली भरल्यानंतर कम्पोिस्टग झालेला कचरा एकदा टेरेसवर वाळवावा. कचरा ऊन-पावसात असला तरी त्याचे उत्तम खत तयार होते. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होण्यासाठी कोरडा पालापाचोळा व कोरडी माती, राख, भुसा यांपकी एक काही तरी वापरावे. तसेच थोडी निमपेंड वापरल्यास अळ्या होत नाही. मोकळी जागा असल्यास बादलीला वर झाकण्याची गरज नसते. फक्त पावसाचे पाणी बादलीत जाणार नाही अशा छताखाली ठेवावे.
हिरव्या कचऱ्याची थली..
आपल्याकडे टेरेसवर पुरेशी जागा असल्यास घरातील हिरवा कचरा व खरकटे अन्न (यात पातळ पदार्थ काहीच नको) कापडी अथवा नायलॉनच्या सच्छिद्र पिशवीत टाकत जावेत. ऊन-वारा-पाऊस लागल्यामुळे त्याची कम्पोिस्टगची प्रक्रिया छान तयार होते. दोन ते तीन महिन्यांनी हा कचरा पिशवीबाहेर काढून चुरून घ्यावा. तो आठवडय़ातून एकदा मूठ मूठभर कुंडय़ांना भरावा. म्हणजे त्यातून छानपकी झाडांची वाढ होते. कचरा प्लॅस्टिक अस्तर असलेल्या धान्याच्या गोणीत टाकू नये. ओल्या कचऱ्यातील उष्णता जेवढे बाहेरच्या वातावरणात मिसळेल तेवढे याची कुजण्याची प्रक्रिया वाढते. यात पातळ पदार्थ टाकू नयेत. आपल्याला शक्य झाल्यास यात लाकडाचा भुसा, सुकलेला पालापाचोळा, निमपेंड, राख इत्यादीसारख्या प्रमाणात एकत्र करून अथवा यांपकी एक त्यावर दररोज टाकत जावी. िनमपेंडेमुळे कचऱ्याचे विघटन लवकर होते तसेच कीड होत नाही. तर पालापाचोळा व लाकडी भुशामुळे ओल्या कचऱ्यातील पाणी शोषून घेतले जाते.
संदीप चव्हाण – sandeepkchavan79@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 1:01 am

Web Title: preservation of natural manures
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1 नकारात्मक भावनांचं ओझं
2 संदर्भ जगण्याचे
3 ‘सा’ ची आराधना..
Just Now!
X