सुकेशा सातवळेकर

‘न्युट्रिजिनॉमिक्स’ हे प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी वरदान असलेलं तंत्रज्ञान आहे. हे जनुक आरेखन म्हणजे जनुकांची आरोग्य कुंडली. ती आयुष्यात एकदाच बनवली जाते. जनुकांच्या पडताळणीनुसार आरोग्यासाठी चांगल्या आणि वाईट जनुकांची माहिती घेतली जाते. आहार आणि जीवनशैलीतील बदलांसाठी आणि आयुष्यभर अंमलबजावणी कशी करावी, यासाठी ‘न्युट्रिजिनॉमिक्स’ मार्गदर्शन करतात. जनुकीय संरचना लेखाचा हा भाग दुसरा.

Union Budget 2024
Budget 2024 : आरोग्य व्यवस्थेच्या इलाजासाठी औषध अपुरे
Budget 2024 Key Announcements, Finance Minister Nirmala sitharaman Speech in marathi
Budget 2024 : अडथळ्यांची शर्यत, कृषी विकासाला तंत्रज्ञानाची जोड, अर्थसंकल्पात १.५२ लाख कोटी, डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर
economic survey report research and development activities expenditure must be increase
संशोधन-विकास उपक्रमावर खर्चात वाढ आवश्यक
Set criteria for errors facilitate Instructions to the High Level Examination Reform Committee of the Centre
त्रुटींसाठी निकष लावा, सुविधा द्या! केंद्राच्या उच्चस्तरीय परीक्षा सुधारणा समितीकडे सूचनांचा ओघ
loksatta kutuhal ai in smart cities adoption of artificial intelligence in smart cities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्मार्ट शहरे
primary health center in igatpuri taluka ranks first
सुश्रुत प्रणालीमध्ये वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात प्रथम
ashima goyal on raising farm productivity
कृषी उत्पादकता वाढविण्यावर केंद्राने भर द्यावा; रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्यांचा सरकारला सल्ला
World Health Organization
मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करताय? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणतेय जाणून घ्या…

मागील लेखात आपण ‘न्युट्रिजिनॉमिक्स’ या अत्याधुनिक आणि अत्यंत उपयुक्त अशा तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली. जनुकीय शास्त्र आणि पोषणशास्त्र यांचा परस्परसंबंध माहीत करून घेतला. जनुकीय आरेखन कसं होतं? ‘न्युट्रिजिनॉमिक्स’ मार्गदर्शन कसं होतं? ते कधी आणि का घ्यावं याबद्दलही जाणून घेतलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि काही शंकाही उपस्थित झाल्या. त्यातील काही मुद्दय़ांविषयी चर्चा करण्याचा हा प्रयत्न.

हल्लीच्या जगात वेगवान जीवनशैली, जीवघेणी स्पर्धा, प्रचंड ताणतणाव, उच्च प्रगत तंत्रज्ञानामुळे हालचालींचा अभाव आणि सदोष आहारपद्धती यामुळे आरोग्यपूर्ण राहणं हे एक आव्हानच आहे. अयोग्य जीवनशैलीचे विकार म्हणजेच स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांचा प्रमाणाबाहेर फैलाव झालाय. वैद्यकशास्त्र आणि आरोग्यशास्त्रापुढे खूप मोठी आव्हानं आहेत. या अनारोग्याच्या समस्येमुळे भारतासारख्या विकसनशील देशातील अर्थव्यवस्थेवर खूप मोठा ताण, दबाव पडतो. त्यामुळेच उपचारात्मक वैद्यकशास्त्राबरोबरच, प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्राला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. ‘न्युट्रिजिनॉमिक्स’, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक वैद्यकशास्त्रात अतिशय उपयुक्त भूमिका बजावत आहे.

हल्ली आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे, पण तरीही प्रतिबंधात्मक उपाय करण्याचं प्रमाण त्यामानाने कमी आहे. बहुतेकदा मधुमेह किंवा हृदयविकार यांचं निदान झाल्यावर मगच आरोग्याविषयी जाग येते आणि वैद्यकीय उपचार घेतले जातात. खरं तर हे विकार छुपे मारेकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजेच बऱ्याचदा छुप्या पद्धतीनं तुमच्या आयुष्यात येतात आणि कायमचेच साथीदार होतात. त्यांची लक्षणं दिसून निदान होईपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणूनच आधीच काळजी घायला हवी. प्रतिबंधात्मक खबरदारीबद्दल उदासीनता आपल्याकडे सगळ्याच बाबतीत दिसते. म्हणूनच परदेशात रस्त्यावर एखादी कार बंद पडलेली दिसली की ती भारतीयाचीच असणार असं म्हटलं जातं.

आरोग्याबाबतची हेळसांड मात्र गंभीर ठरू शकते. काही वेळा शरीराची दुरुस्त न करता येण्याइतकी अपरिमित हानी झालेली असते. बरेचदा शरीरांतर्गत असे काही अपायकारक बदल होतात, जे सुधारणं शक्य नसतं. आयुष्यभर त्यांचे परिणाम भोगावे लागतात. किमान आरोग्य राखण्यासाठी बराच काळ, म्हणजेच बरेचदा आयुष्यभर प्रयत्नपूर्वक उपचार चालू ठेवावे लागतात. त्यात अमाप शक्ती आणि पसा खर्ची पडतो. त्याऐवजी काहीही व्याधी विकार होण्याआधीच, जागरूक राहून जनुकीय आरेखन करून घ्यावं. त्यामुळे जनुकांच्या गुणदोषांप्रमाणे आहारात आणि जीवनशैलीत परिणामकारक बदल करून कायम आरोग्यपूर्ण राहता येईल. एक इंग्लिश म्हण आहे, ‘अ स्टीच इन टाइम, सेव्हज नाइन’ म्हणजेच वेळच्या वेळी घातलेला एक टाका सात टाके वाचवतो. याचप्रमाणे आहारात वेळच्या वेळी केलेल्या सुयोग्य बदलांमुळे भविष्यात आरोग्यावर होऊ शकणारे, नकारात्मक, अपायकारक आणि घातक परिणाम टाळता येतील. त्यामुळे वेळ, श्रम, पसा यांचीही बचत होईल.

‘न्युट्रिजिनॉमिक्स’ हे प्रतिबंधात्मक आरोग्यासाठी वरदान असलेलं तंत्रज्ञान, भारतात ५-६ वर्षांपूर्वी सुरू झालं आहे आणि तेही सर्वात प्रथम पुण्यात! जागतिक दर्जाच्या शास्त्रीय संशोधनावर आधारित जनुकीय आरेखन आणि ‘न्युट्रिजिनॉमिक्स’ मार्गदर्शन हे सध्या पुणे, मुंबई बरोबरच देशात इतरत्र उपलब्ध आहे. कामाची पद्धत अतिशय विश्वासार्ह आणि पारदर्शक आहे. जनुकीय आरेखानासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री, उच्चशिक्षित संशोधक आणि कर्मचारी, शिवाय बाकी सर्व यंत्रणा यामुळे या चाचण्यांसाठी लागणारा खर्च थोडा जास्त आहे. पण प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीमधील या चाचणीची उपयुक्तता आणि आरोग्याशी संबंधित सर्वंकष मुद्दय़ांचा विचार करता, चाचण्यांवर होणारा खर्च हा पुढे जाऊन आजारांच्या उपचारांवर होणाऱ्या अफाट खर्चापेक्षा नकीच कमी आहे.

जनुक आरेखन आयुष्यात एकदाच करायचं असतं, कारण आपली जनुक संरचना बदलत नाही. आपली जन्मपत्रिका जशी आयुष्यात एकदाच बनवली जाते. तशीच जनुकांची आरोग्य कुंडली आयुष्यात एकदाच बनवली जाते. या चाचण्यांमधून जणू काही आपल्यातील ‘स्व’ची ओळखच होते. जनुकांच्या पडताळणी नुसार आरोग्यासाठी चांगल्या आणि वाईट जनुकांची माहिती घेतली जाते. त्यानुसार आहार आणि जीवनशैलीतील बदलांसाठी आणि आयुष्यभर अंमलबजावणी कशी करावी, यासाठीही वैयक्तिक मार्गदर्शन आणि मदत म्हणून ‘न्युट्रिजिनॉमिक्स’ मार्गदर्शन करतात.

काहींनी या ‘न्युट्रिजिनॉमिक्स’च्या चाचण्या करून घेतल्या. त्यांचे हे काही प्रातिनिधिक अनुभव. ‘‘मी एक ५२ वर्षांची व्यावसायिक स्त्री आहे. घर, संसार सांभाळून करिअर करताना तारेवरची कसरत चालू असते. एक खेळाडू म्हणून, शालेय आणि विद्यापीठ स्तरावरील स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळून अनेक परितोषिकं मिळवली आहेत. कायमच काही ना काही स्वरूपात व्यायाम करते. आहाराची पथ्यही पाळते. पण लहानपणापासून तब्येतीच्या, पोटाच्या काही न काही तक्रारी जाणवत होत्या. पूर्ण स्वस्थ कधीच वाटलं नाही. नक्की काय त्रास होतोय हे डॉक्टरांना सांगता येत नव्हतं. त्यातच वयाच्या पंचेचाळिशीनंतर वजन वाढायला लागलं. काटा ५१ वरून ७२ किलोवर गेला. अनुत्साह, थकवा अशा तक्रारी वाढल्या. या सगळ्याचा वाईट परिणाम शारीरिक, मानसिक आणि व्यावसायिक स्तरावर जाणवू लागला. सर्व पॅथीच्या नामवंत डॉक्टरांकडून, उपचार घेऊन बघितले. लॅब टेस्ट, सोनोग्राफी, एन्डोस्कोपी आदी सर्व चाचण्या केल्या. त्यात काहीच वावगं आढळलं नाही.  अ‍ॅन्जिओग्राफीसुद्धा झाली, त्यानुसार औषधोपचार घेतले. पण तब्येतीत म्हणावी तशी सुधारणा नव्हती. निराशा, चिंता ही नवीनच दुखणी सुरू  झाली. व्यवसायात १०० टक्के योगदान देणं कठीण झाल्यामुळे, हळूहळू व्यवसाय कमी करायला सुरुवात केली. अखेर ‘न्युट्रिजिनॉमिक्स’ची माहिती मिळाली. त्यानुसार माझी तब्येत आणि कुटुंबाच्या आरोग्य इतिहासानुसार, समग्र आरोग्य दर्शवणाऱ्या जनुकांची तपासणी करायचं ठरलं. त्याबरोबरच डॉक्टरांनी ग्लुटेन आणि लॅक्टोजची जनुक तपासणीही सांगितली. महिनाभरात रिपोर्ट्स आल्यावर हृदय, मज्जासंस्था, इन्शुलिन प्रक्रिया आणि हाडांचं आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती, डीटॉक्स प्रक्रिया यांबद्दल महत्त्वाची माहिती कळली. ग्लुटेन आणि लॅक्टोज पचत नाही, असं लक्षात आलं.

डॉक्टरांनी रिपोर्ट्सनुसार खाण्यापिण्यात काय-काय बदल करायचे ते सांगितलं आणि त्याबरोबर त्यामागची शास्त्रीय कारणंही समजावली. गहू आणि गव्हाचे पदार्थ पूर्ण बंद केले. दूध बंद केले. त्याऐवजी काय काय खायला हवं याची यादी समजावून सांगितली. दही, ताक थोडय़ा प्रमाणात घ्यायची परवानगी दिली. आहारात आणि लाइफस्टाइलमधील बारीकसारीक पण अतिशय महत्त्वाचे बदल सोप्या पद्धतीने समजावले. सप्लिमेंट्स कुठली, कधी आणि किती प्रमाणात घ्यायची हे लिहून दिलं. शंकांची उत्तरं मिळाली. गेले ७-८ महिने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार घेतेय. सगळे बदल करणं हळूहळू जमलं. खाण्यापिण्यातली जागरूकता वाढली. चुकून बाहेर खायची वेळ आली तर, विचारपूर्वक मागवलं जातं. वर्षांतून काही वेळा आम्ही परदेशात जातो. पूर्वी माझी तब्येत बिघडायची, पोट बिघडायचं. आता परदेशी, खाणंपिणं कसं घ्यायचं ते समजल्यामुळे तब्येतीच्या तक्रारी कमी झाल्या. माझं वजन १० किलोंनी कमी झालंय. तब्येतीत चांगले बदल झालेत, फिटनेस वाढलाय.’’

‘‘मी, संगीता पवार. मोठय़ा एकत्र कुटुंबाचा व्याप सांभाळून, घरचा व्यवसायही सांभाळते. मी, माझी मुलगी आणि भाची यांनी जनुकीय आरेखानाद्वारे इस्ट्रोजेनची चाचणी तीन वर्षांपूर्वी करून घेतली. त्याला कारणही तसंच होतं. माझी बहीण दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने गेली. तिला काही वर्षांपूर्वी स्तनांचा कर्करोग झाला. शस्त्रक्रिया झाली पण पुन्हा कर्करोग उद्भवला. परत उपचार घेतले. दोन वर्षांपूर्वी तिसऱ्यांदा कर्करोग शरीरात सर्वत्र पसरला. त्यातून माझी बहीण वाचू शकली नाही. हा कर्करोग आनुवंशिक असेल का? माझी भाची, मुलगी यांना पुढे जाऊन काही त्रास होणार नाही ना अशी भीती आणि काळजी मनात होती. अखेर कर्करोगाची शक्यता पडताळून, प्रतिबंधाचे उपाय करण्यासाठी जनुक आरेखन करून घेऊन, ‘न्युट्रिजिनॉमिक्स’ मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं.

जनुकं बदलता येत नाहीत, पण वाईट जनुकांचा प्रभाव कमी करून उपयुक्त जनुकांची कार्यक्षमता वाढवता येते. कर्करोगाची शक्यता टाळता/ लांबवता येणं शक्य आहे हे लक्षात आलं. विचार केला, जनुकं काय म्हणतायत ते आधीच समजून घेऊन. पुढचा अनर्थ टाळण्यासाठी जागरूक राहणं महत्त्वाचं. १० वर्षांपूर्वी या चाचणीची माहिती कळली असती तर आमची बहीण वाचू शकली असती कदाचित.

रिपोर्टस् हाती आल्यावर, आमचे जीन्स काय म्हणतायत याची माहिती आणि स्पष्ट कल्पना डॉक्टरांनी दिली. जणू काही आमची जन्मपत्रिकाच नव्याने तयार झाली. शरीरातील इस्ट्रोजनची पातळी आणि तिचे बरे-वाईट परिणाम कळले. शरीराची डिटॉक्स प्रक्रिया आणि ‘ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस’ सांभाळण्याची क्षमता समजली. डॉक्टरांनी खाण्यापिण्यात काय बदल करायचे याचं सविस्तर मार्गदर्शन केलं आणि लिहून दिलं. आता मी माझी हालचाल वाढवलीय, व्यायाम वाढवलाय. जागरूकतेने खाणंपिणं सांभाळते. बाहेरचं खाणं, गोड खाणं कमी केलंय. वेळच्या वेळी ठरलेले पदार्थ खाते. जवस, सोयाबीन, आवळा सांगितल्याप्रमाणे घेते. नियमित डॉक्टरांकडे जाते. या सगळ्याचा उपयोग सर्वागीण आरोग्यासाठीही झालाय!’’

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com