सुकेशा सातवळेकर

गहू आणि गव्हाचे पदार्थ, बार्ली, राय, ओट्समध्ये ग्लुटेन या प्रोटीनबरोबरच लोह, थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन ही ‘बी’ व्हिटामिन्स असतात; उपयुक्त तंतुमय पदार्थ, कॅल्शियम असतं. ग्लुटेन असलेले पदार्थ खाणं बंद केल्यावर या अन्नघटकांची कमतरता होऊन तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

अलीकडेच माझी मत्रीण अनिताचा फोन आला होता, आवाजात उत्साह आणि ताण दोन्हीही जाणवत होतं. म्हणाली, ‘‘तुझा सल्ला हवाय. ते ‘ग्लुटेन-फ्री डायेट’ काय प्रकरण आहे? माझी ऑफिसमधली सहकारी करतेय, वजन कमी करण्यासाठी. इंटरनेटवर बघून तिनं वजन कमी केलंय अगं. मीपण करू का? माझंही वजन वाढतच चाललंय.’’ अनिताच्या या प्रश्नांमुळे डोक्यात विचारचक्र सुरू झालं.. अनिताला मी भेटून समजावेन पण नेटवर बघून अयोग्य डायट करणाऱ्यांचं, त्यामुळे शरीरावर अपाय करून घेणाऱ्यांचं काय?

ग्लुटेन म्हणजे गव्हातलं प्रोटीन. गव्हाच्या पिठाची पोळी फुगते किंवा बेक करताना ब्रेड फुगतो तो या ग्लुटेनमुळेच. बार्ली आणि राय या धान्यांमधेही ग्लुटेन असतं. ओट्स पिकवताना त्यात ग्लुटेनचा थोडा अंश मिसळण्याची शक्यता असते. गहू आणि राय यांचा संकर करून बनविलेल्या ट्रीटीकेल या धान्यातही ग्लुटेन असतं. प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये ग्लुटेन घातलं जातं. खायला लगेच तयार असलेले खूप प्रक्रिया केलेले पॅकबंद पदार्थ, तयार सूप्स, सॉसेस, सलाड ड्रेसिंग्स, ग्रेव्हीज, कृत्रिम रंग आणि स्वाद, घट्टपणा देणारे तयार पदार्थ, फ्रेंच फ्राइज, चिप्समध्ये ग्लुटेन घातलेलं असतं. पॅकबंद मांसाहारी पदार्थातही ग्लुटेन घालतात. माल्ट, ब्रुअर्स यीस्टमध्ये ग्लुटेन असतं.

यावर कुणी विचारेल, ‘‘ग्लुटेन खाणं बंद करावं का?’’ याचं उत्तर सरसकट सगळ्यांनी ग्लुटेन बंद केलं आणि शरीरस्वास्थ्य सुधारलं; असं होऊ शकत नाही. हल्ली वजन कमी करण्यासाठी ग्लुटेन बंद करायची लाट आलेली दिसते. ग्लुटेन बंद केल्यावर वजन त्वरेनं कमी होऊन कार्यशक्ती वाढेल, तब्येत सुधारेल, पोटाचं आरोग्य सुधारून पचनशक्ती वाढेल, खेळाडूंचा खेळ सुधारेल असे दावे केले जातात. पण या दाव्यांना पुरेसा शास्त्रीय आधार नाही, पुरेसं शास्त्रीय संशोधन झालेलं नाही. आहारातून ग्लुटेन बंद केल्यावर शरीरातील चरबी आणि स्नायूंच्या वजनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी, ‘फेडरल युनिव्हर्सटिी ऑफ मिनास गेरास’ने सखोल शास्त्रीय अभ्यास केला. त्यांना आढळलं की वजनवाढीचा ग्लुटेनशी थेट संबंध नाही. ग्लुटेन खाल्ल्यावर तुम्ही नक्की लठ्ठ होणार असं अजिबात म्हणता येणार नाही. जास्तीचा खादाडपणा आणि अतिरिक्त कॅलरीजमुळे, वजनवाढीची दाट शक्यता त्यांनी अधोरेखित केली. आत्तापर्यंत ग्लुटेनमध्ये असा कुठलाही घटक सापडला नाही ज्यामुळे ‘सिलिअ‍ॅक’ आजार नसणाऱ्यांमध्ये वजन वाढेल.

गहू आणि गव्हाचे पदार्थ, बार्ली, राय, ओट्समध्ये ग्लुटेन या प्रोटीनबरोबरच लोह, थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन ही ‘बी’ व्हिटामिन्स असतात; उपयुक्त तंतुमय पदार्थ, कॅल्शियम असतं. ग्लुटेन असलेले पदार्थ बंद केल्यावर या अन्नघटकांची कमतरता होऊन तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. शाकाहारी लोकांमध्ये बहुतेकदा प्रोटीनची कमतरता दिसून येते. त्यांच्या आहारातून गरज नसताना ग्लुटेन बंद केलं तर प्रोटीन आणखीनच कमी पडेल, त्याची भरपाई करणं अत्यंत आवश्यक असेल.

हल्ली बाजारात ग्लुटेन नसणारे अनेक तयार पदार्थ उपलब्ध आहेत. ग्लुटेन फ्री जंक फूड सगळीकडे सहज मिळतंय. ग्लुटेन फ्री पिझ्झा, पास्ता, चॉकोलेट, बिअर मिळते. मोठमोठय़ा दुकानांमध्ये ग्लुटेन-फ्री मेन्यू सुरू झालेत कारण ३० टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकी लोकांनी ग्लुटेन-फ्री डाएट घ्यायचा प्रयत्न सुरू केलय. पण लक्षात घ्या; फक्त ग्लुटेन नाही म्हणून हे पदार्थ विकत घेण्यापेक्षा, आधी या पदार्थाची लेबल्स वाचायला हवीत. लक्षात येईल, त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात साखर, मीठ, सॅचुरेटेड फॅट्स वापरलेली असतात. त्यामुळे कॅलरीजही जास्त असतात. सामान्य पदार्थाच्या किमतीपेक्षा यांची किंमतही जास्त असते. पदार्थाची लेबल्स वाचण्यावरून आठवलं, सिडनी युनिव्हर्सटिीच्या संशोधकांनी १८९ अभ्यासशोधांमधून दाखवून दिलंय की तयार पदार्थाच्या लेबलवरील आहारघटकांची माहिती वाचल्यामुळे सुमारे २७ उष्मांक कमी खाल्ले जातात.

काही जणांच्या शरीरात मात्र ग्लुटेनचा अस्वीकार दिसून येतो. ग्लुटेनचं पचन योग्य पद्धतीने होत नाही. जागतिक लोकसंख्येच्या

१ टक्के लोक या सिलीअ‍ॅक आजाराने बाधित असतात तर ०.५ ते १३ टक्के लोकांच्या शरीरात ग्लुटेनचा अस्वीकार (इनटॉलरन्स) दिसून येतो. भारतात ‘इंडियन कॉन्सिल फॉर मेडिकल रिसर्च’ने केलेल्या पाहणीनुसार; उत्तरेकडील राज्यांमध्ये १.२३ टक्के व्यक्ती तर उत्तरपूर्व राज्यांमध्ये ०.८७ टक्के व्यक्ती आणि दक्षिणेकडील ०.१ टक्के व्यक्ती सिलीअ‍ॅकग्रस्त आहेत. ग्लुटेन अस्वीकाराचा विकार असणाऱ्या, जवळजवळ ९० टक्केलोकांची तपासणी न केल्यामुळे निदान होऊ शकत नाही. जनुकीय संरचनेतील दोषांमुळे ग्लुटेन अस्वीकृती आणि सिलीअ‍ॅक आजार होतो. या आजारांना कारणीभूत जीन्स, जेनेटिक मॅपिंगने शोधून काढता येतात.

सिलीअ‍ॅक आजार हा ग्लुटेन अस्वीकृतीचा अतिशय घातक परिणाम आहे. यात ग्लुटेनचं पचन होत नाही आणि लहान आतडय़ाचं गंभीर नुकसान होतं. खाल्लेल्या अन्नाचं पचन आणि शोषण व्हायची शक्ती कमी होते. शरीरात इन्फ्लेमेशन म्हणजेच दाह होतो. या आजारावर अजून तरी ठोस औषधोपचार उपलब्ध नाहीत. आहारोपचार मात्र काटेकोरपणे पाळावा लागतो. सिलीअ‍ॅकच्या रुग्णांना ग्लुटेन पूर्णपणे, १०० टक्केवज्र्य करावं लागतं. गहू आणि गव्हाचे पदार्थ – गव्हाचं पीठ, रवा, मदा, दलियाचे पदार्थ बंद करावे लागतात. सर्व प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ, बेकरीतले पदार्थ, बार्ली, राय, ओट्सचे पदार्थ पूर्ण बंद होतात. त्यांच्या आहारात फळं, भाज्या, डाळी, कडधान्य, सोयाबीन, तेलबिया, सुकामेवा, अंडी, प्रक्रिया न केलेले मांसाहारी पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश होतो. गव्हाऐवजी ग्लुटेन नसलेली काही धान्य म्हणजे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, इतर भरड धान्य, राजगिरा, क्विनोआ वापरता येतं.

धान्यांच्या पिठांबरोबरच इतर पर्याय म्हणून थोडय़ा प्रमाणात आरारूट, खोबऱ्याचं पीठ, बदामाचं पीठ, बटाटय़ाचं पीठ, गवारगम वापरता येतं. आहारात ग्लुटेन वज्र्य असलं तरी बाकी सर्व अन्नघटकांचा समतोल साधावा लागतो. खाण्यापिण्याचं प्रमाण, उष्मांक, आटोक्यात ठेवायला लागतात. सिलीअ‍ॅकमध्ये दिसणारी अतिशय गंभीर लक्षणं ग्लुटेन अस्वीकृतीमध्ये सौम्य स्वरूपात दिसतात. शरीरातील जवळजवळ सगळ्या पेशींवर परिणाम होऊ शकतो, अगदी मेंदू, त्वचा, एंडोक्राइन संस्था, पोटातील अवयव, यकृत, रक्तवाहिन्या, स्नायू आणि पेशीकेंद्रक. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विकारांशी याचा संबंध आहे. स्किझोफ्रेनिया, एपिलेप्सीपासून टाईप १ मधुमेहापर्यंत आणि ओस्टीओपोरोसीस पासून त्वचाविकार, सोरियासीसपर्यंत; ग्लुटेन अस्वीकृतीचा संबंध आहे.

या रुग्णांमध्ये सामान्यपणे काही लक्षणं दिसतात. त्यात पोट जड होतं, फुगतं, पोटात गुब्बारा धरतो, थोडंसं खाल्ल्यावरही पोट तुडुंब भरल्याची भावना होऊन अस्वस्थ वाटतं. अन्नपचनाच्या तक्रारी वारंवार दिसतात. वरचेवर पोटदुखीचा त्रास जाणवतो. अतिसार आणि बद्धकोष्ठाचा त्रास आलटून पालटून होतो. त्यामुळे तब्येतीवर परिणाम होतो. अतिसारामुळे; क्षारांची कमतरता होते, डीहायड्रेशन आणि शक्तिपात होऊ शकतो. अ‍ॅनिमिया होतो आणि सातत्याने कमालीचा थकवा जाणवतो. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. ग्लुटेन असलेले पदार्थ खाल्ल्यावर मळमळल्यासारखं होतं. वारंवार डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

काही वेळा काही जणांना हाडे आणि सांधेदुखी जाणवते, वैचारिक गोंधळ, चिंता, नराश्य, मानसिक थकवा आणि अस्पष्टता, विचार करण्याची असमर्थता जाणवते. हात-पाय बधिर होणे, हातापायाला मुंग्या येणे अशाही तक्रारी दिसतात. त्वचाविकार, एक्झिमा (इसब), अति प्रमाणात तारुण्यपीटिका होतात. सोरियासीसचा त्रास होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजनवाढ होते किंवा काही जणांमध्ये काही खास कारण नसताना

वजन कमी होतं. मधुमेहींमध्ये इन्सुलिनची अस्थिरता किंवा वारंवार बदलणारी इन्सुलिनची पातळी, हे महत्त्वाचं लक्षण दिसतं. खरं तर या सर्व तक्रारी सामान्य माणसांमध्येही कधी तरी जाणवतात, पण ग्लुटेन अस्वीकृती किंवा सिलीअ‍ॅक असणाऱ्यांमध्ये त्या वारंवार, सातत्याने जाणवतात. ग्लुटेन अस्वीकृतीचं

निदान झालेल्या २५ टक्के रुग्णांमध्येच ठरावीक, नेहमीची लक्षणं दिसून येतात. बाकीच्यांमध्ये एक तर काहीच लक्षणं दिसत नाहीत किंवा वेगळीच लक्षणं दिसू शकतात.

आहारातील सुयोग्य बदलांमुळे लक्षणांची तीव्रता कमी करून, त्रास आटोक्यात ठेवता येतो. जेनेटिक मॅपिंगच्या रिपोर्टमधून लक्षात आलेल्या कारणीभूत जीन्सच्या तीव्रतेनुसार आहारात बदल सुचवले जातात. आहारातून ग्लुटेन कमी-जास्त प्रमाणात वगळून या विकारावर नियंत्रण ठेवता येतं. आरोग्यात अनेक सकारात्मक लाभ मिळतात. पण ज्या व्यक्तींच्या रिपोर्टमधून ग्लुटेन अस्वीकृती दिसते, त्यांनीच फक्त आहारातून ग्लुटेन टाळावं किंवा वर्ज्य करावं. इतरांनी केवळ वजन कमी करण्यासाठी सोपा मार्ग म्हणून ग्लुटेन टाळण्यापेक्षा कॅलरीजचा समतोल साधण्यावर भर द्यायला हवा.

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com