गार्गी फुले-थत्ते

‘माझ्या बाबासारखा बाबा होणे नाही!’ असं मी नेहमी म्हणते. अभिनेते म्हणून तो त्याच्या कामात प्रचंड व्यग्र असतानाही आई जेवढं माझ्याकडे लक्ष द्यायची, तेवढंच वडील म्हणून तोही द्यायचा. ‘मुलांचा सर्वागीण विकास’ या संकल्पनेच्या पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन दोघांनीही मला प्रत्यक्ष अनुभव मिळावेत म्हणून प्रयत्न के ले.

future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट

बाबा चित्रीकरण आणि नाटक अगदी दोन-दोन, तीन-तीन ‘शिफ्ट’मध्ये करायचा, पण दिवाळीची सुट्टी, उन्हाळी सुट्टय़ांमधले १० दिवस आणि माझा वाढदिवस, हा वेळ तो काढायचाच. सुट्टीच घ्यायचा. तो निर्मात्यांना आधीच तसं सांगायचा. मला भारत देश पूर्ण फिरवायची त्याची इच्छा होती. ‘तुला या वर्षी कु ठे जायचंय?’ असं मला विचारायचा, प्लॅन आखायचा. आम्ही एकत्र खूप फिरलो, पण एखाद्या वेळी नाही जमलं, तर तो मला आणि आईला बुकिं ग करून द्यायचा. त्यामुळे मी कोलकाता सोडल्यास भारत पाहिला आहे. त्यानं मला लंडन, कॅनडा, दुबईलाही पाठवलं. ‘जिथे जाशील तिथली संस्कृती पाहा,’ असं तो म्हणायचा आणि सहलीहून आल्यावर त्याविषयी लिहायलाही सांगायचा. त्यामुळेच मला सहलीची वर्णनं लिहायला खूप आवडतं. आता सोशल मीडियावर लिहिते, पण पूर्वी डायरी लिहायचे. या सवयी बाबानं लावल्या.

पुस्तकं  वाचण्याची सवयही त्यानंच लावली. पु. ल. देशपांडे, जी. ए. कु लकर्णी, मेघना पेठे,  प्रकाश नारायण संत,

गौरी देशपांडे, सानिया यांची सगळी पुस्तकं  मी शाळेत असतानाच वाचली होती. इतकंच नाही तर जोतीराव फु ले यांनी लिहिलेली पुस्तकं सुद्धा मी शालेय वयातच वाचली. भारताचं संविधान

कुणी वाचायला सांगेल का आपल्या लहान मुलांना, पण बाबाने मला लहानपणीच ते मुद्दाम वाचायला लावलं. तेव्हा ते समजायला अवघड जायचं, मग तो समजावून सांगायचा. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे आहेत, असं नुसतं पुस्तकी ज्ञान मिळवू नकोस. संविधान काय आहे हे माहिती हवं,’ असं तो म्हणायचा. ‘रामायण, महाभारतसुद्धा नुसतं मालिके त आणि चित्रपटात पाहू नकोस,’ असं म्हणून रामायण- महाभारताची पुस्तकं , भागवत वाचायला सांगितलं. पुस्तक वाचून झाल्यावर त्यावर आम्ही चर्चा करत असू. मला त्यातलं नेमकं  काय समजलं हे तो जाणून घेत असे. त्याचा मला आयुष्यात आजही खूप उपयोग होतो.  त्याचंही वाचन तेवढंच अफाट होतं आणि स्मरणशक्तीही प्रचंड. बोलता बोलता ‘अमुक पानावर अमुक संदर्भ आहे,’ असं तो पानाच्या क्रमांकासह सांगायचा. के वळ दहावी पास झालेल्या, घरात तशी काही पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीचा इतका गाढा अभ्यास कसा, याचं आश्चर्य वाटत असे. असं वाचन, सामाजिक भान मिळवणं फार अवघड आहे.

तेच चित्रपटांच्या बाबतीत. रविवारी जर तो पुण्यात घरी असेल, तर चांगले इंग्रजी चित्रपट दाखवायला न्यायचा. ‘गॉन विथ द विंड’, ‘रेन मॅन ’ ‘रेयान्स डॉटर’आम्ही पाहिले होते. ते फक्त चित्रपट पाहून येणं नसे. ‘गॉन विथ द..’ पाहिल्यावर त्याने  महायुद्धाची पार्श्वभूमी सांगितली होती, असं ते चालायचं.  ‘फॉरेस्ट गम्प’ हा चित्रपट त्याने पाहिल्यानंतर मला तो तीनदा पाहायला लावला होता! ‘इतकी सुंदर कलाकृती एकदाच बघू नको. दोन-तीनदा बघ, समजून घे, मग आपण चर्चा करू,’ मलाही आश्चर्य वाटायचं की का हा दोनदा, तीनदा  तिकीट काढून सिनेमा बघायला स्वत:ही जातोय आणि मलाही सांगतोय! पण आज मला कळतंय, की ज्या पद्धतीचं चित्रीकरण त्यात होतं किंवा टॉम हँक्सने जे काम केलं ते माझ्या मनावर िबबवण्याचा त्याचा प्रयत्न होता, की ‘बघ या पद्धतीचा अभिनय असतो.’ मला त्याने कधीच अशा पद्धतीने काम कर, अभिनय कर वगैरे सांगितलं नाही. माझी भूमिका असलेलं नाटक आम्ही कधी पाहून आलो, की कधीच माझ्या अभिनयाबद्दल बोलायचो नाही. अर्थात नाटकाच्या संहितेबद्दल बोलणं व्हायचंच. पण कामाच्या बाबतीत माझं कौतुक तो फारच कमी वेळा करत असे. पण गप्पा मारता मारता ‘सुदामाके  चावल’मध्ये ती स्त्री अशी आहे..’ असं एखादं वाक्य बोलून जायचा आणि त्याचा मला उपयोग व्हायचा. कारण त्याची निरीक्षणं अचूक असायची.

एखाद्या गोष्टीविषयी त्याला कितीही ज्ञान असेल, तरी तो पटकन मत द्यायचा नाही. चित्रपट पाहिल्यावरही लगेच ‘कसा वाटला?’ या प्रश्नाचं उत्तर तो देत नसे. पुरेसा वेळ घ्यायचा, त्यावर विचार करायचा आणि मग म्हणायचा, ‘आता मी तयार आहे. आता विचार, आपण चर्चा करू!’ मला वाटतं, आपण अमुक सिनेमा किती थुकरट आहे! किती वाईट आहे, मला नाही आवडला,’ असं पटकन बोलून जातो. आपल्याला व्यक्त व्हायची घाई असते. त्याला ते आवडायचं नाही. म्हणायचा, ‘थांब. विचार कर मग बोल. बऱ्याच लोकांची त्यामागे मेहनत आहे, त्यांनी त्यासाठी आपला वेळ दिलाय. त्याची

किं मत ठेवायलाच हवी,’ हे त्यानं शिकवलं असल्यामुळे कुणी एखादा चित्रपट वाईट आहे, असं म्हटलं तरी मी जाते, पाहाते. कारण त्याच्या मते, ‘वाईट चित्रपट, वाईट नाटक पाहण्याचीही सवय तुला असली पाहिजे, म्हणजे काय चांगलं आहे ते कळतं.’

त्याला खाण्यापिण्याची प्रचंड आवड आणि स्वयंपाक करणं ही माझ्या आणि आईच्या आवडीची गोष्ट. पदार्थ मस्त झाला असेल, तर लगेच दाद द्यायचा, पण ‘भाजीत मीठ नाहीये’ किं वा ‘जेवणात नुसता वरणभातच का के ला?’ अशी नावं नाही ठेवायचा. तो कामाच्या निमित्तानं खूप फिरायचा आणि घरी आल्यावर आपला आवडता पदार्थ खायची इच्छा होणं साहजिक असायचं, पण त्यानं स्वत:हून कधी अशा मागण्या के ल्या नाहीत. आमच्या घरी कलाकार, कार्यकर्ते यांचा सतत राबता असे. कु णीही चहा किं वा नाष्टा के ल्याशिवाय जायचं नाही. एखादा छोटा कार्यकर्ता किं वा चाहता आला आणि बाबा स्वत: घरी नसला, तरी त्या व्यक्तीला किमान चहा-बिस्कीट तरी द्यायचंच, असं त्यानं सांगून ठेवलेलं असायचं. यात माझ्या आईला सारखं ते करत बसावं लागे, हेही मान्य आहे. पण मला आदरातिथ्याची ही सवय बाबाकडून मिळाली.

मोबाइलसारखी साधनं नसतानाही त्याचा जनसंपर्क  अफाट होता. मी एकलकोंडी असल्यामुळे मला तो जनसंपर्क ठेवता येत नसावा. पण त्याच्या भोवती खूप माणसं असत. त्याच्यासाठी आलेली हजार-हजार पत्रं तो जमवून ठेवायचा, मग ती फोडायचा आणि प्रत्येक पत्र वाचून त्याला उत्तर लिहायचा. मला हे खूप कमाल वाटतं. जेव्हा चित्रीकरण किं वा नाटक नसे तेव्हा महिन्यातले ४-५ दिवस रोज पहाटे उठून तासभर नुसती पत्रांना उत्तरं लिहिण्यासाठी तो ठेवायचा म्हणजे खरंच अशक्य होता तो!

त्यानं दिलेलं संचित जमा करून ते जपणं अवघड आहे. पण मी प्रयत्न करत राहाते. बाबा नास्तिक होता, पण मी देव मानते. त्या देवानंच मला ‘निळूभाऊ फु लें’सारखा उत्कृष्ट बाबा दिला; ज्यानं माझं जगणं समृद्ध करून टाकलं!