पर्यावरणरक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजोपयोगी संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही माहिती.

नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज इंडिया – निसर्ग, वन्यजीव यांच्याविषयी तरुण व लहान मुलांमध्ये सजगता यावी, पर्यावरणाविषयी त्यांच्यात प्रेम निर्माण व्हावे, यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न करते. त्यासाठी ही संस्था वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते. या संस्थेच्या मुंबईतील केंद्राच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २६४७८९४१, ०२२ २६४७३७४२.

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
Transport system plays a vital role in strengthening the economy
पहिली बाजू: दळणवळणातून विकासाला ‘गतिशक्ती’
Centre for Development of Advanced Computing (C-DAC), ICT electronic, pune, pune news
वर्धानपनदिन विशेष : ‘सीडॅक’, इलेक्ट्रॉनिक ‘आयसीटी’त देशाला स्वावलंबी बनवण्याचा वसा!

 क्लीन एअर आयलंड – पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी सेंद्रिय शेती, प्रदूषण निर्माण न करणारी वाहने, कचऱ्याचे व्यवस्थापन, यांसारख्या मुद्दय़ांच्या संदर्भात जनजागृती करण्याचे कार्य ही संस्था करते. त्यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २३६१९२४९.

 फ्रेंडस् ऑफ ट्रीज – ही स्वयंसेवी संस्था वृक्षाची लागवड, जतन आणि संवर्धन या क्षेत्रात कार्य करते. त्या संदर्भात जनतेला माहिती देणे, जनजागृती करणे यासाठी या संस्थेतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २२८७०८६०.

 टॉक्सिक लिंक – कचरा ही केवळ पर्यावरणाची हानी करणारी समस्या आहे, हा गैरसमज दूर करणारी ही संस्था आहे. कचऱ्याचा संबंध शहर व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन आणि सामाजिक न्याय या मुद्दय़ांशीसुद्धा आहे, हे दाखवून देण्यासाठी ही संस्था कार्य करते. कचऱ्याचे वर्गीकरण ओला, सुका, वैद्यकीय, ई-कचरा, बांधकामामुळे निर्माण होणारा कचरा, रासायनिक कचरा, वगैरे प्रकारे करायला हवे हेही पटवून देण्याचा ही संस्था प्रयत्न करते. त्यांच्या मुंबईतील हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २४३२०७११.

 क्लीन मुंबई फाऊंडेशन – प्रामुख्याने दक्षिण मुंबईत काम करणारी ही संस्था कचऱ्यासंदर्भात जनजागृती करते. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन नीट व्हायला हवे, उघडय़ावर कचरा टाकणे बंद व्हायला हवे, घराघरातून कचरा उचलला जायला हवा, यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत – ०२२ २२०४४८३८, ०२२ २२८७५४९६.

 शुभांगी पुणतांबेकर – puntambekar.shubhangi@gmail.com