बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसत आहेत. पण त्याचबरोबर आरोग्यविषयक सजगताही वाढताना दिसत आहे. या वाढत्या सजगतेला साहाय्यभूत ठरणाऱ्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयांतर्गत सुरू केलेली ‘आरोग्य सेवा केंद्र’ या नावाने ओळखली जाणारी एक हेल्पलाइन आहे. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे – १०४. ही हेल्पलाइन सर्वासाठी आहे, परंतु ग्रामीण भागात, जिथे आरोग्य सेवा नसते, किंवा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध नसते, तिथे या हेल्पलाइनचा खूप उपयोग होतो. साप चावणे, विषबाधा होणे, गरोदर स्त्रियांचे प्रश्न, वगैरै बाबतीत तातडीने सल्ला हवा असल्यास तज्ज्ञ डॉक्टर या हेल्पलाइनवरून सल्ला देतात. तातडीने औषध हवे असल्यास औषधाचे नाव एस.एम.एस. करून कळवले जाते.

आवश्यकता भासल्यास रुग्णाच्या जवळपास असणाऱ्या ‘आरोग्य सेवा केंद्रा’चे कार्यकर्ते रुग्णाला मदत करतात. आठवडाभर २४ तास सुरू असणाऱ्या या हेल्पलाइनवरून समुपदेशनही केले जाते. विशेषत: समाजाचे मानसिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी या हेल्पलाइनवरून मदत केली जाते.

आता आपण मानसिक आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या आणखी काही हेल्पलाइन्सची माहिती करून घेऊ या. सर्व हेल्पलाइन्स विनामूल्य आहेत. निराळा उल्लेख नसल्यास त्या २४ तास सुरू असतात.

‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ या सामाजिक विज्ञान आणि समाजसेवा याचे शिक्षण देणाऱ्या मुंबईतील संस्थेतर्फे ‘आय कॉल’ ही हेल्पलाइन चालवली जाते. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे – ९१२२-२५५६३२९१.
सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ही हेल्पलाइन सुरू असते.
वांद्रेवाला फाऊंडेशन, मुंबई दूरध्वनी क्रमांक – १८६० २६६ २३४५, १८०० २३३ ३३३०.
आधार, ठाणे, दूरध्वनी क्रमांक – ०२२-२५४२६७५३, ०२२-२५३४१७०८.
आत्मविश्वास विद्यालय, मुंबई – दूरध्वनी क्रमांक – ०२२-२६२०६८०८, ०२२-२६२०५१७८, ०२२-२६७०२७५५.
दिलासा, मुंबई – दूरध्वनी क्रमांक – ०२२-२६४००२२९.
– शुभांगी पुणतांबेकर

More Stories onमराठीMarathi
मराठीतील सर्व हेल्पलाइन्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helplines for health
First published on: 02-04-2016 at 01:03 IST