सध्या बाजारात, इंटरनेटवर किचन वेस्टचे कंपोिस्टग वा खत करणाऱ्या विविध महागडय़ा परदेशी साधनांची रेलचेल झाली आहे; हौशी, पर्यावरणप्रेमींना याची सविस्तर माहिती नसल्यामुळे हे खर्चीक प्रकार खरेदी केले जात आहेत. अशी साधने खरेदी करण्यापूर्वी खालील मुद्दय़ांप्रमाणे खात्री करून घ्या..
० खत म्हणून दिली जाणारी पावडर किंवा मिश्रण खरोखर नैसर्गिक आहे की रासायनिक पावडर याची खात्री करावी.
० बायो या संज्ञेखाली सर्रास रासायनिक पावडर विकली जात आहे, त्यामुळे सांगितलेल्या मिश्रणाचे नाव, कंपनी, पत्ता, ब्रँड याची प्रत्यक्ष खात्री करून घ्या. त्याची इंटरनेटवर जाऊन खातरजमा करून घ्या. झालेल्या खतात गांडूळ थांबतात का, वाढतात का, याचा शोध घ्या.
० या साधनांमध्ये तयार होणाऱ्या खतांचा नक्की भाजीपाला व फुलझाडांना फायदा होतो का याची खात्री करा. अशी साधने कोणी विकत घेतली असतील, त्यांचा अनुभव जाणून घ्या.
० अशी साधने विकसित करणाऱ्या आस्थापनाने त्यांनीच बनवलेल्या खतात प्रत्यक्ष बाग फुलवून खताचा वापर केला आहे का, याची खात्री करा. ते फक्त कचऱ्याची जागेवरच व्यवस्था व्हावी याची सोय करतात. उपयुक्त खत तयार करत नाहीत, कारण ओला व सुका कचरा नसíगकरीत्या सुकवला, त्याचे व्यवस्थापन केल्यास त्याचे परिणाम अधिक चांगल्यारीत्या व खात्रीशीर पाहायला मिळतात व तेही अल्प खर्चात.
संदीप चव्हाण -sandeepkchavan79@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2015 रोजी प्रकाशित
गच्चीवरची बाग : खत खरेदी सावधतेने
बायो या संज्ञेखाली सर्रास रासायनिक पावडर विकली जात आहे,
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:

First published on: 01-09-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beware of buying fertilizer