डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा ‘वृद्ध पर्वाची सुरुवात?’ (१४ ऑक्टोबर) हा लेख वाचला. स्वत: म्हातारं होईपर्यंत म्हातारपण म्हणजे काय हे कळत नाही, हे स्वानुभवातून सांगतो. पटवर्धन यांनी या सर्वव्यापी सामाजिक समस्येवर उद्बोधक लेख लिहून विषयाचे गांभीर्य जनतेसमोर आणले आहे. म्हातारपण आणि मरण कुणालाही चुकवता येत नसते हे आपण विसरून चालणार नाही. या लेखासाठी लेखिकेचे आभारच. – अ. वा. कोकजे

विधुरत्वाबाबत ‘ही’ गुंतवणूक महत्त्वाची!

‘विधुरत्व.. नको रे बाबा!’ हा शिरीषकुमार पाठक यांचा लेख (१४ ऑक्टोबर) वाचला. असे वाटले, की ही परिस्थिती वाचून तरी मर्दानी ‘मर्दानगी’ बाजूला ठेवावी! विम्याचे हप्ते भरले की संपले आपले कर्तव्य, असे समजणे किती चुकीचे आहे हे समस्त पुरुषांच्या लक्षात यावे. सेवानिवृत्तीनंतर तरी घरातील कामे शिकून घ्यावीत आणि आपली उपयुक्तता वाढवावी. खाण्याइतकेच बोलण्यावरही नियंत्रण ठेवण्याचा सराव करावा. म्हणजे तुम्हाला लेक असला तर त्याला नाही वाटले, तरी सुनेला तुम्हाला ‘बाबा’ अशी हाक मारताना पाहून सार्थ वाटेल. आयुष्याचा शेवटचा काळ घरात आणि घरातल्यांसोबतच काढावा लागणार आहे, हे न विसरता त्याच्याशी प्रेमाने, निदान बाहेर आपण सर्वांशी जसे आणि जितके सौजन्याने, समंजसपणे वागतो तितक्याच समजूतदारपणे घरातल्यांशी वागणे ही उत्कृष्ट गुंतवणूक ठरेल. एवढे जरी उमजले, तरी हेही नसे थोडके! – गजानन गुर्जरपाध्ये

What Hemant Godse Said?
हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या पाया पडल्यानंतर म्हणाले, “मी आशीर्वाद”..; काळाराम मंदिरात नेमकं काय घडलं?
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद

जोडीदाराशिवायच्या वार्धक्यासाठी आपणच उपाय शोधावेत

‘विधुरत्व.. नको रे बाबा’मध्ये म्हटल्याप्रमाणे आयुष्याचा जोडीदार अर्ध्यावरती डाव सोडून गेल्यानंतर उरलेले आयुष्य एकटेपणाने जगावे लागते आणि त्याकरिता मनाची तयारी ठेवावी लागते हे खरेच आहे. या अवस्थेत जगण्यासाठी आपापले मार्ग चोखाळावे लागतात.

जन्म-मृत्यू नियतीच्या अधीन असल्यामुळे जोडीदाराच्या कायम विरहाला स्थिरचित्त राहून सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नसते. परिवारातील नातेसंबंध सौहार्दाचे असले तर वृद्धाश्रमाचे द्वार पाहावे लागत नाही. तथापि आपले जगण्याचे बदललेले वेळापत्रक जोडीदाराशिवायही सुसह्य करण्यासाठी आवडीचा छंद जोपासणे, वाचन, लेखन, संगीत ऐकणे, समवयस्क मित्रांबरोबर उपयोगी गप्पा, ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद होऊन वेळ सत्कारणी लावणे इत्यादी मार्ग उपलब्ध असतात. आर्थिकदृष्टय़ा वृद्धाश्रम परवडत नसेल अशा नागरिकांसाठी शासनाने किमान खर्च भागवणारी मदत योजना आणली पाहिजे. ज्या ज्येष्ठ नागरिकाकडे आधीचे कौशल्य आहे त्याचाही उपयोग करून घेता येईल. ज्येष्ठ नागरिक संघटनेची शीर्षस्थ संघटना राज्यस्तरावर स्थापन करून त्याला महापालिका, विधि मंडळ, राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, जेणेकरून त्यांना कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ येणार नाही. छापील माध्यमांनी त्यांचा आवाज बुलंद करण्यात मदत केली पाहिजे. ‘विधुर’ हा शिक्का न होता लोकसंग्रहाद्वारे समाजप्रबोधन झाले पाहिजे.- श्रीकृष्ण फडणीस