उदयराज साने – response.lokprabha@expressindia.com

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते १७ व्या लोकसभेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांचे. काय होणार याचा ज्योतिषांनी मांडलेला अंदाज-

देशात १७ व्या लोकसभा निवडणुकीचे रणिशग आता फुंकले गेले आहे. सत्तेच्या सारीपाटावर आता काळ नव्या सोंगटय़ा घेऊन येणार आहे. त्याचे स्पष्ट संकेत काळरूपी ग्रहयोग देणार आहेत. सत्तेचा सोनेरी मुकुट कोणाला मिळणार व तो कसा मिळविता येईल यावर देशव्यापी खलबते सुरू झालेली आहेत. या राजकीय पाश्र्वभूमीला तोडीस तोड अशी ग्रहांची मोच्रेबांधणी तितकीच टोकदार आहे. सतराव्या लोकसभेसाठी सुमारे ८२ कोटी मतदान करणार आहेत. भारतातील १८ प्रमुख भाषा व ६५ हून अधिक उपभाषिक गट यात भाग घेणार आहेत. या मतदारांत ६८ टक्के ग्रामीण व ३२ टक्के शहरी जनता मतदार यात भाग घेणार असून, नव्यानेच मताचा अधिकार मिळालेले ११ कोटी नवे मतदार आहेत ही सर्व मते ६० पक्षांत विभागली जाणार असून, या निवडणुकीचा एकूण खर्च सुमारे १७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. इतकी टोलेजंग अशी निवडणूक साधारणत ‘एप्रिल व मे’पर्यंत एकूण नऊ टप्प्यांत होऊ शकते. विस्तारभयास्तव या संपूर्ण निवडणुकीचा वेध आटोपशीर करणार आहोत. यात प्रामुख्याने भाजपा व काँग्रेस हेच मुख्य घटक धरून त्यांच्या पक्षांच्या कुंडल्या आपण क्रमश पाहणार आहोत व यानंतर काही राज्यांच्या घटक पक्षांच्या कुंडल्यांचा विचार करणार आहोत व सर्वात शेवट तडजोडीच्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. प्रथमत आपण भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रिकेचा विचार करू.

भारतीय जनता पक्ष :

भारतीय जनता पक्षाला साडेसाती सुरू आहे, शनीचे गोचर भ्रमण ‘धनू’ राशीतून सुरू आहे, नव्या लोकसभेचे मतदान कदाचित मार्चच्या शेवटच्या सप्ताहापासून सुरू होईल व १५ मे २०१९ पर्यंत संपेल. ही लोकसभा निवडणूक सात ते नऊ टप्प्यांत होईल, या वेळी सत्तेचा कारक रवी-मीन व मेष राशीत राहणार आहे. १४ एप्रिलला गोचर रवी-मेष राशीत प्रवेश करतो. या अगोदरच गोचर ‘राहू’चे राश्यांतर २३ मार्च २०१९ ला होणार आहे. भाजपाच्या कुंडलीत हा गोचर राहू लग्नातून व सप्तमातून ‘केतू’ भ्रमण होत आहे. मार्च महिन्याच्या  २९ ला गोचर गुरू धनू राशीत भ्रमण करणार आहे. हा गोचर गुरू २२ एप्रिलला वक्री होऊन पुन्हा वृश्चिकेत येणार आहे. या घडामोडीमुळे भाजपाच्या कुंडलीला थोडा आधार मिळणार आहे. या गोचर गुरूचा धनू राशीतील कालावधी फक्त २२ दिवसांचा आहे. या बावीस दिवसांत लोकसभा निवडणुकीचे सुमारे तीन टप्पे होऊ शकतात. या तीन टप्प्यांत पक्षाला अनुकूलता मिळण्याची शक्यता वाढलेली दिसून येईल. उर्वरित टप्प्यात इतर प्रमुख ग्रहांच्या अनुषंगाने जशा तारखा जाहीर होतील, त्याप्रमाणे यशाचे मापदंड बदलत राहतील, याचे खरे कारण गोचर चंद्राला प्राधान्य द्यावे लागणार असते. एप्रिलपासूनच्या निवडणूक काळात ‘शनी-प्लुटो’ युतीच्या प्रतियोगात राहू असल्याने या संपूर्ण निवडणुकीवर पापग्रहांचे अधिराज्य असणार आहे. भाजपाच्या कुंडलीत ‘लग्न-सप्तमातून’ हा मोठा कुयोग होत असल्याने संपूर्ण निवडणूक निकराच्या संघर्षांतून पार पडणार आहे. भाजपा ४०० जागा लढवेल असे गृहीत धरले तर भाजपा १९० ते २३० जागांपर्यंत मजल मारू शकते असा अगदी प्राथमिक अंदाज आहे हा अंदाज अंतिम नाही कारण, मतदानाच्या दिवसाची ग्रहस्थिती सर्वात महत्त्वाची असते, व यातूनच आपल्याला नेमके चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल. १५ एप्रिलला गोचर शुक्र मीन राशीत येईल त्याचा पुरेसा फायदा भाजपाला होईल. ‘कृत्तिका’ नक्षत्रातील मंगळ मात्र देशात निवडणुकीत िहसाचार घडवून आणू शकतो.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (१७.०९.१९५०)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा भाजपाची कमान सांभाळण्याची संधी मिळणार असून त्यांना गोचर गुरूचे चांगले फायदे मिळणार आहेत. १५ मार्च २०१९ मीन राशीत गोचर रवी राहणार आहे. या गोचर रवीचे मूळ कुंडली राहूवरून भ्रमण होणार आहे. पंतप्रधानांना यामध्ये जरा त्रास होऊ शकतो. १४ एप्रिलला सत्तेचा कारक रवी मेष राशीत प्रवेश करेल. हा गोचर रवी मात्र त्यांना संपूर्ण चांगला असून जवळजवळ पाऊण निवडणूक या रवी भ्रमणात पार पडणार असल्याने ते भाजपाचा जोरदार प्रचार करणार आहेत; व या गोचर रवीला ‘गुरु-शनी’ची साथ मिळणार असल्याने त्यांना यशाचे झुकते माप मिळू शकते. ७ मे रोजी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करतो. मूळ कुंडलीतील कन्या रवी आणि गोचर मिथुनेतील राहू यांचा केंद्रयोग होत आहे. हा केंद्रयोग त्यांना चांगलाच अडथळा निर्माण करणार आहे. संपूर्ण उत्तर भारतासह, लोकसभेच्या जास्तीच्या जागा असलेली उर्वरित राज्ये याचा त्यांना मोठा प्रवास करावा लागणार आहे. तसा प्रवास करून पुन्हा एकदा मोदी लाट त्यांना निर्माण करावी लागणार आहे. हे करताना त्यात किती यश मिळते यावरच निवडणुकीचे पुढील भाकीत करणे शक्य होणार असल्याने त्यांचा पुढील मार्ग बिकट असल्याचे पूर्णपणे दिसून येते; परंतु सत्तेचा कारक रवी, गोचर गुरूचे व शनीचे अनुकूल भ्रमण या बडय़ा ग्रहांची त्यांना मिळणारी साथ त्यांच्या यशाचा एक टप्पा सहज पार करून देतील असे वाटते. दशाबळही त्यांना चांगले मिळणार आहे.

या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष बऱ्याच समविचारी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसत असून खरोखरच त्यांचे एकत्रीकरण झाले आणि त्यांचे जागा वाटप संतोषजनक स्थितीत पार पडले तर मात्र भारतीय राजकारणातील तो एक चमत्कार म्हणावा लागणार आहे. आता आपण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रिका प्रथम पाहणार आहोत.

राहुल गांधी (१९.०६.१९७०)

राहुल गांधी ११ डिसेंबर २०१७ ला काँग्रेसचे अध्यक्ष झाले व त्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या प्रक्रियेतील एक मोठा अडथळा संपला. त्यांच्या कुंडलीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे ‘रवी-गुरू’ नवपंचम योग. या शुभयोगामुळे त्यांचा मोठय़ा घराण्यात जन्म झाला, पण या रवी-गुरूला इतर ग्रहांची साथ मिळाली तरच व्यक्ती थोर पदाला पोचते. तथापि त्यांना इतर ग्रहांची साथ प्रारंभापासूनच मिळाली नसल्याचे नमूद करावे लागते. सत्तेचा कारक रवी भ्रमण प्रथमत मीन राशीतून १५ मार्चपासून सुरू होते ते १४ एप्रिलपर्यंत. त्यानंतर हा गोचर रवी मेष राशीतून भ्रमण करणार आहे. राहुल गांधींच्या षष्ठातून व सप्तमातून भ्रमण करणार आहे. मेष राशीतील रवी भ्रमण जन्मस्थ कुंडलीतील शनीवरून होणार असून त्यांचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही. उलटपक्षी प्रचारातसुद्धा बऱ्यापकी विस्कळीतपणा येणार आहे. तर त्या अगोदरचा मीन रवी हा गोचर शनीच्या केंद्रात राहणार आहे. म्हणूनही त्यांना त्याचा फारसा उपयोग नाही. शनीचे गोचर भ्रमण धनू राशीतून सुरू असून हा गोचर शनी त्यांच्या जन्मस्थ कुंडलीतील चंद्रावरून भ्रमण करत असून या गोचर शनीच्या समोरच म्हणजेच शनीच्या सप्तमात ‘रवी-मंगळ’ असल्याने संपूर्णपणे सत्ताभंग योगाची पुनरावृत्ती होते. गुरूचे गोचर भ्रमणही त्यांना अनुकूल नाही. त्यांच्या जन्मस्थ चंद्राला हा गोचर गुरू बारावा आहे. २९ मार्चला हा गोचर गुरू धनू राशीत जाणार आहे. या वेळी हा गुरू त्यांच्या जन्मस्थ चंद्रावरून जात असल्याने व या चंद्राच्या समोरच ‘रवी-मंगळ’ असल्याने त्यांना गुरुबळ मिळणार आहे. हे गुरुबळ त्यांना फक्त २३ दिवसच राहणार आहे. या २३ दिवसांत निवडणुकीचे जितके टप्पे असतील या सर्व टप्प्यांत काँग्रेसला चांगले यश मिळाल्याचे अनुभवास येईल, पण एकूणच त्यांना राहू महादशा आता सुरू आहे. तसेच इतर ग्रहांबरोबर दशाबळही नसल्याने या १७ व्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पदरी संपूर्ण निराशाच येणार आहे. त्यांच्या नेतृत्वावरच अनेक लोक नंतर शंका उपस्थित करणार आहेत.

काँग्रेस

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसची कोणतीही मोठी तयारी अद्याप तरी दिसलेली नाही. प्रथमत ते भाजपाविरोधात सर्व पक्षांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत गुंतून पडले आहेत. वास्तविक पाहता अनेक प्रादेशिक पक्षांकडे लोकसभा निवडणूक लढवून जिंकतील अशी क्षमता नसल्याने त्यांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देण्याचे कारण नव्हते. पण संपूर्ण लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व स्वतकडे घेण्याची पक्षाची तयारी नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. या निवडणुकीचे मतदान मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून १५ मे २०१९ पर्यंत सुमारे नऊ टप्प्यांत होणार हे गृहीत धरले तर ग्रहस्थिती कशी असणार आहे ते आपण पाहणार आहोत. सत्तेचा कारक असलेल्या रवीचे भ्रमण मीन व मेष राशीतून होणार आहे. १५ मार्चला रवी मीन राशीत प्रवेश करतो, त्यापाठोपाठ २३ मार्चला गोचर राहू मिथुन राशीत प्रवेश करतो. काँग्रेस पक्षाच्या कुंडलीत धनू राशीत गोचर ‘शनी -प्लुटो-केतू’ असा निग्रह योग सुरू होतो. त्याच्या केंद्रात सत्तेचा कारक रवी राहणार असल्याने पक्षातून अनेक प्रकारच्या धक्कादायक वार्ता येण्यास सुरुवात होईल. अंतर्गत हेवेदावे पक्षापुरते न राहता वृत्तपत्रांचे मथळे सजणार आहेत. १४ एप्रिलला रवी राश्यांतर करून मेष राशीत प्रवेश करेल, या वेळी हा गोचर रवी पक्षाच्या मूळ कुंडलीतील चंद्र शनीवरून भ्रमण करणार आहे. म्हणूनही विरोधाची धार आणखी तीव्र होत जाणार आहे. मीन-रवीला गोचर गुरुचा सहवास मिळू शकतो, कारण गोचर गुरु २९ मार्चला धनू राशीत प्रवेश करणार आहे. काँग्रेसच्या धनू लग्नाच्या कुंडलीत लग्नात आलेला गुरू पक्षातील पडझड रोखण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. पण हे गुरुबळ पक्षाला २२ एप्रिलपर्यंत मिळणार आहे. या कालावधीत होणाऱ्या मतदानाचा पक्षाला निश्चितपणे फायदा मिळेल, पण काँग्रेसची मेष रास असल्याने वृश्चिक गुरूचा फायदा संपूर्ण मिळणार नसला तरी काँग्रेसच्या मूळ कुंडलीतील ‘रवि-बुध-नेपच्युन’वरून त्याचे भ्रमण होणार असल्याने पक्षाला त्याचा थोडा फायदा निश्चितच मिळेल. २२ मार्च ते ६ एप्रिल गोचर मंगळ ‘कृत्तिका’ नक्षत्रात राहणार असल्याने अति तीव्र उन्हाळा असेल. निवडणुकीत िहसाचार अटळ असल्याचे दिसून येते. मतदानावरसुद्धा याचे वाईट परिणाम होणार आहेत. ‘पाणी-वीज’ यांची तीव्र टंचाई तशातच विविध पक्षांतील उमेदवारांची भारंभार आश्वासने या साऱ्या प्रकाराला जनताच कंटाळणार असून ती राक्षसी रूप धारण करेल. काँग्रेस पक्षासाठी इतके मात्र निश्चितपणे घडेल की गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा त्यांना यावेळी निश्चितच जिंकता येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपा-काँग्रेस यांची खरी कोंडी कोणी केली असेल तर प्रादेशिक पक्षांनी. या प्रादेशिक पक्षांच्या प्रत्येकाच्या कुंडल्या विस्तारभयास्तव घेतल्या नाहीत. तरी या निवडणुकीत त्यांची नेमकी भूमिका कशी राहील हे आपण पाहणार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेस : ‘तूळ’ लग्नाच्या या कुंडलीत गोचर ‘गुरू-शनी-राहू’ यांची साथ मिळणार असल्याने पक्ष फुटीचा धोका जमेस धरूनही असे ठामपणे सांगता येते की गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा ते निश्चितपणे जिंकू शकतात.

शिवसेना : भाजपाबरोबर युती झाली तरीही गेल्या वेळच्या पेक्षा जागा कमी मिळणार आहेत. कारण मूळ मिथून लग्नाच्या कुंडलीत ‘रवी-चंद्र-बुध-गुरू’ यांच्या सप्तमातून होणारा ‘शनी-प्लुटो-केतू’ या त्रिग्रह योग. सेनेच्या कुंडलीतील दशमस्थानातील शनीवरुन ‘मीन-रवी’चे होणारे भ्रमण पक्षात अंतर्गत फूट पाडताना आढळणार आहे.

बिजू जनता दल :  ‘मीन’ लग्नाच्या कुंडलीत रवीवरून होणारा ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग पक्षाचे नुकसान करणार आहे. केवळ गुरूच्या भाग्यस्थानातील व दशमस्थानातील भ्रमणामुळे गेल्या वेळेपेक्षा थोडेच सदस्य कमी होतील. गोचर रवीचे मीनेपेक्षा मेष राशीतील भ्रमण पक्षाला थोडे अनुकूल ठरेल.

जनता दल : जनता दलाच्या धन लग्नाच्या कुंडलीत लग्नातूनच हा त्रिग्रह योग होत आहे. हा त्रिग्रह योग जनता दलाच्या मूळ कुंडलीतील ‘रवी-चंद्राच्या’ केंद्रात होणार आहे. मीन व मेष रवीपकी मीन-रवीचे त्यांना साहाय्य होणार नाही, पण कन्या राशीच्या तृतीय व बदलणाऱ्या गुरूचे त्यांना साहाय्य होणार आहे.

द्रविड मुनेत्र कळघम : करुणानिधींचा हा पक्ष. सत्तेचा कारक रवी, मीन राशीतून जाणारा वृश्चिक, लग्नाच्या कुंडलीत पंचमस्थानातील राहूवरून ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’चे भ्रमण होणार आहे. मेष-रवी मात्र त्यांना वाईट नाही. मात्र त्यांच्या मिथुन राशीच्या सप्तमातून होणारा ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग त्यांना चांगलाच झगडायला भाग पाडणार आहे, तसेच या निमित्ताने स्थानिक प्रश्न उफाळून येणार असल्याने मतदानावर विपरीत परिणाम करणार आहेत. मागच्या इतक्या जागा राखणे त्यांना कठीण होणार आहे.

अण्णा द्रविड मुनेत्र कळघम : धनू लग्नाच्या या कुंडलीत ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग मूळ कुंडलीतील हर्षलच्या व मंगळाच्या केंद्रातून होत आहे. तसेच सत्तेचा कारक रवी मीन राशीतून या त्रिग्रहांच्या व ‘हर्षल-मंगळ’च्या प्रतियोगातून जात आहे. या पक्षाला साडेसाती सुरू असल्याने यांच्या जागेतसुद्धा लक्षणीय घट होणार आहे.

बहुजन समाज पक्ष : कर्क लग्नाच्या कुंडलीत ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग आहे. त्यांच्या कन्या राशीच्या चतुर्थात हा योग होत असल्याने मीन-रवी त्याच्या कचाटय़ात सापडतो. पण मेष-रवी मात्र सापडत नसला तरी हा गोचर रवी पक्षाच्या मूळ कुंडलीतील शनीसमोर राहणार असल्याने त्याचेही बळ कमी होणार आहे. तरीही मागील वेळेपेक्षा या वेळी त्यांच्या जागांमध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मूळ कुंडलीतील चंद्राच्या तृतीय स्थानात आलेल्या गोचर गुरूचे त्यांना साहाय्य होणार आहे. नव्या लोकसभेत यांचे स्थान उंचावणार आहे.

आसाम गण परिषद : या पक्षाच्या धनू लग्नाच्या कुंडलीत लग्नातच ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग होत आहे. हा योग त्यांच्या मूळ कुंडलीतील रवी व चंद्राच्या केंद्रात होणार असल्याने या पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत निकराचा सामना करावा लागणार आहे. वृश्चिक व धनू राशीतील गोचर गुरूचे मात्र त्यांना साहाय्य होणार असून गेल्या वेळेपेक्षा या वेळी थोडय़ाच जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

तेलगु देशम पार्टी : या पक्षाच्या मिथुन लग्नाच्या कुंडलीत ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग सप्तमातून होत असल्याने व मूळ कुंडलीतील शनीच्या केंद्रातून हा योग होत असल्याने मीन-रवी बाधित झालेला आहे. पण मेष-रवीत त्यांना त्यांच्या मूळ कुंडलीतील गुरूच्या प्रतियोगात येत असल्याने त्यांची घसरगुंडी थांबवू शकणार आहे.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया : या पक्षाच्या मीन लग्नाच्या कुंडलीतील दशमस्थानात गोचर शनी-प्लुटो-केतू’चा योग त्आहे. हा योग यांच्या मूळ कुंडलीतील रवीवरून होणार असल्याने तसेच मीन, रवी व मेष यातील मीन, रवी त्या कुयोगाच्या कचाटय़ात सापडणार असल्याने त्यांचे संख्याबळ आणखी घटणार आहे.

तृणमूल काँग्रेस : या पक्षाच्या मीन लग्नाच्या कुंडलीतील दशमस्थानातून हा गोचरीचा ‘शनी-प्लुटो-केतू’ असा त्रिग्रह योग होत आहे. त्यांच्या मूळ कुंडलीतील रवीवरून त्याचे भ्रमण होणार असल्याने या पक्षाला वाढत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल. या पक्षाला साडेसाती सुरू झालेली असल्याने त्यांचे आडाखे हमखास चुकणार आहेत. तसेच अनेक सदस्य थेट नेतृत्वालाच आव्हान देण्याची भाषा करणार असल्याने या निवडणुकीत मीन-रवीचा त्यांना फारसा उपयोग होणार नाही मेष-रवी मात्र त्यांची मोठी पडझड थांबविण्यात यशस्वी होईल. या निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागू शकते.

आम आदमी पक्ष : या पक्षाच्या कुंभ लग्नाच्या कुंडलीत हा ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग अकराव्या स्थानातून होत असल्याने त्याचा त्यांना फायदा होताना आढळून येईल. सत्तेचा कारक मीन व मेष रवीपकी मीन-रवी त्यांच्या मूळ कुंडलीतील चंद्राला आठवा राहणार आहे तर मेष- रवी त्यांच्या मूळ कुंडलीतील ‘शनी-राहू’ यांच्या समोर राहणार आहे. म्हणूनच त्याचे बळ कमी झाले आहे. तरी वृश्चिक गुरूचे भ्रमण त्यांच्या मूळ कुंडलीतील रवीवरून होत असल्याने व धनू राशीतील गोचर गुरू त्यांच्या लाभस्थानात येत असल्याने या निवडणुकीत त्यांना काही जागा जिंकता येतील.

अकाली दल : या पक्षाच्या तूळ लग्नाच्या कुंडलीत तृतीय स्थानातून ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग होत आहे. हा योग त्यांना फायद्याचा ठरणार आहे. तसेच मीन व मेष रवी हा योग मूळ कुंडलीतील गुरूच्या शुभयोगात होत असल्याने या निवडणुकीचा सर्वात जास्त फायदा या पक्षाला होणार आहे. अकाली दलाच्या मूळ कुंडलीतसुद्धा ‘रवी-गुरू’ योग असल्याने त्यांना त्यांचा जास्तीचा फायदा उठविता येईल. गेल्या वेळेपेक्षा जास्तीच्या जागा जिंकणे त्यांना सहज शक्य होणार आहे.

समाजवादी पक्ष : या पक्षाच्या धनू लग्नाच्या कुंडलीत लग्नातच ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग होत आहे. हा त्रिग्रह योग त्यांच्या मूळ कुंडलीतील ‘चंद्र-हर्षल’वरून तसेच रवी-मंगळाच्या अशुभयोगातून होत असल्याने त्यांना पक्षांतर्गत मोठय़ा संघर्षांला तोंड द्यावे लागणार आहे तसेच सत्तेच्या कारक रवीचे मीन व मेष राशीतील भ्रमण त्यांना तापदायक जाणार असून या लोकसभा निवडणुकीत त्यांना फारशी चमक दाखविता येणार नाही. गेल्या वेळच्या जागा राखणेसुद्धा त्यांना अवघड होणार आहे.

मनसे : या पक्षाच्या वृषभ लग्नाच्या कुंडलीत त्यांच्या मिथुन चंद्राच्या सप्तमातूनच ‘शनी-प्लुटो-केतू’ त्रिग्रह योग होत आहे, त्यामुळेच या पक्षाचे उपद्रवमूल्य त्यांच्या विरुद्ध पक्षांच्या उमेदवारांना चांगलेच जाणवणार आहे. मीन-मेष रवीचे भ्रमण त्यांना फारसे तापदायक नसल्याने या निवडणुकीत या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली तर मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ दिसून येईल. त्याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच दिसून येईल. आत्तापर्यंत आपण भारतातील साधारण प्रादेशिक पक्षांच्या कुंडल्या तपासल्या. यात अगदी कमी पक्षांना गेल्या वेळच्या जागा राखता येणार असल्या तरी ही संख्या सुमारे १७५ ते २०० जागांपर्यंत जाते. यामुळेच भारताचे सर्व राजकारण प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेल्यासारखे चित्र दिसत आहे. यामुळेच निवडणुकीनंतर अनेक पक्ष कुंपणावर बसल्याचे दिसून येतील. यात तडजोड करण्यासाठी अनेक पक्षांची कोणतीही पातळी गाठायची तयारी असणार आहे, मग ही तडजोड अथवा नाव कोणते पद मागेल याची कोणतीही शाश्वती नसल्याने पंतप्रधानपदासाठी तडजोडीचे संभाव्य उमेदवार म्हणून नितीन गडकरी यांचे नाव अनुक्रमाने येते, यासाठीच आपण त्यांच्या कुंडलीचाही विचार करणार आहोत.

नितीन गडकरी (२७.०५.१९५७)

भारतीय जनता पक्षातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही मान्य असणारा अजातशत्रू, सर्वमान्य नेता म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. यांच्या पत्रिकेत मूळ कुंडलीतील रवीसमोरून गोचर गुरूचे भ्रमण सुरू असल्याने, त्यांना सर्व थरांतून वाढता पािठबा मिळू शकतो. निवडणुकीच्या काळातील मीन-रवी व मेष-रवी त्यांना पूर्ण अनुकूल आहे, कारण ‘शनी-प्लुटो-केतू’ हा त्रिग्रह योग त्यांच्या धनू लग्नातून होत असून त्यांच्या मूळ कुंडलीतील चंद्राच्या भाग्यातून व गुरू दृष्ट योग होत असून त्यांना तापदायक नाही. निवडणुकीनंतरही त्यांना गुरूबळ उत्तम असल्याने कदाचित त्यांना सर्वोच्च पद मिळताना मोठी अडचण येणार नाही.

जनतेच्या दृष्टीने सांगायचे तर इतकी मोठी निवडणूक होऊन हाती फारसे काही लागले नाही, अशीच जनतेची भावना होणार आहे. नवे वर्ष ग्रहमानाच्या पाश्र्वभूमीवर प्रारंभापासूनच घातक असून या लोकसभा निवडणुका शांततेत होणार नाहीत. त्यातबरोबर या कळात देशात अनेक ठिकाणी पाणी प्रश्न पेटेल. तसेच प्रचंड उन्हाळा असेल. या सर्वाचा मतदानावर वाईट परिणाम होणार आहे. असंतोषाच्या आगडोंबातील या निवडणुका प्रक्षुब्ध जनता वाट्टेल ते करू शकते याची प्रचीती देतील. अति महत्त्वाकांक्षेमुळे ‘अति सर्वत्र वज्र्ययेत्’ चा प्रत्यय येईल.

जानेवारी २०१९ ला होणारी चंद्र आणि सूर्य ग्रहणे भारतात दिसत नसली तरीही त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यानंतर होणारा ‘शनी-केतू-प्लुटो’ त्रिग्रह योग वेगवेगळ्या नसíगक आपत्तींमध्ये मोठी वाढ करणार असून, यामध्ये प्रामुख्याने अवेळी व अवकाळी पाऊस, प्रचंड उन्हाळा, पाण्याचे व विजेचे दुíभक्ष्य, पक्षोपक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांचे आजारपण अथवा राजकीय हत्या, या अशा पाश्र्वभूमीमुळे या लोकसभा निवडणुका होतीलच अशी कोणतीही खात्री नाही, असा ग्रहांचा संकेत आहे.

(थलवा) रजनीकान्त यांचा पक्ष : मीन लग्नाच्या  या कुंडलीत वृषभ राशीच्या अष्टमात हा त्रिग्रह योग होत असला तरी चंद्राच्या सप्तमात गोचर गुरू व पुढे धनू राशीतील गुरूमुळे या पक्षाला लोकसभेचे दार उघडू शकते.

कमल हसन यांचा मकुल निधी मयम : या पक्षाची स्थापना अगदी अलीकडे झालेली असली तरी वृषभ लग्नाच्या लाभातून होणारे रवी भ्रमण व चंद्राच्या भाग्यात होणार तिग्रह योग आहे. या पक्षाने काँग्रेसच्या मदतीने निवडणूक लढविली तर त्यांच्या पक्षालासुद्धा लोकसभेचे दार उघडले जाईल. मेष रवीचा त्यांना चांगला फायदा झालेला दिसून येईल.