lp09lp08फेसबुक आणि व्हॉटस्अॅपसारख्या आधुनिक माध्यमांनी कलावंतांना लोकांपर्यंत- रसिकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. त्यामुळे कला रसिकाग्रणी झाली. या नवमाध्यमांमुळे चर्चेत आलेले तरुण शिल्पकाराचे नाव म्हणजे विशाल सूर्यकांत शिंदे. लोअर परळच्या चाळींमध्ये एका लहान खोलीत राहणारा विशाल दुसरीत असल्यापासूनच गणपतीच्या मूर्ती साकारायला लागला. ते बाळकडू मिळाले ते गिरणी कामगार असलेल्या वडिलांकडूनच. त्यांनाही गणपती करण्याची आवड होती. पावसाळा सुरू झाला की, ते गणपती करायला घ्यायचे. कलावंताचे हात लाभलेल्या विशालने नंतर जेजे कला महाविद्यालयातून ललित कलेची पदवी घेतली. २०१० साली त्याने केलेल्या गणपतीची छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली आणि बालगणेशाची ती मोहक रूपे काही मिनिटांतच लोकप्रिय झाली. त्यानंतर गेल्या वर्षी ती व्हॉटस्अॅपवर सर्वाधिक फॉरवर्ड झालेली गणेश छायाचित्रे होती. बालगणेशाच्या मोहक रूपांविषयी विशाल सांगतो, मी एकत्र कुटुंबात राहतो. घरी बरीच मुले आहेत. रोज सरावासाठी त्यांचे स्केचिंग करताना ही कल्पना सुचली, लोकांना आवडली आणि आता बालगणेशाच्या मागणीसाठी रसिक रीघ लावतात. बऱ्याच वर्षांनंतर साच्याबाहेरच्या गणेशमूर्ती यानिमित्ताने पाहायला मिळाल्या, म्हणूनच विशालने साकारलेली मोहक मूर्ती मुखपृष्ठावर घेण्याचा निर्णय ‘लोकप्रभा’ने घेतला!

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?