फेसबुक या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावरची जागतिक पातळीवर  १० कोटी खाती नकली आहेत, भारतासारख्या विकसित देशात हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. जगभरात ५० लाख ते दीड कोटी खाती अनावश्यक नोंद करण्यात आली आहेत असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.  
काही लोकांची एकाहून अधिक फेसबुक खाती असून त्यांनी सेवेच्या नियमांचा भंग केला आहे. नकली खाती म्हणजे एकच वापरकर्त्यांने त्याच्या मुख्य खात्यावर दुसरे एक खाते उघडले आहे. जगभरातील माहिती बघता २०१३ मध्ये हे प्रमाण ४.३ ते ७.९ टक्के लोक फेसबुकचे सक्रिय वापरकर्ते होते. आताच्या तिमाहीतील अहवालानुसार भारत व तुर्की या देशात अशा नकली व चुकीच्या खात्यांचे प्रमाण जास्त आहे.
३१ मार्च २०१४ अखेर फेसबुकचे १.२८ अब्ज सक्रिय वापरकर्ते असून मार्चपासून ब्राझील व भारत या देशातून पहिल्या तिमाहीत वापरकर्त्यांची संख्या २०१३ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १५ टक्के वाढली आहे.  २०१३ मध्ये चुकीच्या वर्गीकृत खात्यांची संख्या ०.८ ते २.१ टक्के अपेक्षित होती तर अनावश्यक खात्यांची संख्या ०.४ ते १.२ टक्के अपेक्षित होती. चुकीची वर्गीकृत खाती म्हणजे काही उद्योग, संस्था व मानवेतर पाळीव प्राण्यांच्या नावाने काढली जाणारी खाती होत. त्यात कंपनीच्या सेवाशर्तीचा खरेतर भंग होत आहे.