गुजरातमधील सुरत येथे ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साह दिसून आला. येथील एका संस्थेने तब्बल ११०० मीटर लांब तिरंगा ध्वज तयार केला होता. हजारो लोकांनी हातात घेऊन हा ध्वज धरला होता.

सुरतमधील अग्रवाल विकास ट्रस्टने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या ट्रस्टने ११०० मीटर लांब तिरंग्यासह शहरातून रॅली काढली. या रॅलीला शान-ए-तिरंगा असे नाव देण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, स्वंयसेवी संघटना आणि इतर क्षेत्रात नागरिक सहभागी झाले होते. देशातील इतर भागातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सरकारी, खासगी, स्वंयसेवी संस्थांनी उत्साहाने ध्वजारोहन केले. अनेक उपक्रमही राबवण्यात आले. देशासह विदेशातही विविध ठिकाणी स्थानिक भारतीयांनी ध्वजारोहण केले.