News Flash

एसबीआयमधून ३ लाख रुपये चोरून १२ वर्षांच्या मुलाचा पोबारा

सीसीटीव्हीच्या आधारे मुलाचा शोध सुरु

एसबीआयमधून ३ लाख रुपये चोरून १२ वर्षांच्या मुलाचा पोबारा
फोटो सौजन्य ANI

एका १२ वर्षांच्या मुलाने एसबीआय मधून ३ लाख रुपये चोरले आणि पळून गेला. एसबीआयच्या रामपूर शाखेत ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस या फुटेजच्या आधारेच या १२ वर्षांच्या मुलाचा पोलीस शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ही घटना घडली. एका बॅगेत या मुलाने ३ लाख रुपये भरले आणि काहीही घडलेच नाही अशा अविर्भावात तो ही बॅग घेऊन बँकेच्या बाहेर पडला. बँकेत पोलीसही उपस्थित होते तरीही मुळीच भीती न बाळगता हा मुलगा बँकेच्या बाहेर पडला. आता पोलीस या मुलाचा शोध घेत आहेत.

रामपूरचे व्यापारी बँकेत ३ लाख रुपये भरण्यासाठी आले होते. त्यांच्या बॅगेत ३ लाख रुपये होते आणि त्यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत होते. त्याचवेळी एक १२ वर्षांचा मुलगा तिथे आला त्याने ही बॅग उचलली आणि बँकेतून काढता पाय घेतला. या मुलाने रामपूरच्या व्यापाऱ्यावर नजर ठेवली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आथा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या मुलाचा शोध घेतला जातो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2018 5:01 am

Web Title: 12 year old steals rs 3 lakhs from sbi caught on cctv
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे राफेल करारात ३६ हजार कोटींचे नुकसान, राहुल गांधींचा आरोप
2 हर्षवर्धन यांचे ‘अज्ञान’वर्धन!
3 निद्रानाशाची समस्या आनुवंशिक
Just Now!
X