बिहार निवडणुकीदरम्यान जवळपास १६० टन जैववैद्यकीय कचरा जमा झाल्याचे राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदार, निवडणूक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी निवडणूक आयोगाने (ईसी) १८ लाख फेसशिल्ड्स, ७० लाख मुखपट्टय़ा, रबराचे ५.४ लाख हातमोजे (एकदा वापर करण्यापुरते) आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान करणाऱ्या मतदारांसाठी ७.२१ कोटी हातमोजे  उपलब्ध करून दिले होते. त्याचप्रमाणे १०० आणि ५०० मि.ली.च्या सॅनिटायझरच्या बाटल्याही उपलब्ध करून दिल्या होत्या.