21 January 2021

News Flash

अंत्यसंस्कार करतानाच काळाने डाव साधला; स्मशानभूमीचं छत कोसळून २१ जणांचा मृत्यू

अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुरादनगर स्मशानभूमी परिसरातील एका ठिकाणचे छत कोसळल्याने त्या खाली दबून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्या गेले असून, बचावकार्य सुरू आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत ताजी माहिती दिली आहे.

या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्त अनिता मेश्राम यांनी सांगितलं आहे.

अंत्यसंस्कारसाठी आलेले लोक पाऊस आल्याने एका छताखाली उभे राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या अंगावर छत कोसळलं व ते सर्वजण त्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळाताच पोलीस व एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली व बचावकार्य सुरू झालं.

या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “मी जिल्हा अधिकार्‍यांना मदतकार्य राबवण्याच्या व घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्यात येईल” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 4:51 pm

Web Title: 17 people have died so far while 38 people have been rescued after a shed collapsed in muradnagar msr 87
Next Stories
1 औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून आठवलेंची कोलांटउडी; आधी विरोध नंतर माघार
2 अरेरे! ७० हजारांसाठी बापाने एका महिन्याच्या चिमुकल्यालाच विकलं
3 लसीवरून राजकारण?; काँग्रेस नेत्यांनी ‘कोव्हॅक्सिन’बद्दल उपस्थित केली शंका
Just Now!
X