गिर्यारोहणामध्ये गेल्या काही वर्षांपासून तरुणाईचा जास्त कल दिसून येत आहे. विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख प्रस्थापित करु पाहणाऱ्या तरुणांचा ओढा या पर्वतरांगांच्या दिशेनेही दिसून येत आहे. अशातच तेलंगाणा येथील एका १९ वर्षीय तरुणाने माऊंट किलीमांजारो सर करत भारताचं नाव उज्वल केलं आहे.

सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हा समुद्र सपाटीपासून ५, ८९५ मीटर उंच असून, आफ्रिकेतील टांझानियामध्ये आहे. हा महाकाय पर्वत १९ वर्षीय अमगोथ तुकाराम याने सर करत एक नवा टप्पा सर केला आहे. हेल्मेट वापराविषयीची जनजागृती करण्यासाठी म्हणून त्याने ही मोहिम हाती घेतली आणि त्याची जबाबदारी पार पाडली.

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

‘वाहन चालवतेवेळी सर्वांनीच हेल्मेटचा वापर करावा हा संदेश पोहोचवण्यासाठी मी ही मोहिम हाती घेतली होती. प्रत्यक्ष एक अपघात पाहिला असता मी पुरता हादरून गेलो होतो. त्यामुळे हेल्मेटविषयी जनजागृती करण्याचा विचार लगेचच माझ्या मनात आला होता. त्यामुळे एका अनोख्या आणि प्रभावी अशा मार्गाने हा अतिशय महत्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून मी माऊंट किलीमांजारो सर केला’, असं खुद्द अमगोथ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधत म्हणाला.