News Flash

कोलकातामधील प्लेस्कूलमध्ये दोन वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार, पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

याप्रकरणी पॉस्को अंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोलकातामध्ये प्लेस्कूलच्या आवारात एका दोन वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डायमंड हार्बर परिसरात ही घटना घडली आहे. घटनेच्या दोन दिवसानंतर चिमुरड्याच्या वडिलांनी याप्रकरणी ठाकूरपुरकर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जूनला मुलगा घरी आला तेव्हा त्याच्या गुप्तांगामधून रक्त वाहत होतं. याप्रकरणी पॉस्को अंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय अहवालानुसार मुलासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. २ जून रोजी जेव्हा पीडित मुलाची आई त्याला शाळेतून घरी आणण्यासाठी गेली होती तेव्हा तो जोरजोरात रडत असल्याचं त्यांनी पाहिलं. घरी पोहोचल्यानंवर आईने मुलाला बाथरुममध्ये नेऊन पाहिलं असता त्याच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं असं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.

पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मुलाची स्थिती पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला होता. शाळेतील सीसीटीव्ही २६ जूनपासून बंद पडले असून शाळेने कोणतंही फुटेज दाखवण्यास नकार दिला असल्याचाही आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

‘आम्ही मुख्याध्यापक आणि प्रशानाकडे सीसीटीव्ही फुटेज द्यावं यासाठी विनंती केली. पण त्यांनी २६ जूनपासून सीसीटीव्ही बंद पडल्याचं कारण दिलं. शाळा प्रशासनाने जाणुनबुजून फुटेज डिलीट केलं असावं असा आम्हाला संशय आहे’, असं त्याच्या वडिलांनी तक्रारीत सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2018 4:13 pm

Web Title: 2 year old child sexual assalut playschool kokata registersd posco
Next Stories
1 जाणून घ्या कसा निश्चित केला जातो हमीभाव
2 चिमुकलीसाठी बाबाच झाला आई, मुलीला दूध पाजतानाचा फोटो व्हायरल
3 दिल्ली सरकारला तपास पथक नेमण्याचा अधिकार नाही : अरुण जेटली
Just Now!
X