वाघांचे राज्य ही बिरूदावली मध्यप्रदेशने गमावलेली असताना आता मात्र तेथे २८८ वाघ आहेत. वनमंत्री डॉ. गौरीशंकर शेजवार यांनी सांगितले की, वाघांची संख्या राज्यात वाढली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशमध्ये वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाघांच्या मागच्या गणनेत मध्यप्रदेशात वाघांची संख्या २००६ मध्ये ३०० वरून २५७ इतकी खाली आली होती. कर्नाटकात ३०० वाघ होते. आताच्या आकडेवारीनुसार कान्हा ७२, बांधवगड ४५, पेंच ४५, पन्ना ३०, संजय गांधी व्याघ्रअभयारण्य १० याप्रमाणे वाघांची संख्या आहे, इतर वाघ जंगली भागात आहेत. वाघांची गणना वाघांची अचूक संख्या देत नाही असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.