केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरध्ये जवळपास पाच महिन्यानंतर जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाइल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा केवळ पोस्टपेड मोबाइलवरच उपलब्ध असणार आहे.

याचबरोबर हॉटेल, रुग्णालय व निगडीत संस्थामध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा उधमपुर, कठुआ, सांबा व रियासी या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणार आहे. या संबंधीचा आदेश १५ जानेवारीपासून सात दिवसांपर्यंत लागू असणार आहे.

मंगळवारी गृह विभागाच्यावतीने यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आपल्या आदेशात गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे की, काश्मीर विभागात अतिरिक्त ४०० इंटरनेट कियोस्क स्थापले जातील. इंटरनेट सेवा देणारे आवश्यक सेवा देणाऱ्यासर्व संस्था, रुग्णालय, बँकाबरोबच शासकीय कार्यालयात ब्रॉडबॅण्ड सुविधा देतील.

पर्यटकांच्या सुविधेच्यादृष्टीने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट हॉटेल आणि यात्रा कंपन्यांना पुरवले जाणार आहेत. आदेशात हे देखील म्हटले गेले आहे की, जम्मू परिसरातील इंटरनेट बँकींगसह सुरक्षित वेबसाइट पाहण्यासाठी पोस्टपेड मोबाइलवर 2जी मोबाइल इंटरनेटला परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था व सद्यस्थितीची पडताळणी करून जम्मू विभागात मोबाइल इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगितले जात आहे की, सात दिवसांच्या पाहणीनंतर या सेवाचा कालवधी वाढवला जाऊ शकतो.