फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून फाशी रद्द करण्यासाठी दयेचे एकूण ४३७ अर्ज आले होते. त्यांपैकी आतापर्यंतच्या विविध राष्ट्रपतींनी ३०६ गुन्हेगारांची फाशीची शिक्षा रद्द केली असल्याची माहिती उघड झाली आहे. फाशीच्या शिक्षेबाबत विधी आयोगाने आपला अहवाल सोमवारी सादर केला. त्याद्वारे ही माहिती उघड झाली आहे. २६ जानेवारी १९५०पासून आजमितीपर्यंतच्या राष्ट्रपतींकडे आलेल्या दयेच्या अर्जाची यादी आयोगाने सादर केली. फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीच्या जीवन-मरणाचे भवितव्य केवळ सरकारची विचारसरणी आणि मतांवर अवलंबून नाही तर राष्ट्रपतींचे वैयक्तिक मत आणि विश्वास यावरही अवलंबून आहे, असे आयोगाने म्हटले आहे.दहशतवाद आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याची प्रकरणे वगळता फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी शिफारस आयोगाने केली आहे. २६ जानेवारी १९५० पासून आजमितीपर्यंत एकूण ४३७ दयेचे अर्ज आले होते.