गुजरात राज्य परिवहन महामंडळाची एक बस शुक्रवारी दक्षिण गुजरातमधील नवसारी जिल्ह्य़ात एका पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात ३७ प्रवासी ठार, तर २४ जखमी झाले. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.
उकाईला जात असलेली ही बस २० फूट उंचीच्या पुलावरून पूर्णा नदीत कोसळली. यामुळे ३७ प्रवासी ठार झाले आहेत. २४ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे, असे नवसारीचे पोलीस अधीक्षक एम.एस. भराडा यांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण अद्याप कळले नाही.