नागालॅंडमध्ये रविवारी दबा धरुन बसलेल्या नागा दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे ४ जवान शहीद झाले तर ६ जखमी झाले आहेत. नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला.

आसाम रायफल्सचे जवान पाणी आणण्यासाठी नदीजवळ जात होते, ते नदीजवळ पोहोचल्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार आणि ग्रेनड हल्ला सुरू केला. जवळपास तासभर येथे गोळीबार आणि बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी दूर असलेल्या मोन जिल्ह्यातील अंबोई नगर येथील वस्तीजवळ ही घटना घडली. नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. हवालदार फतेह सिंह नेगी आणि शिपाई एच कोनयाक यांच्यासह चार जवान शहीद झाले तर अन्य ६ जवान या हल्ल्यात जखमी झाले हे दोन जवान या हल्ल्यात शहीद झाले. घटनास्थळावरून हेलिकॉप्टरच्या मदतीने जखणी जवानांना जोरहाट येथे आणण्यात आलं , त्याठिकाणी जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.