21 February 2019

News Flash

कॅशियरला ठार करत चार दरोडेखोरांनी लुटली कॉर्पोरेशन बँक

दरोडेखोरांनी किती पैसे लुटले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही

चार दरोडेखोरांनी कॅशियरवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली आणि कॉर्पोरेशन बँक लुटली आहे.दिल्लीतील खैरा गाव भागात ही घटना घडली आहे. या घटनेत तीन लोक जखमी झाले आहेत अशीही माहिती समोर आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लुटली हे अद्याप समजू शकलेले नाही. कॅशियरला ठार करून पळालेल्या दरोडेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.

First Published on October 12, 2018 9:23 pm

Web Title: 4 criminals had shot dead the cashier and looted cash from corporation bank