अमेरिकेत मुलांच्या गोळीबाराच्या घटना नेहमी घडत असतात, त्यातच एका चार वर्षांच्या शाळकरी मुलीने तिच्याच वयाच्या चुलतभावाला गोळ्या घालून ठार केले. दोघेही बंदुकीशी खेळत असताना ही घटना डेट्रॉइट येथे काल घडली.
ही मुलगी वेस्ट साईड येथील त्यांच्या निवासस्थानी खेळत असताना एकूण तीन भावंडे तिथे होती, असे डेट्रॉइटचे उपप्रमुख रॉडनी जॉनसन यांनी सांगितले. बंदूक खेळणाऱ्यात तिसरे मूल अवघे पाच वर्षांचे होते. या मुलांना एक मोठी बंदूक त्यांच्या बिछान्याखाली सापडली.
त्यांनी ती ओढून बाहेर काढली व खेळू लागले, असे डेट्रॉइटच्या पोलीस खात्याचे जनसंपर्क अधिकारी अ‍ॅडम मदेरा यांनी सांगितले. चौकशी प्राथमिक टप्प्यात असली तरी ही दुर्दैवी घटना असल्याचे मदेरा यांनी सीएनएनला सांगितले.