News Flash

ड्रोन हल्ल्यात ५ अतिरेकी ठार

अराजक परिस्थिती असलेल्या पूर्व पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तान या टोळीवाल्यांच्या प्रदेशात अमेरिकेने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाच संशयित अतिरेकी ठार झाले आहेत़.

| January 11, 2013 04:58 am

अराजक परिस्थिती असलेल्या पूर्व पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तान या टोळीवाल्यांच्या प्रदेशात अमेरिकेने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाच संशयित अतिरेकी ठार झाले आहेत़.  येथील प्रमुख शहर असलेल्या मीर अलीजवळच्या हेसो खेल या गावात हा हल्ला  झाला, अशी माहिती सुरक्षा दलातील अधिकृत सूत्रांनी दिली़
या भागाला अमेरिकी आणि अफगाणी अधिकाऱ्यांनी अतिरेक्यांसाठीची ‘सुरक्षित जागा’ असे म्हटले आह़े  उपलब्ध अहवालानुसार, या तळावर एकूण चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली़  या वर्षांच्या सुरुवातीपासून अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यातील मृतांची संख्या आता ४० वर पोहोचली आह़े  हद्दीत शिरून अमेरिकेने केलेले ड्रोन हल्ले, हे देशाच्या सार्वभौमत्वावर गंडांतर आणणारे असल्याची टीका पाकिस्तानने वारंवार केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 4:58 am

Web Title: 5 terrorist killed in drone attack
टॅग : Pakistan
Next Stories
1 पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांकडून संभाव्य डिझेल दरवाढीचे समर्थन
2 सुधाकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
3 बिहारमध्ये अपघात; २५ ठार
Just Now!
X