पश्चिम बंगालमध्ये अम्फन वादळाने घेतलेल्या बळींची संख्या आता ८५ झाली असून विद्युत व पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांनी कोलकात्यात प्रशासनाविरोधात निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ास भेट देऊन पाहणी करण्याचे ठरवले.  वादळात अनेक घरे व झाडे कोसळली. अधिकृत माहिती नुसार १.५ कोटी लोकांना फटका बसला असून १० लाख घरे पडली आहेत. वीज व मोबाइल सेवा काही प्रमाणात सुरळीत झाली असली, तरी कोलकाता, उत्तर व दक्षिण २४ परगणा भागात अजून काही ठिकाणी वीज नसल्याने अंधारच आहे.