इराणच्या बुशहर शहरात बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.५० वाजता शक्तीशाली भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची ४.९ इतकी नोंद झाली आहे. विशेष म्हणजे इराणच्या अणुऊर्जा केंद्राजवळच हा भूकंप झाला आहे. दरम्यान, कुठल्याही नुकसानीची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने याबाबत माहिती दिली आहे.
A 4.9 magnitude earthquake struck near #Iran‘s Bushehr: United States Geological Survey
— ANI (@ANI) January 8, 2020
इराणच्या बोराझजान शहरापासून आग्नेय दिशेला १० किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. एवढ्याच तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के डिसेंबर महिन्यातही इथे बसले होते. आजचे जाणवलेले धक्के हे नैसर्गिकरित्या आलेल्या भूंकपाचेच धक्के असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर काही क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी ट्विटद्वारे यावर ‘ऑल इज वेल’ म्हणजेच सर्वकाही ठीक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. सकाळच्या दरम्यान ही कारवाई सुरु असल्याने यातूनच आवाज किंवा हादरे जाणवत असावेत असा समज होता. मात्र, हे हादरे हवाई हल्ल्यांमुळे नव्हे तर नैसर्गिकरित्या आलेल्या भूंकपाचे धक्के असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने स्पष्ट केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2020 10:06 am