राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीतून  जवळपास ४५ भाविकांना घेऊन निघालेली बोट आज(बुधवार) सकाळी उलटल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अद्यापपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तीन भाविकांचे मृतदेह हाती लागले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीतून जवळपास ४५ भाविकांना घेऊन ही बोट निघाली होती. दरम्यान अचानक बोट उलटल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये आतापर्यंत तीन भाविकांचे मृतदेह हाती लागले असल्याची माहिती  कोटा येथील एसडीएम रामावतार बरनाला यांनी दिली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेनतील मृतांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये तातडीची मदत जाहीर केली आहे.