आजच्या घडीला भारताचं लष्कर हे चीनला प्रत्युत्तर देत आहेत. मात्र आपल्या देशातले काही नेते ट्विट करुन आपल्या लष्कराचं आणि जवानांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम करत आहेत. तुम्हाला काहीही माहित नाही तर किमान तुमच्या बुद्धीचं प्रदर्शन तरी करु नका असा टोला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींना लगावला आहे. सैनिक निशस्त्र का गेले होते? असा प्रश्न विचारत आहेत. तुम्हाला काही माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय मुद्दे ठाऊक आहेत का? जर नाही तर का अशा प्रकारे बोलून तुम्ही सैनिकांचं मनोधैर्य खच्ची करत आहात? असेही प्रश्न नड्डा यांनी विचारले आहेत.

आणखी वाचा- गलवान खोरे संघर्ष : अमित शाह यांनी राहुल गांधी यांना दिलं उत्तर; म्हणाले…

आणखी वाचा- “राहुल गांधींनी यात राजकारण करू नये”; जखमी जवानांच्या वडिलांचं आवाहन

” काहीही माहिती नाही तरीही तुम्ही बडबडत आहात. ज्यामुळे आपल्या सैनिकांचं मनोधैर्य खच्ची होतं हा विचार तुम्ही करत नाही का? तुम्ही करत असलेले ट्विट्स तुमचं अज्ञान दर्शवत आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल जी भाषा तुम्ही वापरत आहात ती तर पूर्णतः अनादार दाखवणारी आहे. पंतप्रधानांबाबत कुणीही अशा भाषेत बोलत नाही. पण तुम्ही तर मनमोहन सिंग यांनी जे तयार केलेल्या मसुद्याचेह कपटे केलेत. तुमचं हे वागणं तुमच्यावर झालेले संस्कार दर्शवत आहेत. भारतीय कुटुंबात मोठा झालेला व्यक्ती कधीही असा कुणाचा अपमान करणार नाही. इथे तर तु्म्ही देशाच्या पंतप्रधानांवबाबत अपशब्द बोलत आहे. तुमच्यावर कसे संस्कार झालेत हेच ते दाखवणारं असंही नड्डा यांनी म्हटलं आहे.